Wednesday, January 9, 2019


सोनू निगमच्या आवाजातील 'रकम्मा' गाण्यावर निकम्मा होऊन अभिनय करणार हटके डान्स आणि करणार आशिकी खास
प्रेम, कनफेशन, इमोशन आणिअशी ही आशिकी’; प्रेमात पडणे ते आशिकी करणे हा संपूर्ण प्रवास निराळाच असतो. हाच निराळा प्रवास अनुभवण्यासाठी आणि नवीन वर्षात आशिकी करायला भाग पाडण्यासाठी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतेयअशी ही आशिकी’. 
गुलशन कुमार प्रस्तुत, टी-सिरीजचे भूषण कुमार आणि क्रिशन कुमार निर्मित आणि सचिन पिळगांवकर दिग्दर्शितअशी ही आशिकीचित्रपटाचा टीझर रिलीझ झाल्यानंतर अभिनय बेर्डे आणि हेमल इंगळे साकारत असलेल्यास्वयम-अमरजाच्या लव्हस्टोरीविषयी जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. नवीन विषय, नवीन जोडी, चित्रपटाचे कॅची नाव आणि प्रेक्षकांच्या भेटीला आलेला टीझर आदी गोष्टी चित्रपटाविषयीची आतुरता वाढवत आहेत. इतकेच नव्हे तर, १४ फेब्रुवारीला व्हॅलेंनटाईन्स डे ऐवजी AHA Day साजरा होणार म्हणजे नेमकं काय हॅपनिंग पाहायला मिळणार याविषयी देखील कुतुहल अनेकांच्या मनात आहे.

कॉन्फिडंट, फ्रि-मांइडेड असलेले स्वयम आणि अमरजा, या कपलची आशिकीची जर्नी जितकी चित्रपटातून फुलणार आहे तितकीच त्यांची लव्हस्टोरी गाण्यांतून पण तितकीच फुलणार आहे. प्रेमात जस-जसे अनेक टप्पे पार पाडावे लागतात, जसे की पहिली भेट, पहिली आठवण वैगरे वैगरे... तसंच काहीसं या प्रेमात पण होणार आहे. स्वयम आणि अमरजाच्या आशिकीची थोडीशी हिंट देण्यासाठी नुकतेच या चित्रपटातीलरकम्माहे गाणं डिजीटल मिडीयावर रिलीज करण्यात आले आहे.
रकम्माया गाण्यातून आपल्याला या गोष्टीची कल्पना येते की स्वयम निकम्मा होऊन रकम्माला शोधतोय. पण अमरजच्या प्रेमात असलेला स्वयम अचानकपणे रकम्माला का शोधतोय आणि मुळात कोण आहे ही रकम्मा अशा अनेक प्रश्नांची उत्तरे लवकरच प्रेक्षकांना मिळणार आहेत. 

या गाण्याच्या निमित्ताने मराठी प्रेक्षकांना नवीन वर्षात पण सोनू निगमच्या आवाजाची जादू अनुभवयाला मिळणार आहे. सोनू निगम यांनीरकम्माहे गाणे गायले आहे. इतकेच नव्हे तर, सोनू यांनी या चित्रपटातील सगळी गाणी गायली आहेत आणि या चित्रपटाच्या गाण्यांना सचिन पिळगांवकर यांनी संगीत दिले आहे. त्यामुळे सोनू निगम यांचा आवाज आणि सचिनजी यांचं संगीत असल्यामुळेअशी ही आशिकीचा म्युझिकल अल्बम प्रेक्षकांसाठी जणू एक म्युझिकल ट्रिट नक्कीच असेल.
मुव्हिंग पिक्चर्स आणि सुश्रिया चित्र यांनी देखीलअशी ही आशिकीची निर्मिती केली असून वजीर सिंह, जो राजन आणि सुप्रिया पिळगांवकर हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. सचिन पिळगांवकर यांनी या चित्रपटाची लिहिलेली कथा-पटकथा-संवाद आणि स्वयम-अमरजाची आशिकी प्रेक्षकांना १४ फेब्रुवारीला अनुभवयाला मिळेल.




https://www.youtube.com/watch?v=us0nWy35O6I&authuser=0

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...