थरार अनुभवायला सज्ज व्हा! - मनोज बाजपेयी यांचा ‘भैय्या जी’ या चित्रपटाचा प्रिमियर सोनी मॅक्सवर!!
‘भैय्या जी’ या ॲक्शन पॅक्ड थरारापटाद्वारे प्रेक्षकांना जबरदस्त थराराचा अनुभव देण्यासाठी सोनी मॅक्स ही भारताची प्रिमियर हिंदी चित्रपट वाहिनी सज्ज आहे. मनोज बाजपेयी या कसलेल्या नटाची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात रहस्य, नाट्य आणि भरपूर ॲक्शन दृश्ये यांनी भरलेले कथानक आहे. सोनी मॅक्सवर या चित्रपटाच्या प्रिमियरच्या आधी मनोज बाजपेयीने राम चरण त्रिपाठी ही जटिल व्यक्तिरेखा पडद्यावर जिवंत करण्याचा आपला अनुभव सांगितला. तो म्हणतो, “भैय्या जी साकारण्यासाठी विशेष शरीरिक क्षमतेची आवश्यकता होती. यातल्या थरारक दृश्यांचे चित्रीकरण सलग वीस दिवस चालले आणि ती दृश्ये करताना मी अनेकदा जखमी झालो. पण कसेही करून ते चित्रीकरण पूर्ण करण्याचे आम्ही ठरवले होते. त्यामुळे मला झालेल्या इजा चित्रीकरणाच्या आड आल्या नाहीत.”
मनोज बाजपेयीने स्वतःचे सगळे स्टंट स्वतः करण्याचा निर्णय घेतला. यातून त्या भूमिकेविषयीची त्याची वचनबद्धता दिसून येते. तो म्हणतो, “ही व्यक्तिरेखा मला जिवंत करायची होती. मी आता विशीतला किंवा तिशीतला नसलो, तरीही हे आव्हान घ्यायचं, असं मी ठरवलं. हे अवघड आव्हान होतं, पण मी ते पेलू शकलो याचा मला आनंद वाटतो.”
'भैय्या जी' चित्रपटात ताकद, इमानदारी आणि कृतींचे परिणाम यांच्यातील गुंतागुंत दाखवली आहे. प्रेक्षकांसाठी ही एक थरारक सफर असेल. चित्रपटाचे वेधक कथानक आणि मनोज बाजपेयीचा दमदार अभिनय प्रेक्षकांची उत्कंठा वाढवेल यात शंका नाही.
मनोज बाजपेयीच्या जबरदस्त अभिनयाला साथ देणारे भागीरथी, झोया हुसैन आणि विपिन शर्मा वगैरे गुणी कलाकार या चित्रपटात आहेत.
पाहायला विसरू नका, ‘भैय्या जी’, सोनी मॅक्सवर, रविवारी १३ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता आणि रात्री ८ वाजता, फक्त सोनी मॅक्सवर.
No comments:
Post a Comment
GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST