Thursday, January 10, 2019



एक अनाथ- ज्याने आपल्या कुटुंबाला दत्तक घेतले!
अनेक संकटे झेलूनही आपल्या कुटुंबियांना एकत्र राखणाऱ्या आदर्श मुलाची कथा सांगणारी नवी मालिका लवकरच झी टीव्हीवर!
येत्या 15 जानेवारी 2019 पासून प्रारंभ होणाऱ्या मालिकेचे सोमवार ते शनिवार संध्याकाळी 6.30 वाजता प्रसारण
मुंबई, 8 जानेवारी 2019: जरी त्याला दत्तक घेतले गेले असले तरी त्या परिवाराला मनापासून स्वीकारून आपल्या कुटुंबियांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याची कला त्याला अवगत आहेतो आपल्या कुटुंबाला एकत्र बांधणारा धागा आहे… ‘ज्या गोष्टी एरवी कुटुंबातील एखादी स्त्री किंवा सूनच करू शकते’, असे मानले जाते, त्या सर्व गोष्टी त्रिपाठींच्या घरातील वेदांत हा सहज आपले कर्तव्य समजून स्वत: करतो. ‘झी टीव्हीवरील राजा बेटा या आगामी मालिकेत वेदांत या एका आदर्श मुलाची कथा सादर करण्यात आली आहे. गंगादत्त त्रिपाठी यांनी कुटुंबात दत्तक घेतलेला वेदांत हा मुलगा मोठेपणी नामवंत स्त्रीरोगतज्ज्ञ होतो. पण गंगादत्त यांचा स्वत:चा मुलगा रमेश हा वाया गेलेला असतो. त्याला आपल्या वडिलांनी एका अनाथ मुलाला दत्तक घेतलेले अजिबात पसंत नसते. पण आपले आजी आजोबा यांच्या प्रेमामुळे मनातून नाराज असलेल्या रमेशबरोबर वेदांत ही  लहानाचा मोठा होतो. रमेश ज्या गोष्टी करू शकत नाही, त्या सर्व गोष्टी वेदांत अगदी सहजपणे हसत मुख स्वभावाने करतो. जे कुटुंबीय त्याला आपला मानीत नाहीत, पण आपल्या हितासाठी, स्वार्थासाठी, आपली सर्व काम करवून घेण्यासाठी सर्व बाबतीत त्याच्यावरच अवलंबून राहतात, अशा घरात तो वाढतो. त्यामुळे ज्यांना तो आपले कुटुंबीय मानीत असतो, त्यांच्याकडून त्याच्या वाट्याला बहुसंख्य वेळा उपेक्षा, अवहेलना आणि अत्याचारच येतात. पण नियती वेदांतचे विधिलिखत बदलेल काय ? आणि जी व्यक्ती त्याचा स्वीकार करते, तिचे प्रेम त्याला लाभेल काय? केवळ काळच त्याचे उत्तर देईल. सोबो फिल्म्सची निर्मिती असलेल्या या मालिकेस येत्या 15 जानेवारी 2019 पासून प्रारंभ होणार असून ती सोमवार ते शनिवार संध्याकाळी 6.30 वाजता प्रसारित केली जाईल.
झी टीव्हीच्या व्यवसाय विभागाच्या प्रमुख अपर्णा भोसले म्हणाल्या, सरत्या 2018 वर्षात आम्ही फारच जोरात सांगता केली. त्या वर्षी सामाजिक संदेश देणाऱ्या मालिकांपासून जीवनाचं वास्तववादी दर्शन घडविणाऱ्या तसंच अमनवी शक्तींवरील रंजक फॅण्टसी मालिकांपर्यंत विविध प्रकारच्या विषयांवरील मालिका आम्ही प्रेक्षकांच्या भेटीला आणल्या. आता 2019 वर्षाचा प्रारंभ आम्ही राजा बेटा या एका अनोख्या मालिकेने करीत आहोत. एरवी साऱ्या कुटुंबाला एकत्र बांधणारी एक स्त्री असते, या संकल्पनेऐवजी आम्ही एका कुटुंबात दत्तक गेलेल्या अनाथ मुलाची कथा सादर करणार असून हा मुलगाच या कुटुंबाला एकत्र बांधून ठेवणारा धागा आहे, अशी याची संकल्पना आहे. एका परीने जो स्वत: दत्तक गेला  आहे, तोच नंतर या आपल्या कुटुंबियांना दत्तक घेतो, अशी यामागील संकल्पना आहे. कुटुंबातील ज्या जबाबदाऱ्या परंपरेने स्त्रीच्या आहेत, असं मानलं जातं, त्या समजुतीला धक्का देत वेदांतची व्यक्तिरेखा हा घरगुती जबाबदारीचा लिंगभेद नष्ट करण्याचा संदेश देशातील पुरुषजातीला देते. या गंभीर आणि भावनाप्रधान मालिकेद्वारे संध्याकाळच्या वेळेतील मालिकांची स्वीकृती वाढविण्याचा आमचा प्रयास आहे.”
मालिकेची निर्मिती करणाऱ्यासोबो फिल्म्सच्या स्मृती शिंदे यांनी सांगितले, “‘राजा बेटाया मालिकेद्वारे मी हिंदी मालिकांच्या क्षेत्रात पदार्पण करीत आहे. अर्थातझी समूहाबरोबरचा माझा संबंध जुना असूनझी मराठीवाहिनीसाठी मी तुझ्यात जीव रंगला ही मालिका तयार केली होती, तेव्हापासूनचा आहे. गंगादत्त त्रिपाठी यांनी कुटुंबात दत्तक घेतलेला वेदांत हा मुलगा मोठेपणी नामवंत स्त्रीरोगतज्ज्ञ होतो. पण मुरारी यांचा स्वत:चा मुलगा रमेश हा वाया गेलेला असतो. त्याला आपल्या वडिलांनी एका अनाथ मुलाला दत्तक घेतलेलं अजिबात पसंत नसतं. पण वेदांत आपले दादा-दादी यांच्या प्रेमामुळे त्याच्यावर मनातून नाराज असलेल्या रमेशबरोबर लहानाचा मोठा होतो. रमेश ज्या गोष्टी करू शकत नाही, त्या सर्व तो करतो. जरी त्याचे कुटुंबीय त्याला प्रेम आणि आपलेपणा देऊ शकत नसले, तरी या कुटुंबाने आपल्याला एक नाव दिलं आणि आपला सांभाळ केला या कृतज्ञ भावनेपोटी वेदांत या कुटुंबाला आपलं सर्वस्व देतो. या मालिकेचं चित्रीकरण आम्ही जयपूरमध्ये करीत आहोत. ज्यांनी या मालिकेतील सर्व व्यक्तिरेखा नीट समजून उमजून साकारल्या आहेत, अशी उत्तम कलाकारांची टीम त्यात भूमिका साकारीत आहे. झी टीव्हीबरोबर असलेल्या संबंधांमुळे मला माझा गौरव झाल्यासारखं वाटतं आणि आता हे संबंध आम्ही या नव्या मालिकेद्वारे अधिकच वरच्या स्तरावर नेण्याचा प्रयत्न करू.”
या मालिकेतील वेदांत त्रिपाठीच्या प्रमुख भूमिकेसाठी तडफदार आणि देखण्या राहुल सुधीरची निवड करण्यात आली आहे. या भूमिकेद्वारे तो हिंदी मालिकांच्या क्षेत्रात पदार्पण करीत आहे. या मालिकेतील पूर्वा मिश्रा नावाच्या नायिकेच्या भूमिकेद्वारे संभाबना मोहंती या रूपसंपन्न अभिनेत्री टीव्ही मालिकांमध्ये पदार्पण करणार आहे. पूर्वा मिश्रा ही स्त्रीवादी असून ती आपल्या तत्त्वांशी कधीच तडजोड करीत नाही. तिची धाकटी बहीण पंखुडीच्या भूमिकेत अभिनेत्री फेनिल उम्रीगर आहे.
आपल्या या व्यक्तिरेखेबाबत राहुल सुधीर म्हणाला, मी वेदांत त्रिपाठी या नायकाची भूमिका रंगविणार आहे. वेदांतला नातेसंबंध टिकवून धरण्याची आणि कौटुंबिक मूल्ये उचलून धरण्याची कला अवगत असते. तो अनाथ असल्याने जी नाती एरवी प्रत्येकाला जन्मत: प्राप्त होतात, त्यापासून तो वंचित असतो. म्हणूनच  तो त्याच्या जीवनातील प्रत्येक नात्याला घट्ट पकडून ठेवतो. हे नातं त्याला जन्मजात मिळालेलं नसतं आणि म्हणूनच तो कोणतंही नातं मिटवून टाकीत नाही आणि त्याला आपल्याकडून सर्वस्व देतो. वेदांतच्या व्यक्तिरेखेद्वारे मी आदर्श पुरुषाच्या रूढ आणि साचेबध्द समजुतीला, प्रतिमेला छेद देण्याचा प्रयत्न करणार असून घरातील पुरुष असाही असू शकतो, हेच दाखवून देणार आहे.  त्याशिवाय या मालिकेचं कथानक हे मनाची पकड घेणारं, उत्कंठावर्धक आणि प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करणारं आहे. टीव्हीवरील ही माझी पहिलीच मालिका असून प्रेक्षकांना माझी व्यक्तिरेखा आवडावी, यासाठी मी कसून प्रयत्न करणार आहे.”
आपल्या व्यक्तिरेखेबद्दल संभाबना मोहंती म्हणाली, मला टीव्ही मालिकांच्या माध्यमातून माझ्यातील अभिनेत्रीचा शोध घेण्याची इच्छा होती आणि म्हणूनचराजा बेटासारख्या मालिकेत मला भूमिका साकारण्याची संधी मिळत असल्यामुळे मी अतिशय उत्साहित झाले आहे.  या मालिकेत मी पूर्वा मिश्राची भूमिका रंगविणार आहे. पूर्वा ही आजच्या काळातील स्वतंत्र विचारांची आणि स्वत:च्या मतांवर विश्वास असणारी मुलगी आहे. पण ती कुटुंबवत्सलही आहे.  कुटुंबातील पुरुषांच्या स्थानाची चाकोरी मोडणाऱ्या या मालिकेच्या संकल्पनेमुळे मी या मालिकेकडे ओढली गेले. ही माझी पहिलीच टीव्ही मालिका असून ही भूमिका साकारण्यास मी खूप अधीर झाले आहे.”
अभिनेत्री फेनिल उम्रीगर म्हणाली, मी या मालिकेत पंखुडीची भूमिका रंगवीत आहे. ती एक लाघवी मुलगी असून तिची बहीण आणि आजी यांच्यावर तिचं अतिशय प्रेम आहे. ती आपल्या बहिणीला नेहमीच पाठिंबा देते आणि ती तिच्यावरच अवलंबून असते. मला केवळ या मालिकेचीच उतसपुकता लागून राहिली आहे, असं नव्हे, तर मी पुन्हा एकदा झी टीव्हीसाठी भूमिका साकारीत आहे, याचाही मला खूप आनंद झाला आहे. मी यापूर्वी झी टीव्हीवरील काला टीका या मालिकेत गौरीची भूमिका साकारली होती. त्या भूमिकेची प्रेक्षकांकडून खूपच प्रशंसा झाली होती. आता राजा बेटातील भूमिकेमुळेही मला पुन्हा पूर्वीइतकंच प्रेम लाभेल, अशी मी आशा करते.”
नियती वेदांतचे विधिलिखत बदलणार असते काय आणि जी व्यक्ती त्याचा स्वीकार करते, तिचे प्रेम त्याला लाभेल काय? तसेच त्याचा सदैव दुस्वास करणारे त्याचे कुटुंबीय त्याचे महत्त्व ओळखून त्याचा मनापासून स्वीकार करतील काय आणि त्याला प्रेम देतील काय?
15 जानेवारीपासून पाहाराजा बेटासोमवार ते शनिवार संध्याकाळी 6.30 वाजता फक्तझी टीव्हीवर!










No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...