'सन मराठी'वरील जानकी पाठक आणि साईंकित कामत यांची प्रमुख भूमिका असलेली सुप्रसिद्ध मालिका 'माझी माणसं' आता मनोरंजक वळणावर...
मुंबई, २६ मे २०२२: ‘आपल्या हक्काची माणसं ही खरंच आपली असतात का?' ह्या प्रश्नाभोवती फिरणारी सन मराठी या वहिनीवरील 'माझी माणसं' ही मालिका सध्या चांगलीच चर्चेत आहे. स्वतःच्या कुटुंबावर जीवापाड प्रेम करणाऱ्या एका कर्तृत्ववान मुलीची गोष्ट या कलाकृतीच्या निमित्ताने प्रेक्षक अनुभवत आहेत.
या मालिकेमध्ये जानकी पाठक आणि साईंकित कामत यांच्याबरोबर स्मिता सरवदे, दिगंबर नाईक यांचीदेखील प्रमुख भूमिका असून ही मालिका आता उत्कंठावर्धक वळणावर आली आहे त्यामुळे प्रेक्षकांची उस्तुकता देखील शिगेला पोहोचली आहे.
आपल्या काकांनी रचलेल्या कारस्थानांविरोधात खंबीरपणे उभं राहून आपलं संपूर्ण घर सांभाळणारी 'गिरीजा' येणाऱ्या संकटांना धीराने आणि ताकदीने तोंड देत आहे. त्यामुळे मालिकेने आता चांगलाच वेग घेतला असून, परिस्थितीशी झगडत असलेल्या गिरीजाला आपल्याच माणसांच्या विरोधात जाऊन परिस्थिला सामोरे जावे लागत आहे. एकीकडे गिरीजाला कौटुंबिक आयुष्यात काकांकडून होणाऱ्या जाचाला सामोरं जावं लागत आहे तर दुसरीकडे हेड नर्स असलेल्या गिरीजाला हॉस्पिटलमध्येसुद्धा त्रास सहन करावा लागत आहे. गिरीजा हॉस्पिटलमध्ये रुग्णांची मनापासून शुश्रूषा करत असताना देखील तिला विविध प्रकारे त्रास देऊन तिचे खच्चीकरण करणे हा हेतू असलेल्या डॉक्टर जयंतच्या रूपात गिरिजापुढे एक नवं संकट उभं ठाकलं आहे.
एक दिवस गिरीजा एका गाडीला आग लागलेली पाहते आणि स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या जळत्या गाडीमध्ये अडकलेल्या लहान मुलीचे प्राण वाचवते. या चांगल्या कामगिरी बद्दल गिरिजाला 'जबाबदार नागरिक' हा पुरस्कार जाहीर होणे हे तिच्या काकांना काही आवडत नाही. तेव्हा ते पुढे आता काय करणार? हा पुस्कार गिरिजाला मिळणार की नाही? हे पाहणे रंजक ठरणार आहे .
या मालिकेत 'गिरीजाची' भूमिका करत असलेली 'जानकी पाठक' या कथानकाविषयी म्हणतात, "एक स्त्रीदेखील समर्थपणे घर आणि नोकरी सांभाळू शकते हे दाखवून देत या मालिकेतून 'स्त्री' बद्दलचा दृष्टीकोन बदलण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत."
'सन मराठी ह्या वाहिनीवर प्रेक्षकांना नात्यांनी सजलेल्या वेगवेगळ्या मालिका संध्याकाळी ७ ते रात्री १०. ३० ह्या वेळेत पाहायला मिळतील. सन मराठीवर संध्याकाळी ७ वाजता 'आभाळाची माया', ७.३० वाजता 'जाऊ नको दूर… बाबा!', ८.३० वाजता 'कन्यादान', रात्री ९ वाजता 'संत गजानन शेगावीचे', ९. ३० वाजता 'नंदिनी' तसेच रात्री १० वाजता 'सुंदरी' ह्या मालिका दाखविल्या जाणार आहेत.
सन मराठी ही फ्री वाहिनी सर्व प्रमुख डिटीएच प्लॅटफॉर्म्स आणि केबल नेटवर्क्सवर मोफत उपलब्ध आहे. तसेच ही वाहिनी डीडी फ्री डिश वर देखील चॅनेल नंबर ६ वर उपलब्ध आहे.
No comments:
Post a Comment
GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST