आई माझी काळुबाई'च्या सेटवर भक्तिमय वातावरण - 'आई माझी काळुबाई' मालिकेचे पन्नास भाग पूर्ण
आई माझी काळुबाई'च्या सेटवर भक्तिमय वातावरण - 'आई माझी काळुबाई' मालिकेचे पन्नास भाग पूर्ण!
दिवाळीला सर्वत्र सुरुवात झाली आहे. अंधारावर मात करून सगळीकडे दिव्यांची रोशणाई पसरू लागलीये. याच दरम्यान 'आई माझी काळुबाई' मालिकेचा पन्नासावा भाग प्रदर्शित झाला.
या निमित्तानी सेटवर श्रीसत्यनारायणाची पूजा व देवी काळुबाईची पूजा केली होती. सर्व कलाकार आणि तंत्रज्ञ यांनी या पूजेमध्ये भक्तिभावानी सहभाग घेतला. मालिकेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळतो आहे. आत्तापर्यंत आलेल्या सर्व संकटांवर मात करून 'आई माझी काळुबाई' या मालिकेची यशस्वी घोडदौड सुरू आहे. या पूजेदरम्यान सेटवर अतिशय मंगलमय आणि उत्साहाचं वातावरण होतं. सर्व टीमनी या पूजेचा आनंद घेतला आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन मालिकेच्या चित्रीकरणाला नव्या जोमानं सुरुवात केली.
शरद पोंक्षे, अलका कुबल आठल्ये, विवेक सांगळे, वीणा जगताप, संग्राम साळवी, प्रसन्न केतकर अशी सर्व कलाकार मंडळी या पूजेसाठी आवर्जून उपस्थित होती.
वीणा जगताप साकारत असलेल्या आर्याच्या भूमिकेलाही प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. मालिका आता अत्यंत रंजक वळणावर आली असून आर्याच्या आयुष्यात पुढे काय घडतं, हे पाहणं प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचं असणार आहे.