Thursday, January 24, 2019


अंगुरी भाभी बनली नागीण

सध्या टेलिव्हिजनवर सगळीकडेच भुताटकी आणि पारलौकिकतेशी निगडित कथा अधिकाधिक रंगत चालल्या आहेत. आता, &TVवरील 'भाभीजी घर पर है' मालिकेतील अंगुरी भाभी ऊर्फ शुभांगी हिला नागिणीच्या अवतारात पाहण्याची धमाल प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. तिच्या अनोख्या हालचालींनी आपल्याला आश्चर्यचकित करण्यासाठी ती येते आहे, सावध रहा..

आपल्या विनोदी टायमिंगसाठी लोकप्रिय झालेले पात्र म्हणजे अंगुरी भाभी.. तिच्या या टायमिंगमुळेच भाभीजी हे पात्र प्रेक्षकांना कायमच रोमांचित करत असते. शुभांगी म्हणजेच अंगुरी हे पात्र कायमच लोकप्रिय ठरले असून तिच्या निरागस व्यक्तीमत्वाबद्दल लोकांनी तिला डोक्यावर घेतले आहे. आता, तिच्या या नव्या नागीण अवतारामुळेही प्रेक्षक अवाक होणार आहेत. 'भाभीजी घर पर है' या मालिकेतल्या मॉडर्न कॉलनीतले विभूती, तिवारी आणि अंगुरी हे तिघे पिकनिकसाठी बाहेर गेले आहेत, असे आगामी भागात आपण पाहणार आहोत. पिकनिकदरम्यान, हे तिघे एका हवेलीत येतात. या हवेलीत प्रवेश केल्यावर विभूतीसोबत काही विचित्र घटना घडायला सुरूवात होते. नक्की काय होते आहे, हे कुणालाच समजत नाही आणि अचानक विभूतीसमोर अंगुरी भाभी नागीण अवतारात उभी राहते.

शुभांगी म्हणाली, “टेलिव्हिजनवर प्रथमच नागीण साकारण्यासाठी मी फार उत्सुक होते. या विनोदी मालिकेत आता प्रथमच जरा गूढपणा येणार आहे. अंगुरी प्रथमच नागीण अवतारात येणार असल्यामुळे प्रेक्षकांसाठी ही उत्तम मेजवानीच असणार आहे. विभूतीसोबत इतक्या गूढ घटना का घडताहेत, यामागचे रहस्य उलगडत जाताना ही कथा अधिकच मजेशीर होत जाणार आहे.’’

अंगुरी भाभी नागीण कशी बनते आणि विभूतीसोबत इतक्या भयानक आणि गूढ घटना का घडताहेत, हे पाहणे फारच रोमांचक असणार आहे.

अधिक जाणून घेण्यासाठी पहात रहा, 'भाभीजी घर पर है', सोमवार ते शुक्रवार रात्री १०.३० वाजता
केवळ &TV वर







No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

Chhaava Roaring in Theatres. 424.76 Cr Non-Stoppable....

Chhaava Roaring in Theatres. 424.76 Cr Non-Stoppable.... #Chhaava kicks off Week 3 with a bang! Rakes in 13.30 Cr on 3rd Friday, taking its ...