Thursday, July 21, 2022

 मोव्हीन कडून त्यांच्या “एक्सप्रेस एन्ड ऑफ डे” सेवेचा ७ नवीन शहरात विस्तार

टाईम- डेफिनेट शिपमेंट्स आता दिल्ली-एनसीआर, मुंबई आणि बेगळुरू तील १००० पिन कोड्स मध्ये सुरु

  मोव्हीन, या यूपीएस आणि इंटरग्लोब एन्टरप्रायझेसच्या सहकार्यातून तयार करण्यात आलेल्या ब्रॅन्ड ने आता आपली पोहोच वाढवत ‘एक्सप्रेस एन्ड ऑफ द डे’ शिपमेंट सेवा ही आता दिल्ली- एनसीआर, मुंबई आणि बंगळूरु येथून वाढवून ती आता आणखी सात शहरांत सुरू केली आहे.  या शहरांमध्ये अहमदाबाद, चंदिगढ, चेन्नई, हैद्राबाद, जयपूर, कोलकाता आणि पुण्याचा समावेश आहे.  या विस्तारामुळे आता मोव्हीन कडून आता सध्याच्या नेटवर्क मध्ये ५०० नवीन पिन कोड्स जोडत असून यामुळे आता गॅरेंटीड टाईम डेफिनेट डिलिव्हरीज करणे शक्य होणार आहे.  यामुळे त्यांच्या उत्पादन शृंखलेत वाढ होऊन ते आता सातत्याने वाढणार्‍या  बी२बी दळणवळण क्षेत्राची सातत्याने वाढती मागणी पूर्ण करु शकणार आहेत.  

 

मे २०२२ मध्ये सुरूवात केल्या पासून मोव्हीन कडून सातत्याने वाढ नोंदवण्यात येत आहे आणि देशभरांतील अधिकाधिक लोकांना मालाची अजोड वाहतूक करुन त्यांचे व्यवसाय वाढण्यास मदत करण्यावर त्यांनी जोर दिला आहे.  बी२बी ग्राहकांच्या गरजा पूर्ण करतांना मुव्हीनच्या एक्सप्रेस टाईम-डेफिनेट डिलिव्हरी आणि स्टॅन्डर्ड प्रिमियम डे -डेफिनेट सर्व्हिसेस या संधींची कवाडे उघडून नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा आणि व्यावसाय केंद्रित लाभांचा उपयोग व्यावसायिकांना होत आहे.

 

ही घोषणा करतांना इंटरग्लोब एन्टरप्रायझेस चे संचालक जे बी सिंग यांनी सांगितले “ मोव्हीन ला दिल्ली-एनसीआर, मुंबई आणि बंगळूरु तील ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.  अजून सात बाजरपेठांमध्ये पोहोच वाढवत मोव्हीन कडून आता अधिक मोठ्या प्रमाणावर ग्राहकांना टाईम डेफिनेट डिलिव्हरी करण्याचे वचन आम्ही पूर्ण करु.  आम्ही नेहमीच आमचे नेटवर्क सुधृढ करुन व्यवयसायांचा पाया मजबूत करत एमएसएमईज आणि एसएमईज ना विक्री करुन वाढण्याची संधी देण्यास वचनबध्द आहोत.  आमच्या बी२बी ग्राहकांना विभागातील सर्वोत्कृष्ट अनुभव देऊ करत असून याकरता अधिक कार्यक्षमता, सक्षम वितरण वाहिन्या, अत्याधुनिक नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान तसेच जगभरातील सर्वोत्कृष्ट क्षमता देऊ करत आहोत.”

 

मोव्हीन ने नेहमीच ग्राहकांना सर्वोत्कृष्ट अनुभव, अधिक  विश्वसनीयता आणि अधिक स्पर्धात्मकतने युक्त्‍  देण्याच्या बाबतीत नवीन स्तर निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करत असून त्या करता जागतिक मुल्य शृंखलेचे एकात्मिकीकरण करण्यावर जोर दिला आहे.



No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

Star-Studded Premiere of “Puratawn” Witnessed a Grand Celebration of Cinema

Star-Studded Premiere of “Puratawn” Witnessed a Grand Celebration of Cinema Legendary Sharmila Tagore and National Award Winner Rituparna Se...