Press Release
Nidhhi Tapadiaa is on a roll with her spectacular performance in the song ‘Kiss You’ with Tony Kakkar
We are here to bring Entertainment Update to you earlier so be updated by us... Glad to serve you all
Press Release
Nidhhi Tapadiaa is on a roll with her spectacular performance in the song ‘Kiss You’ with Tony Kakkar
Post Event Release
भारताच्या स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षाचा सोहळा साजरा करत कौन बनेगा करोडपतीचे 14वे सत्र सुरू होणार
एक विशेष तारा-मंडित एपिसोड ‘आझादी के गर्व का महापर्व’ प्रसारित होणार 7 ऑगस्ट रोजी रात्री 9 वाजता सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर
भारतीय टेलिव्हिजनवरील सर्वात जास्त चाललेल्या ज्ञान-आधारित गेम शो, कौन बनेगा करोडपतीचे नवीन सत्र लवकरच सुरू होत आहे. या शोचे 14वे सत्र केवळ हॉटसीटपर्यंत पोहोचणार्या स्पर्धकांसाठीच नाही, तर प्रेक्षकांसाठीही अधिक आकर्षक आणि समाधान देणारे असणार आहे. स्टुडिओ नेक्स्ट द्वारा निर्मित या शोचा शुभारंभ रविवारी 7 ऑगस्ट रोजी होणार असून दर सोमवार ते शुक्रवार रात्री 9 वाजता हा शो प्रसारित करण्यात येईल.
भारताच्या स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षाचे औचित्य साधून हा शो ‘आझादी के गर्व का महापर्व’ या धमाकेदार इव्हेंटच्या रूपात सुरू होणार आहे. श्री. अमिताभ बच्चन यांचे सूत्रसंचालन लाभलेल्या या विशेष भागात कारगिल युद्धातील वीर मेजर डी. पी. सिंह, सेना पदक विजेती कर्नल मिताली मधुमिता तसेच जगप्रसिद्ध भारतीय खेळाडू पद्मविभूषण एम सी मेरी कॉम आणि पद्मश्री सुनील छेत्री तसेच पद्मभूषण अभिनेता आमीर खान हे मान्यवर उपस्थित असणार आहेत.
भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचा आनंद द्विगुणित करत या शोमध्ये 15व्या प्रश्नावर एक पडाव दाखल करण्यात आला आहे. ‘धन अमृत’ नामक हा पडाव पार केल्यास स्पर्धकाला 75 लाख रु. बक्षीस रक्कम मिळण्याची हमी असेल! शिवाय, यापूर्वीच दाखल केलेल्या जॅकपॉट प्रश्नाची बक्षिसाची रक्कम देखील वाढवून आता 7.5 कोटी रु. करण्यात आली आहे. प्ले अलॉन्ग मार्फत या खेळात सहभागी होणार्या प्रेक्षकांना दर शुक्रवारी थेट हॉटसीटपर्यंत पोहोचण्याची संधी देखील या सत्रात मिळणार आहे.
बघा कौन बनेगा करोडपती, नवीन सत्र सुरू होत आहे, 7ऑगस्ट रोजी रात्री 9 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर
Post Event Release
प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकर आणि 'प्रोजेक्ट बाला' संस्थेच्या अध्यक्षा सौम्या डाबरीवाल हॉटसीटवर!
पाहा, 'कोण होणार करोडपती'- विशेष भाग, शनिवारी रात्री 9 वाजता फक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.
'कोण होणार करोडपती' हा कार्यक्रम कायमच प्रेक्षकांना भावतो. ज्ञान आणि मनोरंजन यांच्या या अद्भुत खेळातून अनेकांना चांगल्या कामाची प्रेरणा मिळते. या शनिवारच्या भागात 'प्रोजेक्ट बाला' संस्थेच्या अध्यक्षा सौम्या डाबरीवाल या उपस्थित राहणार असून महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री सई ताम्हणकर 'कोण होणार करोडपती'चा खेळ खेळणार आहे. सईबरोबर सौम्या डाबरीवालही 'कोण होणार करोडपती' या खेळात सहभागी होणार आहेत. या दोघी जणी नागपूर येथील ‘विमलाश्रम घरकुल' या संस्थेसाठी खेळणार आहेत.
'कोण होणार करोडपती'च्या या पर्वातही दर आठवड्यातल्या शनिवारच्या भागात विशेष पाहुणे सहभागी होतात. समाजकल्याणासाठी झटणाऱ्या सामान्यांमधल्या असामान्य व्यक्तींची भेट आणि त्यांचे कार्य या विशेष भागांतून प्रेक्षकांसमोर येते. आत्तापर्यंत या भागांत काजोल, तनुजा, अशोक सराफ, सुधा मूर्ती, अधिक कदम, संदीप वासलेकर यांसारखे अनेक मान्यवर उपस्थित राहिले होते. या आठवड्यात प्रसिद्ध आणि लाडकी अभिनेत्री सई ताम्हणकर आणि सौम्या डाबरीवाल या मंचावर उपस्थित राहून 'कोण होणार करोडपती'चा खेळ खेळणार आहेत. या दोघी नागपूर येथील वारांगना व त्यांची मुले यांच्या उन्नतीसाठी काम करणाऱ्या ‘विमलाश्रम घरकुल' या संस्थेसाठी खेळणार आहेत. १९९२ साली ‘विमलाश्रम घरकुला’ची स्थापना झाल्यापासून ही संस्था उपेक्षित व वंचित मुलांचं पुनर्वसन करत आहे. त्यांना समाजात सन्मानाने जगता यावं म्हणून स्वावलंबी बनवत आहे. तर 'प्रोजेक्ट बाला' या संस्थेच्या अंतर्गत सौम्या डाबरीवाल आणि त्यांचे सहकारी मासिक पाळी संदर्भात महिलांमध्ये जनजागृती करतात.
मूळची सांगलीची असणारी अभिनेत्री सई ताम्हणकर हिने तिच्या अभिनय कारकिर्दीचा सुरुवातीपासूनचा प्रवास 'कोण होणार करोडपती'च्या या विशेष भागात उलगडला. 'आयुष्यात मिळालेले अनुभव हे सगळ्यात मोठे गुरू असतात', असे मत सईने या कार्यक्रमात व्यक्त केले. वयाच्या १७ व्या वर्षी सईने काम करण्यास सुरुवात केली. सईचं सांगलीवरचं प्रेम, सांगलीच्या भाषेवर, लहेजावर असणारं प्रेम तिनी या भागात आवर्जून सांगितलं. त्याचबरोबर सई आणि तिची आई यांच्यामधले नाजूक बंधही 'कोण होणार करोडपती'च्या विशेष भागात उलगडण्यात आले. समाजकार्य आणि मनोरंजन क्षेत्र यांतले मोठं नाव असा मेळ असणारा, हा विशेष भाग निश्चितच रंगतदार ठरणार आहे.
पाहा, 'कोण होणार करोडपती'- विशेष भाग, शनिवारी रात्री 9 वाजता फक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.
Karan Kundrra calls Kiara Nautiyal Aka Guddu ‘A Little Cupcake’ as she makes a cute reel ‘Baarish Aayi Hai’ song
'टाईमपास ३'चा बॅाक्स ॲाफिसवर यशस्वी घोडदौड
४ दिवसांत ४.३६ करोडची कमाई
मराठी सिनेसृष्टीतील अवघ्या महाराष्ट्राची लाडकी जोडी म्हणजे दगडू आणि प्राजू. प्रेक्षकांनी ‘टाइमपास १’ आणि ‘टाइमपास २’ मधील दगडू आणि प्राजूच्या अनेख्या लव्हस्टोरीला प्रचंड उत्तम प्रतिसाद दिल्यानंतर आता नुकताच प्रदर्शित झालेल्या 'टाइमपास ३' नेही प्रेक्षकांची मनं जिकंली आहेत. रवी जाधव यांच्या दिग्दर्शनाने रंगलेल्या 'टाईमपास ३' ने बॉक्स ऑफिसवर अवघ्या ४ दिवसांमध्ये ४.३६ करोडची कमाई करून फुल्ल धुमाकूळ घातला आहे. अजूनही बॉक्स ऑफिसवर ‘टाइमपास ३'ची यशस्वी घोडदौड सुरु आहे. सध्या पालवीची डॅशिंग, लव्हेबल अदा, दगडूची जबरदस्त कॉमेडी आणि त्यात भर म्हणून दगडूची गँग प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे.
झी स्टुडिओजचे व्यवसाय प्रमुख मंगेश कुलकर्णी चित्रपटाविषयी म्हणतात, "अवघ्या ४ दिवसांमध्ये ४.३६ करोडची कमाई करून बॉक्स ऑफिसवर कमाल केली आहे. सध्या हिंदी सिनेमाचा प्रेक्षकांवर पडलेला प्रभाव बघता दगडू आणि पालवीच्या प्रेमाला प्रेक्षकांचा इतक्या कमी दिवसांत इतका उत्साहजनक प्रतिसाद पाहून अभिमान वाटतो. चित्रपट चांगला असल्यावर प्रेक्षकसुद्धा तो चित्रपट डोक्यावर घेतात, तसाच हा चित्रपट आहे. ज्याला सध्या प्रेक्षकांच्या उत्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. 'टाईमपास १' आणि 'टाईमपास २' ला जितका प्रतिसाद मिळाला तितकाच प्रतिसाद प्रेक्षक 'टाईमपास ३'ला ही देत आहेत. चित्रपट पाहून समीक्षक आणि प्रेक्षकांच्या देखील सकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत."
'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...