Monday, March 28, 2022

सुखं म्हणजे माझ्यासाठी नाटक, नाटक माझ्यासाठी मेडिटेशन थेरपी - पूजा कातुर्डे

 

अभिनेत्री पूजा कातुर्डेला आत्तापर्यंत विविध मालिकेत पाहिले आहेमालिकेतील ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून तिची 

ओळख आहेतरुण कलाकार सध्या मालिकावेबसिरीजकडे वळतातपणपूजा मात्र तेवढीच नाटक वेडी 

आहेनाटक तिच्यासाठी मेडिटेशन थेरपी आहेजगण्याची नशा आहे.

पूजा कातुर्डेने आत्तापर्यंत अहिल्या बाई होळकरगणपती बाप्पा मोरयाविठू माऊलीबाकरवडीसांग तू 

आहेस का ? अशा मालिकातर बबनती वेळ  अशा सिनेमात काम केले आहे.


पूजा आपल्या नाटकाच्या प्रवासाबद्दल सांगते‘’ कलाकार म्हणून सुरुवात करत असताना आपली वेगवेगळी 

स्वप्न असतातखरंतर लहानपणापासून माझा आणि नाटकाचा काही संबंध नव्हतापण,

2015-2016 मध्ये पुण्यामध्ये प्रदीप वैद्य यांचे थिएटर वर्कशॉप केलेत्या वर्कशॉपनंतर आम्हाला एकपात्री प्रयोग

 बसवायला सांगितला होताजेव्हा प्रयोग सादर करायची वेळ आली मला अजुनही तो दिवस आठवतोउत्साह

 होता तेवढंच टेन्शनही होतंमला तो क्षण जगायचा होताभीती होती , पोटात गोळा आलेला, अश्या सगळ्या 

संमिश्र भावनांनी मी प्रयोग केलाती 40 मिनीटे खूप काही शिकवून गेलीत्यावेळी प्रेक्षकांच्या 

मिळणा-या प्रतिक्रीयाझालेल्या चूकाकेलेली मजा हा संपूर्ण अनुभव खूप काही शिकवणारा होता. 

त्यानंतर मी रंगभूमीच्या प्रेमात पडलेविविध भाषांतीलविविध प्रकारची नाटकं पाहिली.


पूजान आत्तापर्यंत प्रयोगि एकांकिका केल्या आहेत.त्यात एलाब सोलो एक्ट प्लेकवडसा सोलो एक्ट याचा 

समावेश आहे.त्याशिवाय 2019  मध्ये पूजाने तिचा मित्र चैतन्य सरदेशपांडे सोबत गुगलीफाय या नाटकाचे 

प्रयोग केलेमध्यंतरी लॉकडाऊनमुळे बंद असलेले हे नाटक पुन्हा सुरु केले आहेया नाटकाबद्दल पूजा 

सांगते‘’ दुनियादारी फिल्मी स्टाईल या मालिकेच्या शूटिंगच्या वेळी मी आणि चैतन्य वज्रेश्वरीला शूट करत

 होतोत्यावेळी मला नाटक करायचे आहेहे मी चैतन्यला सांगितलेत्यावेळी आम्ही हॉटेलमध्ये बसलो होतो

तेव्हा आजुबाजूला सगळे मोबाईलमध्ये होतेत्यावेळी आम्हाला या नाटकाची कल्पना सुचली आणि त्यानंतर 

काही महिन्यांनी चैतन्य हे नाटक घेऊन माझ्याकडे आला‘’


 गुगलीफाय ’ हे नाटक आजच्या पिढीचे आहेजी इंटरनेट पिढी झाली आहेसगळं काही गुगलला विचारणारी.

 पणत्यामुळे आपली स्मरणशक्ती कमी होत चालली आहेत्याचा गंभीर परीणाम नात्यावरही होत आहे

यावर हे नाटक आधारीत आहेया नाटकाला बक्षिसेही मिळाली आहेत.


जागतिक रंगभूमी दिनानिमित्त पूजा सांगते‘’सध्या कलाकारांकडे वेगवेगळ्या संधी आहेतपणतरीही

 कलाकारांनी नाटकांचा अनुभव घेतलाच पाहिजेमाझ्यासाठी सुख म्हणजे काय असं कोणी विचारलं तर मी 

रंगभूमी सांगेन.नाटकासारखा अनुभव कुठेच नाहीटीव्हीवेबसिरीजचा कधीतरी कंटाळा येऊ शकतोपण

नाटकाचा कधीच कंटाळा येत नाहीमला कधी उदास वाटलं किंवा पुढे काय करावं हे सुचलं नाही की मी 

नाटकाकडे वळतेनाटक मला एनर्जी देते.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...