Saturday, March 26, 2022

 इंडियन आयडल मराठी'च्या मंचावर येणार लोकप्रिय पार्श्वगायिका देवकी पंडित!

 

पाहासोमवार - बुधवाररात्री 9 वा., फक्त सोनी मराठी वाहिनीवर.

'इंडियन आयडल मराठी' या कार्यक्रमातल्या प्रत्येक स्पर्धकाने पहिल्या भागापासून प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं आहेदिवसेंदिवस स्पर्धा रंगत चालली असून लवकरच पहिल्या पर्वाचा विजेता महाराष्ट्राला मिळणार आहे. 'अभिमान देशाचाआवाज महाराष्ट्राचाही टॅगलाईन असलेला हा स्वप्नपूर्तीचा मंच खरंच रत्न घडवतो आहेसध्या महाराष्ट्राला टॉप  स्पर्धक मिळाले असून अंतिम फेरीसाठी आता सुरांची स्पर्धा बघायला मिळते आहेयंदाच्या आठवड्यात स्पर्धकांना मार्गदर्शन करण्यासाठी लोकप्रिय गायिका देवकी पंडित येणार आहेत.



देवकी पंडित हे मराठी संगीत जगतातलं एक आदरणीय नावशास्त्रीय गायनाच्या मैफली गाजवत असतानाच हिंदी-मराठी चित्रपटांसाठी पार्श्वगायन करणाऱ्यामालिकांची शीर्षकगीते करणाऱ्या देवकी पंडित यांनी रसिकांच्या मंचावर राज्य केलंगेल्या तीन दशकांपासून देवकी पंडित संगीत क्षेत्रात कार्यरत आहेतवेगवेगळ्या स्वरूपांतवेगवेगळ्या प्रयोगांमधून त्यांची स्वरप्रतिभा रसिकांसमोर येत आहेतब्ब्ल १७ वर्षांनी देवकी पंडित पुन्हा एकदा रिऍलिटी शोमध्ये रसिकांना बघायला मिळणार आहेदेवकी पंडित यांची संगीतावर असलेली पकडत्यांचा अभ्यास या सगळ्याने प्रत्येक नवोदित गायकाला मार्गदर्शन मिळतं. 'इंडियन आयडल मराठीच्या मंचावर देवकी पंडित यांच्याकडुन रसिकांना सुरांची पर्वणी मिळणार आहे.

 

देवकी पंडित यांचं मार्गदर्शनआणि स्पर्धकांची सुरेल गाणी ऐकण्यासाठी पाहायला विसरु नका 28, 29 आणि 30 मार्च रोजी रात्री 9 वाजता  'इंडियन आयडल मराठीफक्त सोनी मराठी वाहिनीवर.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

Director Meghna Gulzar and Junglee Pictures reunite to announce their next - a powerful crime-drama thriller “Daayra” starring Kareena Kapoor Khan and Prithviraj Sukumaran in the lead roles

Director Meghna Gulzar and Junglee Pictures reunite to announce their next - a powerful crime-drama thriller “Daayra” starring Kareena Kapo...