Thursday, January 17, 2019

रवी दुबे होणार ‘सा रे    लिटिल चॅम्प्स’ कार्यक्रमाचा नवा सूत्रसंचालक!
रवी दुबे म्हणतो, “स्वगृही परतण्यासारखं दुसरं सुख नाही!”

देशभरातील लहान मुलांकडून सादर झालेल्या धमाकेदार गाण्यांनी अनेक वर्षे टीव्हीवर वर्चस्व गाजविलेल्या गायकांचा शोध घेणाऱ्या झी टीव्हीवरील सा रे    लिटिलचॅम्प्स या रिअॅलिटी कार्यक्रमाची नवी आवृत्ती लवकरच प्रसारित होणार आहे. ‘झी टीव्हीवरील ‘सा रे    लिटिल चॅम्प्स’ या रिअॅलिटी कार्यक्रमाची शेवटची आवृत्तीतब्बल नऊ महिने यशस्वीरीत्या पार पडली होतीत्या आवृत्तीने लोकप्रियतेच्या आलेखावर सदैव अग्रस्थान प्राप्त केले होते आणि श्रेयन भट्टाचार्यअंजली गायकवाड आणिछोटे भगवान’ जयसकुमार यासारखे काही अतिशय गुणी बालगायक प्रेक्षकांपुढे सादर केले होतेअशा गुणी बालगायकांचा शोध घेऊन त्यांना इतक्या लहान वयात त्यांचीगायनकला व्यापक प्रेक्षकांपुढे सादर करण्यासाठी सुयोग्य व्यासपीठ देण्याची परंपरा पुढे चालवीत या कार्यक्रमाने आता नव्या बालगायकांच्या शोधासाठी या कार्यक्रमाची नवीआवृत्ती जाहीर केली आहे. ‘सा रे    लिटिल चॅम्प्सच्या या नव्या आवृत्तीबद्दल एक विशेष महत्त्वाची घडामोड म्हणजे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आता तरुणींच्याहृदयची धडकन असलेला देखणा अभिनेता रवी दुबे करणार आहे!

झी टीव्हीवरील अत्यंत लोकप्रिय जमाई राजा  या मालिकेत नायकाची भूमिका सादर केल्यानंतर रवी दुबे हा गुणी अभिनेता आता या वाहिनीवर तब्बल तीन वर्षांनी परतणारआहेरवी म्हणालामाझं लहान मुलांशी एक भक्कम नातं असून मला त्यांच्या अवतीभोवती राहायला आवडतंमी या कार्यक्रमाचा सूत्रसंचालन करण्याची जबाबदारीस्वीकारली याचं खरं कारण असं की तब्बल 23 वर्षांनंतरही भारतातील गाणंविषयक अस्सल रिअॅलिटी कार्यक्रम हे आपलं स्थान ‘सा रे    लिटिल चॅम्प्स’ कार्यक्रमानेकायम राखलं आहेआपल्या कार्यक्रमात सतत बदल करून त्याने प्रेक्षकांच्या अभिरुचीशी नातं कायम ठेवलं असून इतक्या वर्षांत या कार्यक्रमातून जे गुणी गायक तयार झालेआहेतत्यांच्याबद्दल मला खूपच आदर आहे.”

तो सांगतोअभिनयाइतकंच मला कार्यक्रमांचं सूत्रसंचालन करायलाही खूप आवडतंखरं तर इतक्या वर्षांनंतर  सूत्रसंचालनाची मला आवडच विकसित झाली आहेआता ‘सा रे   लिटिल चॅम्प्ससारख्या एका प्रतिष्ठित कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करण्याची संधी मला मिळत असल्याचा मला खूप आनंद होत असून मी झी टीव्ही वाहिनीशी नेहमीचनिगडित राहिलो आहेया वाहिनीवर काम करणं म्हणजे स्वगृही परतण्यासारखं आहे.”
सा रे    लिटिल चॅम्प्स’ कार्यक्रमाच्या नव्या आवृत्तीचे सूत्रसंचालन करण्यासाठी रवी दुबेला हार्दिक शुभेच्छा!

पाहा ‘सा रे    लिटिल चॅम्प्सची नवी आवृत्ती लवकरच फक्त झी टीव्हीवर!











मृणाल
 कुलकर्णी दिग्दर्शित ‘ती ती’ ची वाढणार आतुरतानुकतेच प्रदर्शित झाले पुष्करप्रार्थनासोनालीच्या ‘ती & ती’ चे मोशन पोस्टर

मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित आणि पुष्कर जोगप्रार्थना बेहरे आणि 
सोनाली 
कुलकर्णी यांची प्रमुख भूमिका सलेल्या ‘ती & ती’ चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतेचडिजीटल मिडीयावर लाँच करण्यात आले आहेसुरुवातीला ‘ती’ आणि ‘ती’ कोण असा प्रश्न प्रेक्षकांना पडला होता पण काही दिवसां अगोदरच रिलीझ झालेल्या याचित्रपटाच्या पोस्टरमधून प्रेक्षकांना याचे उत्तर मिळाले आहेआता प्रेक्षकांची उत्सुकता वाढवण्यासाठी या चित्रपटाची टीम सादर करत आहे ‘ती & ती’ चे मोशनपोस्टर.

या अर्बन रोमँटिक कॉमेडी चित्रपटात पुष्कर जोगसोनाली कुलकर्णी आणि प्रार्थना बेहरे यांची लीड भूमिका आहे हे सर्वांना ठाऊक झाले आहेपण चित्रपटाचीकथा नेमकी काय असेल याविषयी प्रेक्षकांच्या मनात नक्कीच कुतुहल तया झाले असेलतसेच दिग्दर्शिका म्हणून मृणाल कुलकर्णी यांचा हा तिसरा मराठीचित्रपट आहेत्यामुळे पण या चित्रपटाची आतुरता नेकांना हमखास असणार.

आनंद पंडीत यांच्या मोशन पिक्चर्सच्या सहकार्याने गुझबम्प एंटरटेनमेंट आणि हायपरबीस मिडिया यांनी या चित्रपटाची प्रस्तुती केली आहेपुष्कर जोगआनंदपंडीमोहन नादर हे या चित्रपटाचे निर्माते आहेत तर मोहित छाब्रा हे सहनिर्माते आहेत.

प्रेमाचा लव्ह ट्रँगलएक आगळी-वेगळी इंटरेस्टिंग स्टोरी आणि त्याचसोबतीला चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांची होणारी लंडन सफारी या सर्व गोष्टींमुळे पुष्की उर्फपुष्कर जोगप्रार्थना बेहरे आणि सोनाली कुलकर्णी यांचे फॅन्स देखील ‘ती & ती’ साठी खूपच जास्त आतुर झाले आहेतभन्ना लव्हस्टोरी असलेला ‘ती & तीचित्रपट येत्या  मार्च २०१९ रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.


१५ कोटींहून अधिक भारतीयांना गुडघ्यात संधिवाताचा त्रास
भारतात २०२२ पर्यंत वर्षाला १ दशलक्ष गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होतील

मुंबई, १६ जानेवारी २०१९ – भारतात सुमारे १५ कोटींहून अधिक देशवासी गुडघ्याच्या संधीवाताने त्रस्त आहेत, ज्यापैकी जवळपास ४ कोटी रुग्णांना नी-रिप्लेसमेंट (गुडघा प्रत्यारोपण- टीकेआर)ची गरज आहे. ज्यामुळे देशावर मोठा आरोग्यविषयक ताण असल्याचे जाणवते. या उलट चीनमध्ये साधारण ६.५ कोटी लोकांना संधिवाताची गुडघेदुखी आहे. भारताच्या तुलनेत निम्याहून कमी! पाश्चिमात्य देशांपेक्षा भारतात १५ पटीने अधिक या गुडघेदुखीचे रुग्ण आढळतात. भारतीयांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर संधीवाताची समस्या ही अनुवंशिकतेमुळे तसेच जीवनशैलीत गुडघ्याच्या अधिक वापरापायी होते. असे शालबाय हॉस्पिटल्स, संस्थापक अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. विक्रम शहा म्हणाले.

डॉ. विक्रम शहा म्हणाले की, “मागील २० वर्षांपासून भारतात गुडघे प्रत्यारोपणात अद्वितीय प्रगती झाली, तरीही मागणी वाढतेच आहे. जणूकाही देशात गुडघ्याच्या संधिवाताची साथच आली आहे. भारतात हा आकडा केवळ १५०,००० आहे. तरीच ही मोठी झेप म्हणावी लागेल. कारण १९९४ मध्ये भारतात फक्त ३५० नी-सर्जरी झाल्या होत्या. ज्या वेगाने भारतात गुडघ्याच्या संधिवाताची समस्या वाढते आहे, ती पाहता वर्षाला एक कोटी गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होणे अपेक्षित आहे. यासंबंधी तुलना करता भारतात २०२२ पर्यंत वर्षाला केवळ १ दशलक्ष शस्त्रक्रिया होतील. आजच्या काळात गुडघे प्रत्यारोपणात संसर्गात होण्याचा आकडा अतिशय कमी आहे. तसेच हॉस्पिटलमध्ये फार काळ राहावे लागत नाही.”

ते म्हणाले की: “पुढील दशकभरात गुडघ्याचा संधिवात हा शारीरिक विकलांगतेचे सर्वसाधारण कारण ठरेल. आरोग्यविषयक पायाभूत सुविधा तसेच ऑर्थोपेडीक तज्ज्ञांची असलेली वानवा यामुळे देशातील आरोग्य ताण कठीण होईल. भारतात स्वातंत्र्य काळानंतर सर्वसाधारण आयुष्यमान वाढले असल्याने गुडघ्याचा संधिवात बळावण्यामागचे हे प्रमुख कारण म्हणता येईल. ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर देशातील वयस्कर लोकांना गुडघे प्रत्यारोपणाकडे वळावे लागत आहे.”

डॉ. विक्रम शहा म्हणाले: “भारतात सर्वसाधारणपणे आढळणाऱ्या आर्थरायटीसमध्ये कार्टीलेज झिजणे-भंग होणे सर्रास आढळते. ज्यामुळे गुडघ्याच्या सांध्यांना त्रास होतो. भारतीय महिलांमध्ये, वयाच्या पन्नाशीत गुडघ्याच्या समस्या जाणवण्यास सुरुवात होते. तर पुरुषांमध्ये हा त्रास साठीत जाणवू शकतो. महिलांमध्ये हा विकार जाणवण्याचे मुख्य कारण म्हणजे लठ्ठपणा आणि अपुरे पोषण हे असते. अंदाजे ९०% भारतीय महिलांमध्ये ड-जीवनसत्वाची कमतरता असते. हाडांच्या कार्यवहनात हा घटक महत्त्वाचा ठरतो. भारतीय पारंपरिक जीवनशैली देखील गुडघ्याच्या आरोग्यास अपायकारक ठरते. पालथे बसणे, मांडी घालून बसणे, भारतीय पद्धतीच्या शौचालयाचा वापर, चालताना योग्य पद्धतीच्या पादत्राणांचा वापर न करणे, यामुळे गुडघ्याचा वापर अधिक होऊन गुडघ्यांवर वाजवीपेक्षा अधिक ताण येतो.”

डॉ. विक्रम शहा पुढे म्हणाले की, “संपूर्ण गुडघे प्रत्यारोपण करण्याची प्रक्रिया अतिशय यशस्वी आहे. तिचा उपयोग अर्ध्या शतकापासून करण्यात येतो आहे. याचा यशस्वी दर ९५% इतका असून त्यामुळे रुग्णाच्या जीवनात बदल दिसून येतो. अलीकडच्या काळात नी-आर्थोप्लास्टीमध्ये अनेक नवीन सुधारणा घडल्या आहेत. उदाहरणार्थ, पेशंट-स्पेसीफिक इन्स्ट्रुमेन्ट्स (रुग्णानुरूप शस्त्रक्रिया साधने), जेंडर-स्पेसीफिक नी (रुग्णाच्या लिंगानुरूप गुडघे), कमी काप-छेद येतील अशी शस्त्रक्रियेची तंत्र, त्याचप्रमाणे संपूर्ण गुडघे प्रत्यारोपण करण्यासाठी रोबोचा वापर. अर्थात हे अतिशय खर्चिक आहे, परंतु अनुभव एखाद्या साधारण प्रत्यारोपणासारखा येतो. गुडघे प्रत्यारोपण करण्यातील सर्जनचा अनुभव आणि त्याच्या कौशल्याची जागा इतर कोणताही पर्याय घेऊ शकत नाही. ज्याचा लाभही शेवटी रुग्णाला मिळतो. जर रुग्णांनी सर्जनसह योग्य हॉस्पिटलची निवड केली तर पारंपरिक पद्धतीने गुडघे प्रत्यारोपण करणे हा कायम श्रेयस्कर तसेच किफायतशीर पर्याय ठरतो.”

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...