Friday, December 11, 2020

 अभिनेत्री नीना कुळकर्णी साकारणार जिजामातांची भूमिका!

अभिनेत्री नीना कुळकर्णी साकारणार जिजामातांची भूमिका!

 

सोनी मराठी वाहिनीवरील 'स्वराज्यजननी जिजामाता' मालिकेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळतो आहे. या मालिकेद्वारे महाराष्ट्राचा जाज्वल्य इतिहास पुन्हा एकदा प्रेक्षांसमोर येतो आहे. स्वराज्याचा राजा घडवण्यासाठी जिजाऊ शिवबांना न्यायाचे, शास्त्राचे आणि धर्माचे धडे देताहेत. आपल्या सवंगड्यांबरोबर स्वराज्याची शपथ घेऊन शिवबांनी तोरणा गड स्वराज्यात आणला आहे आणि स्वराज्याचा पाया रचायला सुरुवात केली आहे

 

ही मालिका लवकरच लीप घेणार असून जिजामातांच्या भूमिकेत ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुळकर्णी दिसणार आहेत. नीना कुळकर्णींसारखी दिग्गज अभिनेत्री जिजाऊंची भूमिका साकारायला सज्ज झाली आहे. स्वराज्याचा राजा, रयतेचा जाणता राजा घडवणाऱ्या मातेची कथा या मालिकेत दिसते आहे. या मालिकेत स्वराज्याचा देदीप्यमान इतिहास जिजाऊंच्या नजरेतून मांडण्यात आला आहे

 

पाहा महाराष्ट्राच्या अभिमानाची यशोगाथा, 'स्वराज्यजननी जिजामाता'! सोम.-शनि., रात्री :३० वा. फक्त सोनी मराठी वाहिनीवर





.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

Star-Studded Premiere of “Puratawn” Witnessed a Grand Celebration of Cinema

Star-Studded Premiere of “Puratawn” Witnessed a Grand Celebration of Cinema Legendary Sharmila Tagore and National Award Winner Rituparna Se...