Friday, June 7, 2019


२२ जून रोजी प्रीमिअर होत असलेला डान्स इंडिया डान्सः बॅटल ऑफ दि चॅम्पियन्स दर शनिवार आणि रविवारी रात्री  वाजता फक्त झी टीव्हीवर प्रसारित होईल.







चॅम्पियन्सचे युद्ध पाहायला मिळणार आहेडान्स इंडिया डान्सच्या नवीनतम पर्वातह्या हायपर-कॉम्पिटिटिव्ह फॉर्मेटमध्ये भारतातील चार झोन भिडणार एकमेकांसोबत!
२२ जूनपासून सुरू होत असलेला हा शो दर शनिवार आणि रविवारी रात्री
 वाजता फक्त झी टीव्हीवर
मुंबई३० मे २०१९गेल्या २५ हून अधिक वर्षांपासून झी टीव्ही भारतातील सामान्य माणसाला त्याची कला दाखवण्यासाठी व्यासपीठ प्रदान करण्यामध्ये अग्रगण्य राहिली आहेअगदी २००९ मधील पहिल्या पर्वाच्या सुरूवातीपासून वाहिनीवरील सर्वांत मोठा कलेवर आधारित रिलिटी फॉर्मेट डान्स इंडिया डान्सने भारतातील डान्सच्या परिस्थितीमध्ये क्रांती निर्माण केली असून लाखोंसाठी नृत्याला करिअर म्हणून प्रस्थापित केलेसलमान युसुफ खानशक्ती मोहनधर्मेश येलांडेपुनित जे पाठक आणि राघव जुयाल यांसारख्या डान्सिंग सेंसेशन्सची अख्खी पिढी इंडस्ट्रीमध्ये आणल्यानंतर सुमारे एक दशकानंतर हे जबरदस्त ३६०डिग्री अरेना व्यासपीठ कमीत कमी १२० कॅमेऱ्यांसह डान्स इंडिया डान्सच्या सर्वांत नवीन पर्वासाठी डान्सच्या युद्धाकरिता हायपर-कॉम्पिटिटिव्ह फॉर्मेटमध्ये सज्ज होत आहेडान्स इंडिया डान्सः बॅटल ऑफ दि चॅम्पियन्सचा प्रीमिअर २२ जून रोजी होत असून हा शो दर शनिवार-रविवारी रात्री  वाजता फक्त झी टीव्हीवर प्रसारित होईल.
ह्या नवीन पर्वामध्ये अनेक गोष्टी प्रथमच घडणार असून ह्या शो च्या क्रिएटिव्ह टीमने परीक्षक मंडळामध्ये आकर्षक नावे आणली आहेसुपरस्टार करीना कपूर खान ह्या शोमधून टेलिव्हिजनवर परीक्षक म्हणून पदार्पण करणार आहेतिच्यासोबत किंग ऑफ हूकस्टेप्स आणि बॉस ऑफ डान्स बॉस्को मार्टिस टेलिव्हिजनवर  वर्षांनी परतत असून आपल्या पुढील डान्स चित्रपटासाठी एका जबरदस्त डान्सरच्याही ते शोधात आहेडीआयडी डबल्समध्ये एकेकाळी स्पर्धकाच्या रूपात दिसून आलेला किलर मूव्ह् करणारा रॅपर रफ्तार ह्या पर्वामध्ये व्यासपीठाच्या दुसऱ्या बाजूला परीक्षकाच्या रूपात दिसून येईलआपली विनोदबुद्धी आणि देखण्या रूपासह धीरज धूपर ह्या शो चे सूत्रसंचालन करताना दिसून येईल.


एस्सेल व्हिजन प्रॉडक्शन्स लिमिटेडची निर्मिती असलेला डान्स इंडिया डान्सः बॅटल ऑफ दि चॅम्पियन्स बनणार आहे #DanceKaJungistaan एक रोमहर्षक युद्धभूमिजिथे भारतातील चार झोनल टीम्स ईस्ट के टायगर्ससाऊथ के थलैवाज्‌, नॉर्थ के नवाब्स  आणि वेस्ट के सिंघम्स हे दर आठवड्याला नॉक-आऊट राऊंड्समध्ये अल्टिमेट नॅशनल डान्स चॅम्पियन्स बनण्यासाठी एकमेकांसोबत भिडतीलह्यावेळेला डान्सर्स आपल्या मूव्ह् भव्यदिव्य अशा ३६०डिग्री अरेना व्यासपीठावर १२० कॅमेऱ्यांच्या नजरेखाली दाखवतीलज्यात त्यांच्या चॅम्पियन मूव्ह् अगदी बारकाईने टिपल्या जातील आणि त्यामुळे चूक करण्यासाठी अजिबात वाव उरणार नाहीसेटचा हा अगदी आंतरराष्ट्रीय लूक आणि फील प्रकाशमान सॅटेलाईट स्टेजप्रवेशासाठी बोगदेअंतर्वक्र आणि बाह्यवक्र एलईडीज्‌ यांमुळे द्विगुणित होईल आणि प्रत्येक प्रदर्शनाच्या जादूमध्ये भर पडेलप्रत्येक पर्वासह डान्स इंडिया डान्सने भारताच्या डान्सच्या शब्दकोषात आधी कधीही पाहिलेल्या शैलीतंत्रेफ्युजन फॉर्म्स आणले आणि केवळ आपल्या स्पर्धकांच्या कलेच्या ताकदीच्या जोरावर प्रेक्षकांना थक्क केलेह्या वर्षी सुद्धा ह्या पर्वामध्ये केवळ सर्वोत्तमच असतील आणि ह्या पर्वाला खरोखरीच मनोरंजक आणि उत्कंठावर्धक बनवतील.
झी टीव्हीच्या बिझनेस हेड अपर्णा भोसले म्हणाल्यापहिल्या पर्वाच्या सुरूवातीसह एक दशकभरापासून डान्स  इंडिया डान्स देशातील भावी डान्सर्सना त्यांची कला दाखवण्यासाठी आणि तिच्यात भर टाकण्यासाठी तसेच इंडस्ट्रीमध्ये कोरियोग्राफर आणि डान्सिंग स्टार्स म्हणून नाव कमावण्यासाठी व्यासपीठ प्रदान करण्यासाठी अग्रगण्य राहिला आहे यशस्वी पर्वांनंतर आणि मनोरंजनाच्या दुनियेत आपले काही सर्वोत्तम कलाकार आणल्यानंतर आम्ही आता आमच्या प्रेक्षकांसाठी पर्व  घेऊन येत असून ह्या शो चा फॉर्मेट अगदी नवा असणार आहेह्या सीझनमध्ये रोमांचकहायपर-कॉम्पिटिटिव्ह फॉर्मेट असून यात भारतातील  झोन्समधील १६ डान्स चॅम्पियन्स ह्या #DanceKaJungistaan मध्ये राष्ट्रीय डान्स चॅम्पियन बनण्यासाठी एकमेकांसोबत नॉक-आऊट  राऊंड्समध्ये भिडतीलसुंदर अभिनेत्री करीना कपूर खान ह्या पर्वामध्ये परीक्षक म्हणून टेलिव्हिजनवर पदार्पण करणार आहेतिच्यासोबत ह्या परीक्षक मंडळात कोरियोग्राफर बॉस्को मार्टिसही दिसून येईलबॉस्कोला ह्या शोमधून आपल्या पुढील चित्रपटासाठी दमदार डान्सरचा शोध घ्यायचा आहेएकेकाळी ह्या मंचावर स्पर्धक राहिलेला रॅपर रफ्तार ह्या पर्वामध्ये परीक्षकाच्या रूपात पुनरागमन करत आहेआमचा लोकप्रिय शो कुंडली भाग्यचा नायक धीरज धूपार ह्या शोमधून सूत्रसंचालनामध्ये पदार्पण करत आहेडान्स इंडिया डान्सः बॅटल ऑफ दि चॅम्पियन्सच्या ह्या आकर्षक नवीन पर्वाच्या सुरूवातीसह वीकेन्डच्या प्राईमटाईमला बळकटी आणण्याचा आमचा मानस आहे.”



परीक्षक करीना कपूर खान म्हणालीडान्स इंडिया डान्स हा एक अफलातून मंच असून यात देशातील कानाकोपऱ्यातील उत्तमोत्तम डान्सर्स समोर येतातह्या मंचाने ह्याआधी देशाला अतिशय गुणी डान्सर्स प्रदान केले असून त्यांचा अतिशय मोठ्या प्रमाणावर चाहतावर्ग आहेह्यावर्षी सुद्धा चारही झोन्समधून एक से एक असाधारण कलाकार पाहायला मिळतील अशी आशा मी करतेमी ह्या स्पर्धेकडे मनोरंजनाच्या दृष्टीने पाहणार आहेकेवळ उत्तम डान्सर्स नव्हेत तर प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या जबरदस्त परफॉर्मर्स आणि डान्सिंग सिताऱ्यांकडे माझे लक्ष असणार आहे.”



परीक्षक बॉस्को मार्टिस म्हणालेडान्स इंडिया डान्सः बॅटल ऑफ दि चॅम्पियन्स हा एक उत्तम मंच असून तो डान्सर्सना त्यांच्या स्वप्नांचा पाठपुरावा करून त्यांना सत्यात उतरवण्यासाठी प्रोत्साहन देतोएवढी जबरदस्त कला असलेल्या ह्या शोमधून  वर्षांनंतर पुन्हा एकदा टेलिव्हिजनवर येताना खूप छान वाटतंयह्यावर्षीही ह्या शोमध्ये अफलातून परफॉर्मर्स आणि नवीन फॉर्मेटचा समावेश आहेत्यामुळे हा शो पाहणे प्रेक्षकांसाठी अतिशय रोचक ठरेलमला यात सर्वांत प्रभावी डान्सर्सचा शोध घ्यायचा असून ते माझ्या पुढील चित्रपटाचा हिस्सा बनतील.”







परीक्षक रफ्तार म्हणाले, मी डान्स इंडिया डान्समध्ये ह्याआधी स्पर्धक होतो आणि ह्या मंचावर नाचण्याच्या माझ्या खूप छान आठवणी आहेत. देशातील काही सर्वोत्तम डान्सर्सना पाहण्यासाठी मी उत्सुक आहे. मी स्वतः इथे स्पर्धक होतो त्यामुळे त्यांच्या ह्या प्रवासाशी मला छान जुळवून घेता येईल आणि त्यांना योग्य निवड करण्यासाठी तसेच योग्य टिट्यूडसह ह्या मंचावर उभे राहण्यासाठी मार्गदर्शन करता येईल.”
सूत्रधार धीरज धूपर म्हणाले, डान्स इंडिया डान्ससारख्या शोसोबत सूत्रसंचालनामध्ये पदार्पण करण्यासाठी मी अतिशय उत्साहात आहे. माझे दर्शक मला सोमवार ते शुक्रवार कुंडली भाग्यमध्ये करण लुथ्राच्या रूपात पाहतात, आता वीकेन्ड्सना मी त्यांना एका वेगळ्या अवतारात दिसून येईन. त्याशिवाय, परीक्षकांसोबत धमाल करण्यासाठी प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करण्यासाठीही मी उत्सुक आहे.”






Meesho Limited’s Initial Public Offering to open on Wednesday, December 3, 2025

  Meesho Limited’s Initial Public Offering to open on Wednesday, December 3, 2025 Price Band fixed at ₹105 per equity share of face value ₹1...