सोनी मराठी वाहिनी वरील 'प्रतिशोध - झुंज अस्तित्वाची' या मालिकेतील ममताने साजरा केला तृतीयपंथीयांसोबत 'मदर्स डे'.
सोनी मराठी वाहिनी वरील 'प्रतिशोध - झुंज अस्तित्वाची' प्रतिशोध ही आई आणि मुलगी यांच्या विशिष्ट नात्यावर भाष्य करणारी ही थरारक मालिका आहे. भूतकाळातील काही विशिष्ट गोष्टींमुळे ममता आणि दिशा यांना त्यांच्या भविष्यात कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागते आहे, हे आपल्याला या मालिकेतून पाहायला मिळते आहे. या मालिकेतील ममता ही जेवणाचे डब्बे बनविण्याचा व्यवसाय स्वबळावर करते आहे. मालिकेतील प्रमुख व्यक्तिरेखा ममता, दिशा आणि शन्नोबी यांनी अनोख्या आणि प्रेरणादायी पद्धतीने जागतिक मातृदिन साजरा केला. त्यांनी ‘द ट्रान्स कॅफे’, वर्सोवा येथील आणि 'ट्विट फाउंडेशन', गोरेगाव येथील तृतीयपंथी कर्मचारी यांच्याबरोबर संवाद साधला आणि उपजीविकेसाठी प्रयत्न करत असताना त्यांना येणाऱ्या आव्हानांवर प्रकाश टाकला. या प्रसंगी, मालिकेतील तृतीयपंथी आई ची भूमिका साकारत असलेली 'ममता' आणि तिची मुलगी 'दिशा' आणि 'शन्नोबी' (ममताची मैत्रीण) यांनी निष्ठा निशांतशी प्रभावी चर्चा केली.
निष्ठा निशांत एक तृतीयपंथी वैज्ञानिक संशोधक आणि मानवाधिकार कार्यकर्त्या आहेत. त्यांचे ट्विट फाउंडेशन (ट्रान्सजेंडर वेल्फेअर इक्विटी अँड एम्पॉवरमेंट ट्रस्ट), हे तृतीयपंथी व्यक्तींद्वारे समुदायाला निवारा, शिक्षण, रोजगार, कौशल्य-निर्माण आणि समुपदेशन समर्थन प्रदान करण्यासाठी कार्य करते. ट्रान्स कॅफे हा 'ट्रान्सवुमन' द्वारे व्यवस्थापित केलेला व्यवसाय आहे, ज्याने शहरातील ट्रान्सजेंडर व्यक्तींसाठी सामाजिक समर्थनासह नोकरीच्या संधी निर्माण केल्या आहेत.
म
दिशाने व्यक्त केले की, तिच्या तृतीयपंथी आईसोबतच्या या अनोख्या बंधाने आई-मुलीच्या नातेसंबंधाला एक संपूर्ण नवीन दृष्टीकोन दिला आहे आणि आईची खरी व्याख्या काय आहे हे तिला समजले. ममताच्या अस्तित्वासाठी दिशाची चाललेली धडपड मालिकेतून पाहायला मिळतेच आहे. याव्यतिरिक्त, शन्नो बी यांनी व्यक्त केले की, ममतासारख्या लोकांना ते कोण आहेत, हे स्वीकारताना सन्मानाने जीवन जगण्यासाठी कुटुंब, मित्र आणि समाज यांच्याकडून आधार मिळणे आवश्यक आहे.
'प्रतिशोध - झुंज अस्तित्वाची', ही मालिका तृतीयपंथी व्यक्ती आणि त्यांचे कुटुंबीय यांना भेडसावणाऱ्या समस्या आणि त्यांच्या जीवनाचे प्रतिबिंब आहे. ममता आणि दिशा यांचा समाजातील बदलाचा प्रेरणादायी प्रवास पाहायला विसरू नका! 'प्रतिशोध - झुंज अस्तित्वाची', सोम. ते शनि. रात्री १० वा. सोनी मराठी वाहिनीवर.