Saturday, July 2, 2022

 'कर्मवीर विशेष भागात' अधिक कदम यांची उपस्थिती! पाहा, 'कोण होणार करोडपती'- कर्मवीर विशेष

             2 जुलै  शनिवारी रात्री 9 वाजताफक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.  

 

                                 जनसामान्यांचा म्हणून लोकप्रिय असलेला कार्यक्रम म्हणजे 'कोण होणार करोडपती'. सचिन खेडेकर यांचं बहारदार सूत्रसंचालन हे याकार्यक्रमाचं खास वैशिष्ट्यया आठवड्यात  ‘कोण होणार  करोडपतीमध्ये शनिवारच्या ‘कर्मवीर विशेष भागातकर्मवीरच्या रूपात अधिक कदम हॉटसीटवर येणार आहेतकाश्मिरी मुलींसाठी 'बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशनया संस्थेच्या माध्यमातून लक्षणीय कामगिरी करणारे अधिक कदम या आठवड्यातले कर्मवीर आहेत.

                                  अधिक कदम यांचा जन्म वारकरी संप्रदायात झाल्याने घरामध्ये लहानपणापासून आध्यात्मिक वातावरण आहेते पखवाज आणि मृदंग उत्तम वाजवतातकुठल्याही भक्तीचा पाया हा कार्यकर्तृत्वाचा असतोअसे त्यांचे मत आहेविठ्ठलाच्या नामस्मरणात ते कायम दंग  होतात. 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर आषाढवारीनिमित्त एका अनोख्या विठ्ठलभक्तीचे दर्शन होणार आहे.  १८ दिवसांसाठी काश्मीरमध्ये गेलेले अधिक कदम तिथली परिस्थिती आणि घटना पाहून तिथेच राहिलेज्या गावात हजारपेक्षा जास्त पुरुषांना आतंकवाद्यांनी मारलेत्या गावात ते राहिलेआतंकवादी अधिक यांना १९ वेळा घेऊन गेले आहेततिथे असणाऱ्या सैनिकांची वाईट अवस्था आणि यासारखे अनेक किस्से त्यांनी 'कोण होणार करोडपतीया कार्यक्रमात कथन केले आहेत. 

                       'कोण होणार करोडपती'च्या याही पर्वात दर आठवड्यातल्या शनिवारच्या भागात विशेष पाहुणे सहभागी  होणार आहेतसमाजाच्या कल्याणासाठी झटणाऱ्या सामान्यांमधल्या असामान्य व्यक्तींची भेट आणि त्यांचे कार्य या कर्मवीर विशेष भागांतून प्रेक्षकांसमोर येणार आहेया पर्वातल्या कर्मवीर विशेष भागात अधिक कदम सहभागी होणार आहेतअहमदनगर ते थेट काश्मीरमधील कुपवाडा असा प्रवास करणारे अधिक कदम त्या भागात 'अधिक भैय्याम्हणून प्रसिद्ध आहेत.  'बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशनया संस्थेच्या माध्यमातून ते काश्मिरी मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी उचलतातकारण जम्मू-काश्मीरमध्ये फक्त स्त्रिया बदल घडवू शकतातयावर त्यांचा ठाम विश्वास आहेआत्तापर्यंत अधिक यांच्या संस्थेने १६७ मुलींना स्वतःच्या पायावर उभे करून त्यांची लग्नं लावून दिली आहेत तर सध्या  २३० मुली हॉस्टेलमध्ये राहून त्यांच्या आवडीचं शिक्षण घेत आहेतअधिक कदम यांचे हे सगळे अनुभव 'कोण होणार करोडपती'च्या मंचावरून ऐकता येणार आहेत                                          

 'कोण होणार करोडपती'च्या खेळाबरोबरच अधिक कदम यांचे अचंबित करणारे अनुभव जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका 'कोण होणार करोडपती'- कर्मवीर विशेष, 2 जुलै  शनिवारी रात्री 9 वाजताफक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.


                            

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

Meesho Limited’s Initial Public Offering to open on Wednesday, December 3, 2025

  Meesho Limited’s Initial Public Offering to open on Wednesday, December 3, 2025 Price Band fixed at ₹105 per equity share of face value ₹1...