Thursday, January 17, 2019

रवी दुबे होणार ‘सा रे    लिटिल चॅम्प्स’ कार्यक्रमाचा नवा सूत्रसंचालक!
रवी दुबे म्हणतो, “स्वगृही परतण्यासारखं दुसरं सुख नाही!”

देशभरातील लहान मुलांकडून सादर झालेल्या धमाकेदार गाण्यांनी अनेक वर्षे टीव्हीवर वर्चस्व गाजविलेल्या गायकांचा शोध घेणाऱ्या झी टीव्हीवरील सा रे    लिटिलचॅम्प्स या रिअॅलिटी कार्यक्रमाची नवी आवृत्ती लवकरच प्रसारित होणार आहे. ‘झी टीव्हीवरील ‘सा रे    लिटिल चॅम्प्स’ या रिअॅलिटी कार्यक्रमाची शेवटची आवृत्तीतब्बल नऊ महिने यशस्वीरीत्या पार पडली होतीत्या आवृत्तीने लोकप्रियतेच्या आलेखावर सदैव अग्रस्थान प्राप्त केले होते आणि श्रेयन भट्टाचार्यअंजली गायकवाड आणिछोटे भगवान’ जयसकुमार यासारखे काही अतिशय गुणी बालगायक प्रेक्षकांपुढे सादर केले होतेअशा गुणी बालगायकांचा शोध घेऊन त्यांना इतक्या लहान वयात त्यांचीगायनकला व्यापक प्रेक्षकांपुढे सादर करण्यासाठी सुयोग्य व्यासपीठ देण्याची परंपरा पुढे चालवीत या कार्यक्रमाने आता नव्या बालगायकांच्या शोधासाठी या कार्यक्रमाची नवीआवृत्ती जाहीर केली आहे. ‘सा रे    लिटिल चॅम्प्सच्या या नव्या आवृत्तीबद्दल एक विशेष महत्त्वाची घडामोड म्हणजे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आता तरुणींच्याहृदयची धडकन असलेला देखणा अभिनेता रवी दुबे करणार आहे!

झी टीव्हीवरील अत्यंत लोकप्रिय जमाई राजा  या मालिकेत नायकाची भूमिका सादर केल्यानंतर रवी दुबे हा गुणी अभिनेता आता या वाहिनीवर तब्बल तीन वर्षांनी परतणारआहेरवी म्हणालामाझं लहान मुलांशी एक भक्कम नातं असून मला त्यांच्या अवतीभोवती राहायला आवडतंमी या कार्यक्रमाचा सूत्रसंचालन करण्याची जबाबदारीस्वीकारली याचं खरं कारण असं की तब्बल 23 वर्षांनंतरही भारतातील गाणंविषयक अस्सल रिअॅलिटी कार्यक्रम हे आपलं स्थान ‘सा रे    लिटिल चॅम्प्स’ कार्यक्रमानेकायम राखलं आहेआपल्या कार्यक्रमात सतत बदल करून त्याने प्रेक्षकांच्या अभिरुचीशी नातं कायम ठेवलं असून इतक्या वर्षांत या कार्यक्रमातून जे गुणी गायक तयार झालेआहेतत्यांच्याबद्दल मला खूपच आदर आहे.”

तो सांगतोअभिनयाइतकंच मला कार्यक्रमांचं सूत्रसंचालन करायलाही खूप आवडतंखरं तर इतक्या वर्षांनंतर  सूत्रसंचालनाची मला आवडच विकसित झाली आहेआता ‘सा रे   लिटिल चॅम्प्ससारख्या एका प्रतिष्ठित कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करण्याची संधी मला मिळत असल्याचा मला खूप आनंद होत असून मी झी टीव्ही वाहिनीशी नेहमीचनिगडित राहिलो आहेया वाहिनीवर काम करणं म्हणजे स्वगृही परतण्यासारखं आहे.”
सा रे    लिटिल चॅम्प्स’ कार्यक्रमाच्या नव्या आवृत्तीचे सूत्रसंचालन करण्यासाठी रवी दुबेला हार्दिक शुभेच्छा!

पाहा ‘सा रे    लिटिल चॅम्प्सची नवी आवृत्ती लवकरच फक्त झी टीव्हीवर!










No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

India Sets the Global Jewellery Calendar with Grand Opening of IIJS Bharat – Signature 2026

  India Sets the Global Jewellery Calendar with Grand Opening of IIJS Bharat – Signature 2026 IIJS Bharat – Signature 2026 to expected to ge...