Friday, August 12, 2022

"लाल सिंह चादधा" एक भावनिक आणि विचारसरणीचा वेध असलेला सिनेमा "


आमीर खान हे बॉलीवुड इंडस्ट्री मधले मोठे नाव आहे. त्यानी बॉलीवुड चे किती सारे सुपर हित सिनेमा आपल्या नावावर केले आहेत. बॉलीवुड कहा मिस्टर पेरफेकटीओण हा 4 वर्ष नंतर एका नविन भूमिकेत दिसून येणार आहेत. "लाल सिंह चादधा" एक भावनिक आणि विचारसरणीचा वेध असलेला सिनेमा आहे. 'निस्वार्थ भावनेनं केलेली 

कृती ही यशकडे मार्गक्रमण करते. हा या सेनेमातील संदेश असावा कारण या सिनेमातील लाल सिंह चांदधा हे पात्र इतर निस्वार्थी ही की त्यांचा कोन्ही उपयोग करू शकतो. 

चित्रपटाची कथा चांदीगध मधील लाल सिंह चद्द या मुलाची आहे. जो अपंग आहे आणि आधारशिवाय चाकू शकत नाही. त्याची आई त्याला हे सांगून सतत प्रोत्साहन देते की तो इतरांपेक्षा कमी नाही. शाळेत लालला मैत्रीण रुपा भेटली जी त्याची खूप चांगली मैत्रीण बनते. त्याला सर्व वर्ग मैत्र हिंवत असतात परंतु रूपा लालला नेहमी समजून 

घेत असत. त्याची सोबत टी कायम उभी असते. आणि नेहमी म्हणत 'भाग लाल भाग '. पुढे त्याचा प्रवास सुरू झाला आणि त्याचा पसरा खूपच प्रचंड मोठे आहे. 

एकामागोमाग एक घडणाऱ्या घटना आणि काठाणकात येणारी आणपेक्षित वळण प्रेक्षकांसाठी भुवया उंचवणाऱ्य आहेत. पण हा सिनेमा एका हॉलीवुड सिनेमाचा रीमेक असल्यामुळे ज्यांनी तो मुळ सिनेमा बघितला आहे. त्यांना हा सिनेमा कंटाळवाणा देखील ठरू शकतो. लाल सिंह चद्द च्या आयुष्यात खूप लोंग आली आणि 

पण त्याला दरवेळी नवीन गोष्टी शिकवून गेली. एकप्रकारे लाल सिंह चद्द ने प्रेक्षकणा भटरदर्शन प्राप्त करून दिले आहे. 

लाल सिंह चद्द ही व्यक्तिरेखा आमीर खानने प्रामाणिकपणे सकरण्याचा प्रयानंत केला आहे. त्यातीलल भावणीकता आमिरान त्याच्या अभिनयातून पुरेपूर दाखवली आहे.

 सलमान खानने दिल्या 'दगडी चाळ २'ला शुभेच्छा 

'मंगलमूर्ती फिल्म्स' आणि संगीता अहिर निर्मित, चंद्रकांत कणसे दिग्दर्शित 'दगडी चाळ २' ची सध्या जोरदार चर्चा आहे. 'दगडी चाळ' मध्ये 'डॅडीं'चा विश्वासू सूर्या 'दगडी चाळ २'मध्ये अचानक तिरस्कार करू लागला आहे, याचे कारण जाणून घेण्याची उत्सुकता सर्वच प्रेक्षकांना लागली आहे. त्यातच नुकतेच या चित्रपटातील 'राघू पिंजऱ्यात आला' हे एक जबरदस्त गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे या गाण्याची खासियत म्हणजे या गाण्यातून बॉलिवूड अभिनेत्री डेझी शाह हिने मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे. त्यामुळे या चित्रपटाची एकंदरच सर्वत्र हवा आहे. आता तर या चित्रपटाच्या संपूर्ण टीमला बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान यानेही सोशल मीडियावरून शुभेच्छा दिल्या आहेत. 


 डॅडी आणि सूर्याचे नाते आपण 'दगडी चाळ' मध्ये यापूर्वीच पाहिले आहे. डोकॅलिटीचा वापर करून सूर्या अल्पावधीतच डॅडींचा उजवा हात बनला. मात्र 'दगडी चाळ २' मध्ये असे काय घडले की, सूर्या डॅडींचा इतका रागराग करतोय. या सगळ्यामागचे नेमके कारण काय, हे १८ ऑगस्टला उलगडणार आहे.

 पुन्हा एकदा लग्नाळू २.० चे प्रेक्षकांच्या मनावर राज्य !

सगळीकडे धमाल,मस्तीचे वातावरण निर्माण करणाऱ्या ‘बॉईज’मधील ‘लग्नाळू’ या गाण्याचे नवीन व्हर्जन ‘बॉईज ३’ या चित्रपटात पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. नुकत्याच एका भव्य सोहळ्याच्या माध्यमातून ‘लग्नाळू २.०’  हे नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या गाण्याचे संगीतकार अवधूत गुप्ते असून मुग्धा कऱ्हाडे हिने आपल्या ठसकेबाज आवाजात हे गाणे गायले आहे. प्रतीक लाड, पार्थ भालेराव, आणि सुमंत शिंदे यांच्यासोबत विदुला चौगुले हिनेही या गाण्यावर जबरदस्त ठेका धरला आहे. विदुला एकटीच त्या तिघांवरही भारी पडत असल्याचे यात दिसत आहे. राहुल ठोंबरे आणि संजीव होवालदार यांनी या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन केले आहे.  

     ‘लग्नाळू’ या गाण्यांनी आधीच मराठी पडद्यावर आपली एक छाप उमटवली होती. तरुणांमध्ये तर या गाण्याचे एक वेगळेच वेड आहे. इतक्या वर्षांनंतरही  हे गाणे प्रत्येक रंगमंच हादरवून टाकू शकतो.  त्यात त्याचे २. ० व्हर्जन म्हणजे तर प्रेक्षकांसाठी सोने पे सुहागा. 

या गाण्याबद्दल संगीतकार अवधूत गुप्ते म्हणतात,  " ज्या गाण्याने आधीच प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे, त्याचे पुढचे व्हर्जन बनवून प्रेक्षकांना अजून खूश करण्याची ही मोठी संधी माझ्याकडे होती आणि ‘लग्नाळू २.०’ या गाण्यालाही प्रेक्षक तितकाच भरघोस प्रतिसाद देतील, अशी आशा आहे." 

   सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रा. लि प्रोडक्शन अंतर्गत एव्हरेस्ट एंटरटेनमेंटसह अवधूत गुप्ते प्रस्तुत 'बॉईज ३' चे दिग्दर्शन विशाल सखाराम देवरुखकर यांनी केले असून लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे, संजय छाब्रिया यांनी निर्मितीची धुरा सांभाळली आहे.  येत्या १६ सप्टेंबर रोजी ‘बॅाईज ३’ चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.

Link - https://youtu.be/ju2kyGHDpS0

‘मी पुन्हा येईन’

चे दोन महाएपिसोड्स प्रेक्षकांच्या भेटीला

प्लॅनेट मराठी निर्मित ‘मी पुन्हा येईन’ वेबसीरिजचा गेल्या कित्येक दिवसांपासून सोशल मीडियावर चांगलाच बोलबाला सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’वर ही वेबसीरिज प्रदर्शित झाली आणि त्याला प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला. आता 'मी पुन्हा येईन'चे  अखेरचे दोन भाग येत्या १२ ऑगस्टला  प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यामध्ये अनेक अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना मिळणार आहेत. 

 पळून गेलेले ४ अपक्ष आमदार परत रिसॉर्टवर कसे येतात?, अपक्ष आमदारांनी सत्तेचा पाठिंबा काढल्यावर तपास यंत्रणेचा बेमालूमपणे वापर?, पोलिसांवरील दबावतंत्र, राजकारणी नेहमी कसे सर्वश्रेष्ठ असतात? हे सांगण्याचा आमदारांचा प्रयत्न, राजकारण्यांच्या सोयीप्रमाणे अधिकाऱ्यांचा वापर कसा केला जातो? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे येत्या १२ ऑगस्टला प्रेक्षकांना मिळणार आहेत. मुख्य बाब म्हणजे वेबसीरिजच्या शेवटच्या दोन भागात कोण सत्तास्थापन करणार ? नक्की दिवटे की मुरकुटे ? याचे उत्तर मिळणार आहे. 

‘प्लॅनेट मराठी’ चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, “प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहता लवकरच शेवटचे दोन महाएपिसोड्स प्रदर्शित करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे.  राजकारणावर भाष्य करणारी ही एक व्यंगात्मक वेबसीरिज आहे. राजकारणातील सध्याची घडामोड पाहता प्रेक्षकांना वेबसीरिज एक वेगळा विचार करायला भाग पाडणार हे नक्कीच. शेवटच्या दोन महाएपिसोड्समध्ये नक्की कोण मुख्यमंत्री होणार हे पाहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.” 

अरविंद जगताप दिग्दर्शित ‘मी पुन्हा येईन’मध्ये प्रमुख सयाजी शिंदे, उपेंद्र लिमये, सिद्धार्थ जाधव, रुचिता जाधव, भारत गणेशपुरे यांच्या प्रमुख भूमिका असून याची निर्मिती प्लॅनेट मराठी, गौतम कोळी व जेम क्रिएशन्सने केली आहे.

 अखेर तुफान व्यक्तिमत्वावर आधारित तुफान चित्रपटाचा दणकेदार ट्रेलर प्रदर्शित.

मुंबईतील गॅंगवॉरमधील सर्वात मोठे नाव म्हणजे 'अरुण गुलाब गवळी' उर्फ 'डॅडी'. त्यांच्या 'दगडी चाळी'वर आधारित 'दगडी चाळ' हा चित्रपट काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. ज्याप्रमाणे डॅडींनी अवघ्या मुंबईवर राज्य केले तसेच या चित्रपटानेही अवघ्या महाराष्ट्रावर राज्य केले. आता पुन्हा एकदा अवघ्या महाराष्ट्रावर राज्य करायला 'दगडी चाळ २' सज्ज झाला असून नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर आणि पोस्टरचे अनावरण ‘रिअल डॅडीं’च्या हस्ते दगड चाळीत झाले असून ट्रेलर पाहून चित्रपट पाहाण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मंगलमूर्ती फिल्म्स आणि संगीता अहिर निर्मित 'दगडी चाळ २' या चित्रपटाचे दिग्दर्शन चंद्रकांत कणसे यांनी केले असून रत्नकांत जगताप कार्यकारी निर्माता आहेत. येत्या १९ अॅागस्ट रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होत आहे. 

'दगडी चाळ २'मध्ये आपल्याला सूर्या आणि डॅडी यांच्यातील एक वेगळे नाते पाहायला मिळणार आहे. एकेकाळी डॅडींचा उजवा हात असणारा सूर्या आता त्याच्या कुटुंबासोबत गॅंगवॉरच्या विळख्यातून बाहेर पडून एक साधं सोप्पं आयुष्य जगताना दिसत आहे. मात्र डॅडी आणि सूर्या यांच्यात असे काही घडले आहे, ज्याने सूर्या डॅडींचा तिरस्कार करू लागला आहे. आता त्यांच्यात नेमके काय घडले आहे, त्यांच्या नात्यात कडवटपणा का आला आहे, हे चित्रपट पाहिल्यावरच कळेल. 

दिग्दर्शक चंद्रकांत कणसे चित्रपटाबद्दल म्हणतात की, "मकरंद देशपांडे यांनी साकारलेली डॅडींची भूमिका खूपच वजनदार असून 'दगडी चाळ २' हा पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर वेगळीच छाप पाडेल, अशी खात्री आहे. या वेळी या चित्रपटात गॅंगवॅारसोबत राजकारणही पाहायला मिळणार आहे. चित्रपटाबद्दल निर्मात्या संगीता अहिर म्हणतात, ‘’ प्रेक्षकांनी ‘दगडी चाळ’ला भरभरून दिलेल्या प्रतिसादामुळेच आम्ही याचा सिक्वेल काढण्याचा निर्णय घेतला. जसे प्रेम आमच्या प्रेक्षकांनी ‘दगडी चाळ’ला दिले तसेच प्रेम आमचे हक्काचे प्रेक्षक ‘दगडी चाळ २’लाही देतील, अशी मला अपेक्षा आहे. लवकरच ‘दगडी चाळ २’ आपल्या भेटीला येत आहे. संपूर्ण महाराष्ट्रात हा चित्रपट १९ ऑगस्ट रोजी तुमच्या जवळच्या चित्रपगृहात येतोय.

Link - https://bit.ly/DaagdiChaawl2Trailer

 समायरा'तील 'सुंदर ते ध्यान' गाण्याला आधुनिकतेचा साज

  वारी म्हणजे महाराष्ट्रातील विविध गावांपासून सुरु होऊन पंढरपूर येथे संपणारी सामुदायिक पदयात्रा. याचा अनुभवच अतिशय अनोखा असतो. असाच एक  सुंदर अनुभव देणारे निहार शेंबेकर संगीत दिग्दर्शित 'समायरा' चित्रपटातील 'सुंदर ते ध्यान' हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या सुंदर गाण्याला आधुनिकतेचा साज चढवण्यात आला आहे. संत तुकाराम यांचे शब्द लाभलेल्या या गाण्याला जुईली जोगळेकर हिचा मंत्रमुग्ध करणारा आवाज लाभला आहे.  स्वतःच्या अस्तित्वाच्या शोधात निघालेली 'समायरा' आणि तिच्या त्या प्रवासात तिला झालेला बोध या गाण्यातून उलगडत आहे. ऋषी श्रीकृष्ण देशपांडे दिग्दर्शित 'समायरा’ चित्रपट येत्या २६ ऑगस्टपासून चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

 चित्रपटाचे दिग्दर्शक  ऋषी श्रीकृष्ण देशपांडे गाण्याविषयी म्हणतात, '' प्रत्येक वारकऱ्याची आपली एक कहाणी असते. तशीच समायराची सुद्धा आहे. समायराची ही अनन्यसाधारण कथा, व्यथा आणि त्यातून तिला झालेली विठूची प्रचिती म्हणजे हे गाणे. विठ्ठल सर्वांची माउली. सर्वांचा तारणहार आहे आणि याची प्रचिती समायरालाही येत आहे. तिचा आयुष्याकडे पाहाण्याचा दृष्टिकोन, अनेक प्रश्नांनी व्याकुळ झालेले तिचे अस्थिर मन विठूचरणी येऊन असे  शांत झाले आहे, हे आपल्याला या गाण्यातून दिसते. या गाण्याला जुईली यांनी खूप सुंदर सादर केले आहे. कीर्तनाला दिलेले हे नवीन रूप श्रोत्यांना नक्कीच भावणारे आहे.''

    ग्लोबल सेवा एलएलपी प्रस्तुत, आद्योत फिल्म्सच्या सहयोगाने, 'समायरा'ची निर्मिती डॉ. जगन्नाथ सुरपूरे, रतन सुरपूरे, शशिकांत पानट, योगेश आळंदकर आणि ऋषी श्रीकृष्ण देशपांडे यांनी केली असून या चित्रपटाची पटकथा आणि संवाद सुमित विलास तांबे यांचे आहेत

                'कोण होणार करोडपती'- विशेष भागशनिवारी रात्री 9 वाजता फक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.

लोककलावंतांसाठी अजय-अतुल  खेळणार 'कोण होणार करोडपती'चा खेळ!

'कोण होणार करोडपतीहा कार्यक्रम कायमच प्रेक्षकांना भावतोया कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या स्पर्धकांमुळेत्यांच्या संघर्ष कहाण्यांमुळे कायमच इतरांना प्रेरणा मिळतेतर दर शनिवारी रंगणाऱ्या विशेष भागांमुळे कार्यक्रम अधिकच रंगतदार होतोया शनिवारच्या विशेष भागात अवघ्या देशाला आपल्या गाण्यांनी ठेका धरायला लावणारे संगीतकार अजय - अतुल या कार्यक्रमात सहभागी होणार आहेतया शनिवारी 'कोण होणार करोडपती'च्या या पर्वाचा शेवटचा भाग असून अजयअतुल यांच्या उपस्थितीत या पर्वाची सांगता होणार आहेजेजुरी येथील  शीघ्रकवी शाहीर सगनभाऊ स्मृती मंच या लोकवंतांसाठी कार्यरत असणार्या संस्थेसाठी अजय-अतुल हा खेळ खेळणार आहेत.

'कोण होणार करोडपती'च्या या पर्वातही दर आठवड्यातल्या शनिवारच्या भागात विशेष पाहुणे सहभागी झालेसमाजकल्याणासाठी झटणाऱ्या सामान्यांमधल्या असामान्य व्यक्तींची भेट आणि त्यांचे कार्य या विशेष भागांतून प्रेक्षकांसमोर येतेया पर्वात आत्तापर्यंत प्रसिद्ध अभिनेत्री काजोलतनुजाज्येष्ठ समाजसेविका आणि लेखिका सुधा मूर्तीसदाबहार ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफसंदीप वासलेकरअधिक कदमडॉतात्याराव लहानेद्वारकानाथ संझगिरी  या भागांमध्ये सहभागी झाले होतेज्ञान आणि मनोरंजनाचा अद्भुत खेळ या सगळ्या मान्यवरांच्या उपस्थितीत विशेष रंगलाआता या पर्वाची सांगता अजय-अतुल या लोकप्रिय जोडगोळीने होणार आहे. 'कोण होणार करोडपतीया कार्यक्रमाची म्युझिकल थीम आणि अजय अतुल यांचं विशेष नातं आहे त्याबद्दल त्यांनी या भागात त्या आठवणींना उजाळा दिला.  'शाहीर साबळेशाहीर विठ्ठल उमपअण्णाभाऊ साठेप्रल्हाद शिंदे या सगळ्या लोककलावंतांनी  मराठी साहित्य आणि संस्कृतीचे जतन करून अमूल्य वारसा आपल्याला उपलब्ध करून दिलाआमच्यावरही गाण्याचे संस्कार या लोकलावंतांनी केले आहेत', असे मनोगत अजय अतुल यांनी 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर व्यक्त केलेत्याचबरोबर संगीत ही शिकत राहण्याची गोष्ट आहेत्यामुळे शिकत राहाअसा सल्ला त्यांनी तरुण कलाकरांना यावेळी दिला.


'कोण होणार करोडपती'चे हे पर्व खऱ्या अर्थाने अद्भुत ठरलेविविध वयोगटातील आणि वेगवेगळ्या क्षेत्रातले स्पर्धक या पर्वात सहभागी झाले होतेअनेकांचा संघर्ष पाहून डोळ्यात पाणी दाटून आले तर अनेकांचे अनुभव ऐकून निःशब्द व्हायला झालेकाही स्पर्धकांची पहिली कमाई या मंचाने मिळवून दिली तर अनेकांनी आपल्या कामातून इतरांना प्रेरणा दिलीअशा या गाजलेल्या पर्वाची भैरवी अजयअतुल या प्रसिद्ध संगीतकार जोडीसह होणार आहेयावेळी अजयअतुल यांनी मनमोकळेपणाने वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारल्याघरी संगीतकार व्हायचंय असं म्हणल्यानंतर आलेली प्रतिक्रिया काय होतीगणपती बाप्पावरची श्रद्धापुण्यातील गणेशोत्सवातील आठवणीमुंबई शहराबद्दल ऋण अशा अनेक विषयांवर अजय अतुल व्यक्त झाले आहेतत्यामुळे हा शेवटचा भाग प्रेक्षकांसाठी निश्चितच पर्वणी ठरणार आहे.

 

पाहा, 'कोण होणार करोडपती'- विशेष भागशनिवारी रात्री 9 वाजता फक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.


'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...