Tuesday, July 12, 2022

 अभिनेते विद्याधर जोशी आणि अतुल काळे यांच्यात प्रेक्षकांना बघायला मिळणार ऑनस्क्रीन चुरसदार भांडण!

पाहा, 'जिवाची होतिया काहिली', 18 जुलैपासूनसोम.-शनि., संध्या. 7:30 वासोनी मराठी वाहिनीवर.

 

                              सोनी मराठी वाहिनी प्रेक्षकांचं सातत्यानी मनोरंजन करते आहे१८ जुलैपासून प्रेक्षकांना एक नवी कोरी प्रेमकहाणी बघायला मिळणार आहे. 'जिवाची होतिया काहिलीही मराठी आणि कानडी यांच्यातल्या प्रेमाची कहाणी छोट्या पडद्यावर दिसणार आहेया मालिकेत दोन दिग्गज अभिनेते आमनेसामने असणार आहेतअस्सल कोल्हापुरी वेशात अभिनेते विद्याधर जोशी तर त्यांच्यावर कानडी तडका द्यायला अभिनेते अतुल काळे असणार आहेत.

 

                              मालिकेची झलक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेपहिल्या झलकमध्ये प्रेमाला भाषा नसते हे दिसलं तर कानडी आणि मराठीचा झकास तडका दुसऱ्यावेळेस बघायला मिळालायात आकर्षण ठरलेत नायक-नायिकेच्या वडिलांची भूमिका साकारणारे दोन अनुभवी कलाकारअर्थातच विद्याधर जोशी आणि अतुल काळेहे दोन्ही दिग्गज कलाकार  नव्या भूमिकांतनव्या वेशात प्रेक्षकांना भेटायला येणार आहेतविद्याधर जोशी यांचा अस्सल कोल्हापुरी वेश तर अतुल काळे यांचा कर्नाटकी पोशाख प्रेक्षकांना आवडतो आहेकन्नड आणि मराठी कुटुंबं एकाच घरातएकाच छताखाली कसे राहणारहा चर्चेचा विषय ठरला आहेआणि त्यातही त्यांच्यातलं होणारं चुरसदार भांडण आणि घरातल्या घरातच मारली जाणारी सीमारेषा प्रेक्षकांना आवाक करते आहेहे भांडण रेवथी आणि अर्जुन यांच्या नात्यावर काय परिणाम करेलया कलाकारांचं ऑनस्क्रीन चुरसदार भांडणउडणारे खटके आणि त्यांचा स्वतःचा असा एक भाषेचा ठसका प्रेक्षकांना आवडेल यात शंका नाहीया दोघांमुळे रेवथी आणि अर्जुन यांची प्रेमकहाणी कोणतं नवं वळण घेणार ही उत्सुकतेची बाब ठरणार आहेया मालिकेत या दिग्गज कलाकरांबरोबर अभिनेत्री सीमा देशमुख आणि भारती पाटील यादेखील महत्त्वाच्या भूमिकांत दिसणार आहेत.

 

विद्याधर जोशी आणि अतुल काळे यांच्या जोडगोळीचं ऑन स्क्रीन चुरसदार भांडण बघण्यासाठी १८ जुलैपासून सोनी मराठी वाहिनीवर ही मालिका नक्की बघा.

 

पाहा, 'जिवाची होतिया काहिली', 18 जुलैपासूनसोम.-शनि., संध्या. 7:30 वासोनी मराठी वाहिनीवर.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...