‘झी
टीव्ही’वरील
‘मनमोहिनी’मध्ये
राखी सावंत
खळबळ निर्माण
करणार!
‘झी
टीव्ही’वरील ‘मनमोहिनी’
मालिकेचा
नायक
राम (अंकित
सिवाच) आपली
या
जन्मातील
पत्नी
सिया (गरिमा
सिंह
राठोड) आणि 500 वर्षांपूर्वीच्या
जन्मातील
प्रेयसी
मोहिनी
(रेहना
पंडित) यांच्या
प्रेमाच्या
जाळ्यात
सापडला
आहे. आता
आधीच
गोंधळ
असलेल्या
कथानकातील
गुंतागुंत
वाढविण्यासाठी
या
मालिकेत
चखुआ
या
नव्या
व्यक्तिरेखेचा
प्रवेश
होणार
असून
ही
नवी
भूमिका
बॉलीवूडमधील
बिनधास्त
अभिनेत्री
राखी
सावंत
रंगविणार
आहे.
बेहरामगडच्या सीमेच्या
बाहेर
मोहिनी
पाऊल
टाकू
शकत
नसल्याने
रामला
आपल्या
कब्जात
कसे
मिळविता
येईल, यासाठी
मदत
घेण्यासाठी
मोहिनी
चकाऊला
बेहरामगडमध्ये
निमंत्रित
करते. चखुआ ही
एक
चुडैल
असते. चखुआ
रामला
मोहिनीकडे
सुपूर्द
करते
खरी; पण
ती
स्वत:च
रामच्या
प्रेमात
पडते. परिणामी
ती
राम, सिया
आणि
खुद्द
मोहिनी
यांच्यासाठीही
नवी
वैरीण
बनते. त्यामुळे
रामला
आपल्याकडे
राखण्यासाठी
मोहिनी
आणि
चखुआ
यांच्यात
अटीतटीचा
संघर्ष
होतो. शेवटी
रामला
चखुआपासून
दूर
ठेवण्यासाठी
मोहिनी
सियाचीच
मदत
घेते!
मालिकेतील आपल्या
प्रवेशाबद्दल
राखी
सावंत
म्हणाली,
“मला
असे
भुताखेतांचे
चित्रपट
आणि
मालिका
पाहायला
खूपच
आवडतात
आणि
मलाही
अशा
एखाद्या
मालिकेत
भूमिका
रंगविण्याची
इच्छा
होती. आता
मला
मनमोहिनी
मालिकेत
एका
चेटकिणीची
भूमिका
मिळाली
असून
ती
ताकदवान
आणि
मिश्किलही
असते. रामाला
वश
करण्याच्या
मोहिनी
आणि
चखुआ
यांच्यातील
चढाओढीमुळे
मालिकेच्या
कथानकाला
नवी
वळणे
मिळतील
आणि
प्रेक्षकांना
काही
थक्क
करणारे
प्रसंग
पाहायला
मिळतील.
मी
आता
बऱ्याच
वर्षांनी
टीव्हीवरील
कार्यक्रमात
भूमिका
रंगवीत
असून
त्यामुळे
मी
खूपच
उत्साहित
झाले
आहे. माझा
हा
नवा
अवतार
माझ्या
चाहत्यांना
आवडेल, अशी
मी
आशा
करते.”
प्रेक्षकांना या
दोन
चुडैलमधील
संघर्षाबरोबरच
त्यांच्यातील
नृत्याची
जुगलबंदीही
पाहायला
मिळेल. मोहिनी
ही
कलबेलिया
प्रकारचे
नृत्य
सादर
करणार
आहे; तर
चखुआ
ही
लावणी
सादर
करील.
आता ही
नवी
समस्या
राम
कशी
हाताळणार
आहे? मोहिनी
आणि
सिया
आपल्या
प्रेमाला
कायम
ठेवू
शकतील?
अधिक
जाणून घेण्यासाठी पाहा
‘मनमोहिनी’ सोमवार
ते शनिवार संध्याकाळी
7.30 वाजता फक्त ‘झी
टीव्ही’वर!










