Thursday, May 11, 2023

सोनी मराठी वाहिनी वरील 'प्रतिशोध - झुंज अस्तित्वाची' या मालिकेतील ममताने साजरा केला तृतीयपंथीयांसोबत 'मदर्स डे'.

 सोनी मराठी वाहिनी वरील 'प्रतिशोध - झुंज अस्तित्वाचीया मालिकेतील ममताने साजरा केला तृतीयपंथीयांसोबत 'मदर्स डे'.


 

                            सोनी मराठी वाहिनी वरील 'प्रतिशोध - झुंज अस्तित्वाची'  प्रतिशोध ही आई आणि मुलगी यांच्या विशिष्ट नात्यावर भाष्य करणारी ही थरारक मालिका आहेभूतकाळातील काही विशिष्ट गोष्टींमुळे ममता आणि दिशा यांना त्यांच्या भविष्यात कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागते आहेहे आपल्याला या मालिकेतून पाहायला मिळते आहेया मालिकेतील ममता ही जेवणाचे डब्बे बनविण्याचा व्यवसाय स्वबळावर करते आहेमालिकेतील प्रमुख व्यक्तिरेखा ममतादिशा आणि शन्नोबी यांनी अनोख्या आणि प्रेरणादायी पद्धतीने जागतिक मातृदिन साजरा केलात्यांनी ‘ ट्रान्स कॅफे’, वर्सोवा येथील आणि 'ट्विट फाउंडेशन', गोरेगाव येथील तृतीयपंथी कर्मचारी यांच्याबरोबर संवाद साधला आणि उपजीविकेसाठी प्रयत्न करत असताना त्यांना येणाऱ्या आव्हानांवर प्रकाश टाकलाया प्रसंगीमालिकेतील तृतीयपंथी आई ची भूमिका साकारत असलेली 'ममताआणि तिची मुलगी 'दिशाआणि 'शन्नोबी' (ममताची मैत्रीणयांनी निष्ठा निशांतशी प्रभावी चर्चा केली.

                          निष्ठा निशांत एक तृतीयपंथी वैज्ञानिक संशोधक आणि मानवाधिकार कार्यकर्त्या आहेतत्यांचे ट्विट फाउंडेशन (ट्रान्सजेंडर वेल्फेअर इक्विटी अँड एम्पॉवरमेंट ट्रस्ट), हे तृतीयपंथी व्यक्तींद्वारे समुदायाला निवाराशिक्षणरोजगारकौशल्य-निर्माण आणि समुपदेशन समर्थन प्रदान करण्यासाठी कार्य करतेट्रान्स कॅफे हा 'ट्रान्सवुमनद्वारे व्यवस्थापित केलेला व्यवसाय आहेज्याने शहरातील ट्रान्सजेंडर व्यक्तींसाठी सामाजिक समर्थनासह नोकरीच्या संधी निर्माण केल्या आहेत.

                             मताची कहाणीनिष्ठा आणि तृतीयपंथी समुदायातील इतर अनेकांच्या जीवनात अनेक साम्य आहेतममताने तिच्या मालिकेतील स्वतःच्या प्रवासाबद्दल सांगितलेतिने तिची मुलगी 'दिशाहिला एक तृतीयपंथी आई म्हणून कसे वाढवलेआर्थिक स्वावलंबनाच्या प्रवासादरम्यान तिला आलेली आव्हाने आणि सामाजिक प्रतिक्रिया यांवरही तिने प्रकाश टाकलादिशाला सांभाळताना ममताला आजपर्यंत किती अडचणींना सामोरे जावे लागलेत्यातून ममता कशी ठामपणे उभी राहिली आणि तिने दिशाला चांगली शिकवण कशी दिलीह्याबद्दल सांगितले.





                             दिशाने व्यक्त केले कीतिच्या तृतीयपंथी आईसोबतच्या या अनोख्या बंधाने आई-मुलीच्या नातेसंबंधाला एक संपूर्ण नवीन दृष्टीकोन दिला आहे आणि आईची खरी व्याख्या काय आहे हे तिला समजलेममताच्या अस्तित्वासाठी दिशाची चाललेली धडपड मालिकेतून पाहायला मिळतेच आहेयाव्यतिरिक्तशन्नो बी यांनी व्यक्त केले कीममतासारख्या लोकांना ते कोण आहेतहे स्वीकारताना सन्मानाने जीवन जगण्यासाठी कुटुंबमित्र आणि समाज यांच्याकडून आधार मिळणे आवश्यक आहे.

                                'प्रतिशोध झुंज अस्तित्वाचीया मालिकेतील मुख्य व्यक्तिरेखा ममतादिशा आणि शन्नोबी यांनीसन्मानाने उपजीविकेसाठी प्रयत्न करणाऱ्यातृतीयपंथींबरोबर 'मदर्स डेसाजरा केलाट्रान्स कॅफे आणि निष्ठा निशांत यांची ममतासोबत झालेली भेट ही ममताला प्रेरणा देऊन गेली त्यांच्याकडून नक्कीच काही शिकण्यासारखं आहेत्यांच्या कार्यातून ममताला देखील तिच्या आयुष्यात येणाऱ्या समस्यांना सामोरे जाण्यास मदत नक्कीच होईल असा विश्वास सोनी मराठी वाहिनीचे बिजनेस हेड अजय भाळवणकर यांनी व्यक्त केला.






 'प्रतिशोध - झुंज अस्तित्वाची', ही मालिका तृतीयपंथी व्यक्ती आणि त्यांचे कुटुंबीय यांना भेडसावणाऱ्या समस्या आणि त्यांच्या जीवनाचे प्रतिबिंब आहेममता आणि दिशा यांचा समाजातील बदलाचा प्रेरणादायी प्रवास पाहायला विसरू नका!  'प्रतिशोध - झुंज अस्तित्वाची', सोमते शनिरात्री १० वासोनी मराठी वाहिनीवर.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...