Saturday, July 23, 2022

                    प्रसाद ओक आणि प्राजक्ता माळी हॉटसीटवर!        

                  बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांची विशेष उपस्थिती!       

        पाहा, 'कोण होणार करोडपती'- विशेष भागशनिवारी रात्री 9 वाजता फक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.     


'कोण होणार करोडपतीहा कार्यक्रम कायमच प्रेक्षकांना भावतोज्ञान आणि मनोरंजन यांच्या या अद्भुत खेळातून अनेकांना चांगल्या कामाची प्रेरणा मिळतेया शनिवारच्या भागात बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे या उपस्थित राहणार असून त्यांच्या 'कळसुबाई परिसर बियाणे संवर्धन सामाजिक संस्थाअकोलेया संस्थेला मदत म्हणून महाराष्ट्राचे लाडके अभिनेतेदिग्दर्शक प्रसाद ओक आणि लाडकी अभिनेत्री प्राजक्ता माळी 'कोण होणार करोडपती'चा खेळ खेळणार आहेतत्याचबरोबर सोनी मराठी वाहिनीवरील लाडका कार्यक्रम 'महाराष्ट्राची हास्यजत्रायातील हास्यवीर गौरव मोरेशिवाली परबओंकार भोजने,

रसिका वेंगुर्लेकरचेतना भट हेही उपस्थित राहणार आहेत.

 

'कोण होणार करोडपती'च्या या पर्वातही दर आठवड्यातल्या शनिवारच्या भागात विशेष पाहुणे सहभागी  होतात.  समाजकल्याणासाठी झटणाऱ्या सामान्यांमधल्या असामान्य व्यक्तींची भेट आणि त्यांचे कार्य या  विशेष भागांतून प्रेक्षकांसमोर येतेआत्तापर्यंत काजोलतनुजाअशोक सराफसुधा मूर्तीअधिक कदम यांसारखे अनेक मान्यवर उपस्थित राहिले होतेया आठवड्यात राहीबाई पोपेरे यांच्यासारखे दिग्गज व्यक्तिमत्त्व आणि त्यांच्याबरोबर हास्यवीर असल्याने हा भाग निश्चितच रंगतदार होणार आहेगावरान वाण शोधणेलागवड करणेत्यांच्या बिया काढून त्या संकलित करणेत्या इतरांना पेरणीसाठी देत त्यांना प्रेरणा देणेत्यांच्या माध्यमातून पुन्हा बियांचे संकलन करणे अशा पद्धतीने पद्मश्री राहीबाई पोपेरे यांच्या बीजबँकेचा विस्तार सुरू आहेबियाणांच्या  बॅंकेची सुरुवात नेमकी कशी झाली इथपासून पद्मश्री पुरस्कार घेण्यासाठी त्या अनवाणी गेल्या इथपर्यंतचा सगळा प्रवास राहीबाईंनी या भागात सांगितला आहेतर प्रसाद ओकने  चित्रपटाच्या यशाची गंमत तसेच  पूर्वीचे संघर्षमय दिवस अशा अनेक आठवणींना उजाळा दिलास्त्री कलाकारांनी कायम धाडसी भूमिका स्वीकारल्या पाहिजेत असे मत प्राजक्ता माळी हिने 'कोण होणार करोडपती'च्या भागात व्यक्त केले.

 

'महाराष्ट्राची हास्यजत्राया प्रसिद्ध कार्यक्रमातल्या हास्यवीरांनी पडद्यामागचे अनेक किस्से 'कोण होणार करोडपती'च्या या विशेष भागात उलगडलेगौरव मोरेशिवाली परबओंकार भोजनेरसिका वेंगुर्लेकरचेतना भट या सगळ्यांचा प्रवास आणि विशेष गुण यांची माहिती या भागात सांगण्यात आली.  एरवी खळखळून हसवणारा ओंकार किती शांत आणि सामाजिक कार्याची आवड जपणारा आहेरसिकाची मालवणी भाषेची आवडकुठल्या स्कीटनंतर प्रसाद किस्सा सांगतो अशी अनेक गुपितं या विशेष भागात उलगडली गेली आहेतत्याचबरोबर 'महाराष्ट्राची हास्यजत्राहा कार्यक्रम सोनी मराठीवर पुन्हा कधीपासून सुरू होणारयाबद्दलची माहितीही या विशेष भागात प्रेक्षकांना मिळणार आहे.

 

पाहा, 'कोण होणार करोडपती'- विशेष भागशनिवारी रात्री 9 वाजता फक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

Moneyview Limited: Initial public offering to open on Thursday, September 24, 2026

  Moneyview Limited: Initial public offering to open on Thursday, September 24, 2026 Price Band fixed at ₹32 per equity share of face value ...