राज भवनतर्फे जीटीडीसीच्या सहकार्याने ऐतिहासिक राज भवन दर्शन आज
• 5 जानेवारीपासून राज भवनाचे दरवाजे स्थानिक आणि पर्यटकांसाठी खुले
• आठवड्यातून तीनदा केले जाणार सहलींचे आयोजन
• ऑनलाइन आणि आगाऊ नोंदणी बंधनकारक
पणजी, जानेवारी – गोव्याच्या माननीय राज्यपाल श्रीमती मृदुला सिन्हा यांनी आज ऐतिहासिक राज भवन सहलीचे राज भवन दर्शन या नावाने डोना पावला येथील राज भवनच्याप्रेक्षकांसाठी उद्घाटन केले.
उद्घाटनाच्या मोठ्या शानदार सोहळ्यासाठी माननीय पर्यटन मंत्री श्री. मनोहर आजगांवकर, माननीय अध्यक्ष, श्री. दयानंद सोप्टे आणि इतर मान्यवर व अधिकारी उपस्थित होते.
उद्घाटनानंतर राज भवन सहल पर्यटकांसाठी 5 जानेवारी 2019 पासून सुरू होईल. पर्यटक तसेच स्थानिक प्रेक्षकांना आता राज भवनाचा वारसा आणि इतिहास, त्याचा निसर्गरम्यपरिसर, हिरवेगार बगिचे पाहाता येणार आहेत तसेच त्याचबरोबर राज्यपालांनी हाती घेतलेले विविध उपक्रमही अनुभवता येतील. त्यात घन कचरा व्यवस्थापन, जल संवर्धन, सौरउर्जा यांचा समावेश असेल. ही सहल सामान्य पर्यटकांसाठी केवळ शुक्रवार, शनीवार आणि रविवारी खुली असेल.
सहलींचे आयोजन दोन बॅचेसमध्ये केले जाणार असून प्रत्येक बॅचमध्ये 50 पर्यटकांचा समावेश असेल. सहलीची पहिली 50 पर्यटकांची बॅच दुपारी 2.30 ते 4.00 या दरम्यान आणिदुसरी 50 पर्यटकांची बॅच दुपारी 4.30 ते संध्याकाळी 6.00 दरम्यान आयोजित केली जाईल. संपूर्ण सहलीचे आयोजन गोवा पर्यटन विकास महामंडळातर्फे केले जाईल. राज भवनदर्शनाची आगाऊ नोंदणी केवळ ऑनलाइन केली जाईल. https://bookings.rajbhavan. goa.gov.in.
भेटीच्या आधी किमान तीन दिवस आगाऊ नोंदणी करणे आवश्यक असून पोलिस पडताळणीनुसार प्रवेश दिला जाईल. नोंदणी केल्यानतंर पर्यटकांना सहल नक्की झाल्याचेएसएमएस/ईमेलद्वारे कळवले जाईल. प्रवेश शुल्क प्रती व्यक्ती 300 रुपये असे निश्चित करण्यात आले असून ते सहल आरक्षणावेळेस ऑनलाइन भरावे लागेल.
No comments:
Post a Comment
GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST