सोनी मराठी वाहिनीवरील 'जिवाची होतिया काहिली' या मराठी मालिकेत पाहायला मिळणार कानडी तडका
18 जुलैपासून, सोम.-शनि., संध्या. 7:30 वा.
सोनी मराठी वाहिनी सातत्यानी प्रेक्षकांचं मनोरंजन करते आहे. भक्ती, शौर्य, हास्य, थरार, शृंगार अशा सगळ्या प्रकारांत मोडणाऱ्या मालिका प्रेक्षकांना बघायला मिळतात. १८ जुलैपासून प्रेक्षकांना एक नवीकोरी प्रेमकहाणी बघायला मिळणार आहे. 'जिवाची होतिया काहिली' ही मराठी आणि कानडी यांच्या प्रेमाची कहाणी छोट्या पडद्यावर दिसणार आहे. प्रमुख नायकाच्या भूमिकेत प्रेक्षकांचा लाडका, कोल्हापूरचा रांगडा गडी अभिनेता राज हंचनाळे तर नायिका म्हणून प्रतीक्षा शिवणकर दिसणार आहे. या दोघांची प्रमुख कलाकार म्हणून ही पहिलीच मालिका आहे. 'जिवाची होतिया काहिली' असं मालिकेचं नाव असून मराठी आणि कानडी भाषांचा मिलाप यात होणार आहे. राज अस्सल कोल्हापुरी मुलाची तर प्रतीक्षा कानडी मुलीची भूमिका साकारणार आहे.
मालिकेतल्या अनेक गोष्टी प्रेक्षकांना निश्चितच आवडतील. कोल्हापुरी भाषेवरचा कानडी तडका, प्रतीक्षाने साकारलेली कर्नाटकी मुलगी, विद्याधर जोशी आणि अतुल काळे या जोडगोळीचं ऑन स्क्रीन भांडण, आणि भाषेपलीकडचं प्रेम. त्यामुळे १८ जुलैपासून सोनी मराठी वाहिनीवर मालिका नक्की बघा.
'जिवाची होतिया काहिली', 18 जुलैपासून, सोम.-शनि., संध्या. 7:30 वा. सोनी मराठी वाहिनीवर.
No comments:
Post a Comment
GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST