अक्षय तृतीयाच्या
शुभमूहुर्तावर बोनस चित्रपटाचे टीझर पोस्टर लाँच
अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर बऱ्याचशा शुभ गोष्टी होताना आपल्याला दिसतात.
याच दिवसाचं औचित्य साधून वर्षाच्या सुरूवातीलाच मुहूर्त
झालेल्या बोनस या चित्रपटाचं टीझर पोस्टर सोशल मिडियावरून नुकतंच लाँच करण्यात आलं.
या पोस्टरवर उच्चभ्रू जीवनशैली असणारा एक तरूण
एका साधारणशा खोलीत आपलं आयुष्य व्यतित करण्याच्या उद्देशाने पुढे सरसावला आहे. या
तरूणाभोवती फिरणारी ही कथा... याचं बोनसशी काय नातं आहे?हे चित्रपट पाहिल्यावर आपल्याला कळणार आहे.
या चित्रपटात गश्मीर महाजनी आणि पूजा सावंत प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.
बोनस या संवेदनेभोवती फिरणारी ही कथा सौरभ भावे यांनी लिहिली आहे. तर दिग्दर्शनाची
धुरा ही सौरभ भावे यांनीच सांभाळली आहे.
या चित्रपटाला साजेसं संगीत रोहन – रोहन यांनी दिलं आहे. या चित्रपटाची
निर्मिती लायन क्राऊन एंटरटेनमेंट यांनी केली असून गोविंद उभे, रतिश पाटील, संदेश
पाटील आणि एम. अनुपमा या चित्रपटाचे निर्माते आहेत.
No comments:
Post a Comment
GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST