Thursday, December 3, 2020



 अंकुश चौधरी आणि प्राजक्ता माळीच्या लक डाऊनचा मुहूर्त संपन्न

लॉकडाऊन’ हा शब्द जरी कोणी उच्चारला तरी तो ऐकावासा वाटत नाही इतका तो शब्द नकोसा वाटू लागलाय. पण लॉकडाऊन’ शब्दाशी मिळता-जुळताउच्चारताना थोड्या फार प्रमाणात समान असापण जरा हटके असा लक डाऊन’ हा शब्द कदाचित क्वचितच ऐकला असावा आणि हा तुमची उत्सुकता वाढवल्याशिवाय राहणार नाही असं पण वाटतंय. २०२० जर लॉकडाऊन’ असेल तर २०२१ लक डाऊन’ असू शकतो. हे कोडं वाटतं असलं तरी हे कोडं नसून आगामी मराठी सिनेमाच्या नावाची झलक आहेज्यामध्ये झळकणार आहे महाराष्ट्राचा सुपरस्टार अंकुश चौधर

इष्णव मीडिया हाऊस प्रस्तुत आणि दर्शन फुलपगार निर्मित लक डाऊन’ या आगामी मराठी सिनेमाचा मुहूर्त जुन्नर येथे विशेष पाहुणे आणि सिनेमाची स्टारकास्ट यांच्या उपस्थितीत पार पडला. माजी आमदार श्री. शरद दादा सोनावणे (शिवजन्म भूमी)सत्यशील शेरकर चेअरमन विघ्नहर सहकारी साखर कारखाना गणेश कवडे युवासेना अध्यक्ष नगर अध्यक्ष श्री. श्याम पांड्ये (जुन्नर नगर पालिका) आणि पी.आय. युवराज मोहिते आदी प्रमुख पाहुणे म्हणून यावेळी उपस्थित होते. धमाकेदारमजेदार कथा असलेल्या या सिनेमात अभिनेता अंकुश चौधरी आणि अभिनेत्री प्राजक्ता माळी ही नवीन जोडी एकत्र दिसणार असून हे देखील मुहूर्ताच्या वेळी उपस्थित होते. संतोष रामदास मांजरेकर हे या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत.

 

ल़ॉकडाऊनमुळे २०२० वर्ष जरी टेन्शनमध्ये गेलं असलं तरी पुढील येणारं वर्ष सर्वांसाठी आनंदी आणि मजेशीर असेल कारण प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी लक डाऊन’ येतोय तुमच्या भेटीला.










No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...