Friday, January 11, 2019


&TVच्या 'लाल इश्क'मध्ये नीता शेट्टी बनली नागिन
&TV वरील लाल इश्क या मालिकेने आपल्या प्रेमकथांना सुपरनॅचरल ट्विस्ट दिल्याने हा अनोखा प्रयोग प्रेक्षकांना आकर्षित करून घेत आहे. लाल इश्कच्या आगामी भागातही अशीच एक गुंतवून ठेवणारी कथा सादर होणार आहे. या कथेत प्रसिद्ध अभिनेत्री नीता शेट्टी नागिनच्या रुपात दिसणार आहे. नीता या आधीही &TV च्या मेरी हानिकारक बिवीमध्ये गुल्की आणि परमावतार श्रीकृष्ण या मालिकेत देवी योगमाया या भूमिकांमध्ये दिसली आहे. अतिशय आकर्षक आणि लक्षवेधी रुपाची देणगी असलेली नीता शेट्टी आता नागिणीची भूमिका करण्यास सज्ज झाली आहे. तिच्या मोठ्या आणि आकर्षक डोळ्यांमुळे या व्यक्तिरेखेला अधिक उभारी येणार आहे. आजवर तिने साकारलेल्या भूमिकांच्या तुलनेत या मालिकेतील लुक फारच वेगळा आहे. याआधी या अभिनेत्रीने कधी गावातील साध्या मुलीची भूमिका केलेली नाही. आता लाल इश्कमुळे तिला नागिणीच्या भूमिकेतून आपले अभिनय कौशल्य दाखवण्याची संधी मिळणार आहे.
बिहारमध्ये घडणारी या भागातील कथा आपल्याला चेन्नीलाल आणि त्याची दोन मुले, धर्मा (मयंक गांधी) आणि मंगत यांचे आयुष्य, त्यातील उलथापालथ दाखवेल. चेन्नीलाल (मुंगूस) बऱ्याच काळापासून आपला मुलगा धर्मा (नाग) याला ठार मारण्‍यासाठी योजना आखत असतो. चेन्नीलालचा दुसरा मुलगा मंगत मणिकाला (नीता शेट्टी) भेटतो आणि तिच्या प्रेमात पडतो. सुरुवातीला असे वाटते की, मणिका धर्माला ठार मारण्‍यासाठी आली आहे. पण शेवटी समजते की, मणिका ही नागिन असून धर्मा म्‍हणजेच नागाची प्रेमिका आहे आणि ती त्‍याचे वडिल चेन्नीलाल मुंगूसपासून त्‍याला वाचवायला आलेली असते. मणिकाला नागिणीचे रूप घेताना पाहणे फारच औत्सुक्याचे असणार आहे. शिवाय, तिने हे रूप का धारण केले, हेही विचार करायला लावणारे आहे.
या मालिकेतील आपल्या नव्या भूमिकेविषयी नीता म्हणाली, “लाल इश्कमुळे मला मणिका म्हणजेच एका नागिणीची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. हे मी याआधी कधीच केलेले नाही. शिवाय, या लुकमुळे माझ्या सौंदर्याला, खास करून डोळ्यांना फारच उठाव मिळाला. मला याची अनोखी पटकथा फारच आवडली आणि या कार्यक्रमाचा भाग होताना मला आनंद वाटतो. भूमिका निवडताना मी काहीशी प्रयोगशील असते. त्यामुळे, मला प्रत्येकवेळी पडद्यावर पाहताना प्रेक्षकांना काही नवे मिळू शकेल. ही भूमिका मी सहज पार पाडली यामागे निर्मात्यांनी माझ्यावर टाकलेला विश्वास आहे.”
साप आणि मुंगुसाची प्राचीन कथा लाल इश्कच्या या भागातून पुन्हा एकदा जिवंत होणार आहे. शिवाय, यातील सुपरनॅचरल ट्विस्टमुळे आपल्याला आश्चर्याचा धक्काही बसणार आहे. मणिका धर्माला वाचवू शकेल का? चेन्नीलालच्या मदतीने मणिका धर्माला मारेल का? जाणून घेण्यासाठी हा भाग पहा.
अधिक जाणून घेण्यासाठी धर्मा आणि मणिकामधील रहस्यमय प्रेमाची कथा पहा &TV च्या लाल इश्कमध्ये दर शनिवार आणि रविवार रात्री १० वाजता फक्त &TV वर!






No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...