Thursday, January 24, 2019


२६ आणि २७ जानेवारीला साऊथ मुंबईचा आयकॉनिक फेस्टिव्हल वरळी फेस्टिव्हल 5.0’

साऊथ मुंबईचा सर्वात लोकप्रिय आणि आयकॉनिक फेस्टिव्हल वरळी फेस्टिव्हल 5.0’ २६ आणि २७ जानेवारी २०१९ रोजी वरळी सी फेस प्रोमेनेड येथे आयोजित करण्यात आला आहे. वरळी फेस्टिव्हलचं हे पाचवं वर्ष आहे आणि हे पाचवं वर्ष म्युझिक-फूड-फन या सर्व गोष्टींमुळे जल्लोषात साजरं होणार आहे. वरळीसारख्या नयनरम्य ठिकाणी लाईफ सेलिब्रेशनही या वर्षाची थीम आहे.

२६ आणि २७ जानेवारी संपूर्ण वरळी सी-फेस हे एका उत्सवपूर्ण वातावरणाने भरुन जाणार आहे. आठ पेक्षाही अधिक बँड्स आणि आर्टिस्टने सजलेले १४ लाईव्ह परफॉर्मन्स स्टेज या फेस्टिव्हलला भेट देणा-या प्रेक्षकांना अनुभवयाला मिळणार आहेत. बँड ऑफ बॉईज्’, ‘युफोनी’, ‘चारु सेमवल’, ‘शिबानी कश्यप’, ‘एन. कुलकर्णी’, ‘मोहित कपूर’, ‘राहूल गोम्सहे आणि असे अनेक नामांकित आर्टिस्ट्सचे परफॉर्मन्स येथे रंगणार आहेत.

म्युझिकसोबतच चविष्ट पदार्थांचाही आस्वाद या पाचव्या वरळी फेस्टिव्हल मध्ये घेता येणार आहे. ज्यामध्ये वेगवेगळ्या खाद्यसंस्कृतीचा समावेश असणार आहे. पुरस्कार विजेते हिंदुस्थानी शास्त्रीय गायक यांचा मॉर्निग रागाहा खास कार्यक्रम २७ जानेवारीला सकाळी ६ वाजता आयोजित केला जाणार आहे. याव्यतिरिक्त वरळीचे मुळ रहिवाशी असणा-या कोळी समाजाचे सांस्कृतिक कार्यक्रम देखील होणार आहेत.

 हा फेस्टिव्हल लहान मुलांसाठी पण मजेशीर ठरणार आहे. इमॅजिकाच्या स्टार्ससोबत मीट अँड ग्रीट’, ट्विन ट्रिंग बायसाकल्स राईड असे रंजक खेळ लहान मुलांसाठी असणार आहेत.

गेल्या वर्षी, या फेस्टिव्हलला एक लाखांहून अधिक प्रेक्षकांनी भेट दिली होती. आपल्या कुटुंबांसोबत, मित्र परिवारासोबत तुम्हांला विकेंड स्पेशल बनवायचा असेल तर २६ आणि २७ जानेवारी या दोन दिवशी वरळी फेस्टिव्हलला नक्की भेट द्या. संगीतमय वातावरणात, चविष्ट पदार्थांची चव घ्या आणि समुद्राच्या किनारी नयनरम्य ठिकाणी विकेंड खास बनवा.

सचिन अहिर, संगीता अहिर आणि ओक्स मॅनेजमेंट कन्सलटन्सी प्रा. लि.चे डिरेक्टर राहूल गोम्सने पुढाकार घेतलेल्या वरळी फेस्टिव्हल 5.0’ ला श्री. संकल्प प्रतिष्ठान यांनी पाठिंबा दिला आहे.




No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

India Sets the Global Jewellery Calendar with Grand Opening of IIJS Bharat – Signature 2026

  India Sets the Global Jewellery Calendar with Grand Opening of IIJS Bharat – Signature 2026 IIJS Bharat – Signature 2026 to expected to ge...