Tuesday, April 24, 2018


Multi starrer Drama ‘Ranangan’ Trailer Launched


     The much awaited drama movie ‘Ranangan’ has finally revealed the star cast faces with its Trailer launch in Mumbai. Sachin Pilgaonkar, Swwapnil Joshi, Anand Ingale and debutant Pranali Ghogare with the music team Avdhoot Gupte, Guru Thakur, Rahul Ranade, Shashank Powar along with Producers Karishma Jain and Joe Rajan and Co-Producer Arjun Singgh Baran, Kartik Nishandar and Director Rakesh Sarang were present at the event.
     The trailer of the movie unveils surprising appearances of Sanjay Narvekar and Mukta Barve by leaving us curious about the plot and the role they play in the movie.  The movie trailer also raises many speculations, as once again the famous Jodi of Swwapnil and Mukta are coming together on the silver screen,
     Ranangan songs are penned by Guru Thakur and Sameer Samant on the tunes of Music Directors Rahul Ranade, Shashank Powar, Sachin Pilgaonkar and Avdhoot Gupte and songs sung by Aanandi Joshi, Vaishali Mhade, Swapnil Bandodkar and Avdhoot Gupte.
     The movie is presented by 52 Weeks Entertainment, in association with Global Sports Entertainment and Media Solutions (GSEAMS) and Harvey Films.
     The movie will unfold its story on 11th May at your nearby theatres!

हरहुन्नरी कलाकारांची मांदियाळी असलेल्या 'रणांगण' चित्रपटाचा ट्रेलर लाँच

-11 मे ला संपूर्ण महाराष्ट्रात होणार प्रदर्शित

हरहुन्नरी कलाकारांची मांदियाळी असलेल्या 'रणांगण' चित्रपटाचा ट्रेलर नुकताच मुंबईत लाँच करण्यात आला. या सोहळ्याला निर्माते करिष्मा जैन, जो राजन, सहनिर्माते अर्जुन सिंह बर्रन, स्वप्नील जोशी, कार्तिक निशानदार बरोबरच चित्रपटाचे दिग्दर्शक राकेश सारंगबरोबरच संगीतातील दिग्गज अवधूत गुप्ते, राहुल रानडे, गुरू ठाकूर आणि कलाकार सचिन पिळगांवकर, प्रणाली घोगरे, आनंद इंगळे ही कलाकार मंडळी उपस्थित होती.

नुकताच लाँच झालेल्या या ट्रेलरमधून चित्रपटातील प्रमुख कलाकारांच्याबरोबरीने दिसलेले संजय नार्वेकर, मुक्ता बर्वे हे चेहरे... यांची भूमिका नेमकी काय असणार हे चित्रपट पाहिल्यावर आपल्याला कळणार आहेच मात्र चित्रपटाच्या ट्रेलरवरून एक सुंदर, मनोरंजनात्मक चित्रीकरण रणांगणच्या निमित्ताने प्रेक्षकांसमोर येणार, एवढं नक्की.

या चित्रपटाची कथा दिग्दर्शक राकेश सारंग यांनी लिहिली असून चित्रपटाच्या कथेला पूरक संगीत या चित्रपटाला लाभलेल्या अवधूत गुप्ते, राहुल रानडे आणि शशांक पोवार या संगीतकारांनी दिला आहे. तर सचिन पिळगांवकरांनीही एक गाणं संगीतबध्द करून आपली आणखी एक छटा प्रेक्षकांना दाखवून दिली आहे. या चित्रपटाला साजेशी गाणी गुरू ठाकूर आणि समीर सामंत यांनी लिहिली असून या चित्रपटाच्या गीतांना आनंदी जोशी, वैशाली माडे, स्वप्नील बांदोडकर, अवधूत गुप्ते यांचे स्वर लाभले आहेत.

आजच्या युगात आजची कलाकृती मांडणारा 52 विक्स एंटरटेनमेंट आणि हार्वे फिल्म्स प्रस्तुत आणि ग्लोबल एंटरटेनमेंट मिडिया सॉल्यूशन्स (जीसिम्स) निर्मित रणांगण चित्रपट येत्या 11 मे ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.



No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...