Saturday, June 25, 2022

 वडाळ्याच्या अक्षय कदम यांचा हॉटसीटपर्यंतचा प्रेरणादायी प्रवास!

 

पाहा, 'कोण होणार करोडपती', सोमवारी रात्री 9 वाजता फक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.

 

'कोण होणार करोडपतीया कार्यक्रमात वेगवेगळ्या क्षेत्रातले स्पर्धक सहभागी होत असतातकोणी डॉक्टरकोणी पोलीस उपनिरीक्षक तर कोणी वकीलअशा वैविध्यपूर्ण स्पर्धकांमुळे 'कोण होणार करोडपती'चा खेळ अधिक रंगतदार होतोकितीही हलाखीची परिस्थिती असली तरी  डगमगता आलेल्या संकटांना सामोरे जाणारे काही धैर्यवान स्पर्धकही या कार्यक्रमात सहभागी होत असतात.  या आठवड्यात सोमवारच्या भागात असेच एक स्पर्धक सहभागी होणार आहेतवडाळा  येथे राहणारे लेखक असणारे अक्षय कदम सहभागी होणार आहेतमध्यमवर्गीय घरातले अक्षय कदम घरच्यांच्या सुखासाठी आणि व्यवसाय सुरु करण्याच्या उद्देशाने या खेळात सहभागी झाले आहेत.

आईवडीलांनी केलेल्या कष्टांची जाणीव असणारे संवेदनशील स्पर्धक अक्षय कदम हे सध्या कंटेट रायटर  म्हणून काम करत आहेत्यांच्या घरी तोत्याचे आई-वडील आणि एक बहीण असा परिवार आहेअक्षयची आई दुसऱ्यांच्या घरी घरकाम करतेवडील  प्रिंटिंग प्रेस मध्ये कामाला होते पण करोनापासून त्यांचं काम बंद आहेअक्षय यांची बहीण  नायर हॉस्पिटल मध्ये डायलिसिस टेक्निशियन (dialysis technician) म्हणून काम करतेशिक्षण घेता घेता अक्षयने आईस्क्रिम च्या दुकानात काम करत कष्ट करून पैसे मिळवण्यास सुरुवात केलीअक्षय कामाला लागल्यापासून त्याने आईला काम सोडून द्यायला संगितले होते पण आईची सवय आहे काम करण्याची म्हणून तिने अजून काम सोडलेले नाहीआईने खूप कष्ट केले आहेत आणि याची जाणीव असल्याने अक्षयला आता तिला आराम द्यायचा आहे.अक्षयचं हे स्वप्न आहे की त्याला त्याची स्वतःची टूर कंपनी सुरु करायची आहे ज्यात तो लोकांना चांगल्या ठिकाणी कमीत कमी खर्चामध्ये घेऊन जाईलत्याचबरोबर त्याचं अजून एक स्वप्न आहे की  त्याला आईस्क्रीमचं दुकान सुरु करायचं आहेआईस्क्रीमच्या दुकानात अक्षयने काम केल्यामुळे तिकडचा अनुभव त्याच्याजवळ आहेमध्यमवर्गीय अक्षय २५ लाख रुपयांच्या प्रश्नापर्यंत पोहोचला असून  अक्षयचे करोडपती होण्याचं स्वप्न पूर्ण होणार का हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.  

पाहा, 'कोण होणार करोडपती', सोमवारी रात्री 9 वाजता फक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.


No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

GLOBAL PRIDE OF SINDHI AWARDS 2024: A GLORIOUS CELEBRATION OF SINDHI HERITAGE

  GLOBAL PRIDE OF SINDHI AWARDS 2024: A GLORIOUS CELEBRATION OF SINDHI HERITAGE Awardees and guests- Ramesh Taurani, Ghanshyam Vaswani,Lille...