Tuesday, June 28, 2022

श्री छत्रपती उदयनराजे भोसले 

यांनाही 'भिरकीट'ची भुरळ प्रेक्षकांना चित्रपट पाहाण्याचे आवाहन 

हसताहसता मनाला स्पर्शून जाणारा चित्रपट म्हणजे 'भिरकीट'. काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात सिनेसृष्टीतील सगळे विनोदवीर आहेत. त्यामुळे हा एक धमाल चित्रपट बनला आहे. मनोरंजनासोबतच एक खूपच महत्वाचा संदेश देणाऱ्या अनुप जगदाळे दिग्दर्शित 'भिरकीट'ला समीक्षकांसह प्रेक्षकांनीही पसंती दर्शवली असून आता यात आणखी एक मोठे नाव सामील झाले आहे. 

छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज श्री छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आपल्या काही निकटवर्तीयांसह 'भिरकीट' हा चित्रपट नुकताच साताऱ्यात पाहिला आणि हा चित्रपट पाहण्यासाठी  छत्रपती उदयनराजे भोसले भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक प्रकोष्ट महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पंकज चव्हाण तसेच सुनील काटकर, नितीन चौघुले व दिग्दर्शक अनुप जगदाळे इतर निकटवर्तीय  उपस्थित होते. व उदयनराजे यांनी या चित्रपटाचे भरभरून कौतुक केले आहे. केवळ कौतुक नाही तर प्रत्येक प्रेक्षकाने हा चित्रपट पाहावा आणि याकरता साताऱ्यातील चित्रपटगृहात या चित्रपटाचे खेळ काही दिवस अजून ठेवावेत, असे आवाहनही यावेळी केले आहे. 

चित्रपटाबद्दल श्री छत्रपती उदयनराजे भोसले म्हणतात, '' माझा काही परिचयाच्या लोकांनी हा 'भिरकीट' पाहिला आणि त्यांच्याकडून आलेल्या चित्रपटाबद्दलच्या प्रतिक्रिया ऐकून चित्रपट पाहण्याची इच्छा अधिकच तीव्र झाली. नुकताच हा चित्रपट पाहिला असून खूपच सुंदर अशी या चित्रपटाची बांधणी केली आहे. 'भिरकीट'मधील प्रत्येक कलाकाराने उत्कृष्ट अभिनय केला आहे. चित्रपटातील प्रत्येक व्यक्तिरेखा आपल्या आसपास वावरत असते, हे चित्रपट पाहताना प्रकर्षाने जाणवते. काळासोबत पुढे जाताना माणूस माणुसकी मागे सोडत आहे, हेच खूप उत्तमरित्या यात मांडले आहे. माणुसकी जपण्यासाठी, नाते जपण्यासाठी, प्रेक्षकांनी हा चित्रपट आवर्जून पाहावा.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

Chhaava Roaring in Theatres. 424.76 Cr Non-Stoppable....

Chhaava Roaring in Theatres. 424.76 Cr Non-Stoppable.... #Chhaava kicks off Week 3 with a bang! Rakes in 13.30 Cr on 3rd Friday, taking its ...