Thursday, January 24, 2019


गोलमालनंतर आता होणार धमाल… ‘टोटल धमाल

संगीता अहिर मुव्हि़जया भारतीय फिल्म प्रॉडक्शन आणि डिस्ट्रीब्युशन कंपनीने आतापर्यंत बॉलिवूड, प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय सिनेमांच्या माध्यमातून प्रेक्षकांसाठी अनेक मनोरंजक सिनेमे आणले आहेत. नवीन वर्षाची धमाल सुरुवात देखीलसंगीता अहिर मुव्हि़जने केली आहे. कारण इंद्र कुमार दिग्दर्शितटोटल धमालया आगामी बॉलिवूड सिनेमाची सहनिर्मितीसंगीता अहिर मुव्हि़जने केली असून संगीता अहिर या सिनेमाची सहनिर्माती आहे.

अजय देवगण, अनिल कपूर, माधुरी दीक्षित, रितेश देशमुख, महेश मांजरेकर, अर्षद वारसी आदी कलाकारांची प्रमुख भूमिका असलेलाटोटल धमालसिनेमा येत्या २२ फेब्रुवारीला रिलीझ होत आहे. संगीता अहिर यांनी अजय देवगणच्यागोलमाल अगेनया सिनेमाची पण निर्मिती केली होती. संगीता अहिर मुव्हि़जचं अजय देवगणसोबत बेस्ट असोसिएशन असल्यामुळे अजय देवगणच्या या सिनेमातही निर्माती संगीता अहिर यांचा देखील मोलाचा वाटा आहे. त्यामुळे गोलमाल नंतर आता नवीन वर्षात पुन्हा एकदा होणार धमाल... ‘टोटल धमाल’.





No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...