Thursday, November 24, 2016

भारतात रस्ते सुरक्षा पालनाविषयी करिष्मा कपूरचे आवाहन

यूएसएल- डियाजिओ रोड टु सेफ्टी उपक्रमाच्या तिसऱ्या सीझनचे लाँच 




मुंब, २3 नोव्हेंबर २०१६: डियाजिओ समूहाच्या युनायटेड स्पिरीट्स लिमिटेड (यूएसएल) या कंपनीने आज बॉलिवूड अभिनेत्रीकरिष्मा कपूरच्या हस्ते रोड टु सेफ्टी या उपक्रमाच्या तिसऱ्या सीचे लाँच केले. या उपक्रमाद्वारे करिष्माने भारतात रस्त्यावरील सुरक्षा पालनाला आपला पाठिंबा जाहीर केला. या लाँचचाच एक भाग म्हणून या वेळेस रोड सेफ्टी – न्यू चॅलेंजेस अँड द रोड अहेड या विषयावर एका चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात सुहेल सेठ – मुख्य कार्यकारी अधिकारीकौन्सलेज इंडियाअबंती संकरनारायणन – मुख्य धोरण आणि कॉर्पोरेट अफेयर्स अधिकारीयूएसएल,डॉ. मर्चंट – केईएम कॉलेज, शैना एनसी - प्रवक्‍ताभाजपाअबांती शंकरनारायणन - मुख्‍य धोरण व कंपनी व्‍यवहार अधिकारीयुएसएलसेजी चेरियन - मुख्‍य कार्यकारी अधिकारीसेव्‍ह लाइफ फाउंडेशनडॉ. शंकर विश्‍वनाथ - माननीय सल्‍लागारमुंबई वाहतूक पोलिस आणि डॉ. संजय ओक - माजी डीनकेईएम हॉस्पिटल यांनी सहभागी होऊन भारतातील रस्ते सुरक्षेशी संबंधित समस्या व उपाययोजनांवर चर्चा केली.

दरवर्षी १,४५,००० मृत्यूंमुळे जगभरात होणाऱ्या रस्ते अपघातांपैकी १२.५ टक्के अपघात भारतात होतात. यूएसएल- डियाजिओच्या २०१४ मध्ये लाँच केलेल्या रोड टु सेफ्टी या उपक्रमात जबाबदारीने मद्यपान करणे आणि टीव्हीरेडिओ वसोशल मीडिया प्रोत्साहनपर नागरिक विशेषतः तरुणांद्वारे नेव्हर ड्रिंक अँड ड्राइव्हचा संदेश पोहोचवण्यासाठी एकत्रितपणे काम केले जाते.

या अभियानात कायदे अंमलबजावणी संघटना सरकारी संघटना यांचाही समावेश असून त्या भारतातील ट्रॅफिक पोलिस अधिकाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण देणेव्यावसायिक चालकांना सुशिक्षित करणे आणि विद्यापीठातील विद्यार्थ्यांना मद्यपान करून गाडी चालवण्याचे तोटे समजावून देणे अशी कामे करतात.

उपक्रमाला समर्थन दर्शवित, करिष्‍मा कपूर म्‍हणाल्‍या, ''रस्‍ता सुरक्षितता ही वाढती समस्‍या बनली आहे आणि मला वाटते की, रस्‍ता सुरक्षिततेच्‍या उपायांबाबत गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. एक माता म्‍हणूनजेव्‍हा माझी मुले बाहेर पडतात व रस्‍त्‍यावर चालत असताततेव्‍हा माझ्या मनात नेहमीचे भीतीचे वातावरण असते की कदाचित कोणीतरी निष्‍काळजीपणे वाहन चालवत असेल. मी प्रत्‍येकाला आवाहन करते की, मद्यपान करुन गाडी चालवू नका आणि यूएसएल - डियाजिओच्‍या डेजिग्‍नेटेड ड्रायव्‍हर संकल्‍पनेचे समर्थन करा.''

या उपक्रमाविषयी अबंती संकरनारायणन – मुख्य धोरण आणि कॉर्पोरेट अफेयर्स अधिकारीयूएसएल म्हणाल्या, ''मर्यादित प्रमाणात आणि जबाबदारीने केलेले मद्यसेवन हा साधारण जीवनशैलीचा भाग असू शकतो असे आम्ही यूएसएलमध्ये मनतो. त्याचबरोबर अतिरिक्त मद्यपानामुळे संबंधित व्यक्ती तसेच समाजाला हानी पोहोचू शकते. संशोधन असे सांगते की,मद्यपान करून गाडी चालवणे ही भारतातील एक प्रमुख समस्या असून त्यामुळेच आम्ही रोड टु सेफ्टी हा उपक्रम लाँच केला. गेल्या तीन वर्षांत ना-नफा तत्वावर काम करणाऱ्या संस्थासरकारमीडिया व नागरिकांबरोबर धोरणात्मक भागिदारीद्वारे या उपक्रमाने सदर समस्या व त्यावरील उपाययोजनांबाबत पुरेशी जागरूकता निर्माण केली आहे. मद्यपान करून गाडी चालवणे तसेच अतिरिक्त मद्यपान करणे या समस्या कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी आम्ही बांधील आहोत.''

तिसऱ्या सीझनमध्ये नागरिकांना सामाजिक समारंभ आणि कार्यक्रमात डेझिग्नेटेड ड्रायव्हरची निवड करून जबाबादारीने आनंद साजरा करत भारतातील रस्ते सुरक्षेसंदर्भात महत्त्वाची भूमिका बजावण्यासाठी प्रेरित केले जाणार आहे.

आतापर्यंत रोड टु सेफ्टी उपक्रमात 
-    भारतातील २२ राज्ये व ५३ शहरांत अंमलबजावणी करण्यात आली आहे.
-    चार हजार पोलिस अधिकाऱ्यांना ट्रॅफिकचे नियम मद्यसेवन करून गाडी चालवण्याच्या आरोपाची अंमलबजावणी ब्रेथ अल्कोहोल अनालायझर्सचा योग्य वापर यांचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.
-    पोलिस खाती व काही राज्यांना उच्च दर्जाचे ब्रेथ अल्कोहोल अनालायझर्सचे दान.
-    विद्यापीठातील सहा हजार विद्यार्थ्यांना मद्यसेवन करून गाडी चालण्याच्या तसेच प्रमाणित वयापेक्षा कमी वयात मद्यसेवन करण्याचे धोके समजावून देण्यात आले.
-    व्यावसायिक वाहनांच्या (शाळांच्या बसेस ऑटो रिक्क्षा ट्रक आणि बसेस) पाच हजार चालकांना मद्यसेवन करून गाडी चालवण्याच्या धोक्यांची माहिती देण्यात आली.
-    सोशल मीडिया व प्रत्यक्ष कार्यक्रमांतून सर्व थरांतील तीन लाख लोकांची नेव्हर ड्रिंक अँड ड्राइव्हची शपथ.


No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

More digital, more luxurious, more efficient: the new Panamera

  More digital, more luxurious, more efficient: the  new Panamera • New exterior design with even greater emphasis on width • Porsche Driver...