Saturday, May 20, 2023

मी वसंतरावने होणार मराठी चित्रपटांच्या प्रदर्शनाची सुरूवात, 21 तारखेला JioCinema होणार वर्ल्ड डिजिटल प्रीमियर

 मी वसंतरावने होणार मराठी चित्रपटांच्या प्रदर्शनाची सुरूवात, 21 तारखेला JioCinema होणार वर्ल्ड डिजिटल प्रीमियर

 

जिओ स्टुडिओजचा पहिला मराठी चित्रपट ‘मी वसंतराव’ लवकरच डिजिटल माध्यमावर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेगेल्या वर्षी अनेक फिल्म महोत्सव तसेच भारतीय सिनेमागृहात प्रदर्शित होताच देशभरातून समीक्षकांची दाद मिळालेल्या ह्या सिनेमाला प्रेक्षकांकडून ही सकारात्मक प्रतिसाद मिळाला होताएवढेच नव्हे तर प्रेक्षक OTT वर हा सिनेमा कधी बघायला मिळेल याची आतुरतेने वाट पाहत होतेआणि आता त्यांची ही प्रतीक्षा संपली आहे कारण JioCinemaवर २१मे रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

 

दोन राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त ह्या चित्रपटाने आंतरराष्ट्रीय पातळीवर ही उत्सुकता निर्माण केली होती९५ व्या ऑस्करसाठी जगभरातील ३०१ चित्रपटांची रिमांइंडर लिस्ट जाहीर केली होती यांमध्ये ‘मी वसंतराव’ चा समावेश होता.



 

जिओ स्टुडिओजचा पहिला मराठी चित्रपट मी वसंतराव पासून JioCinemaवर मराठी चित्रपटांच्या डिजिटल वर्ल्ड प्रीमियरची सुरवात होणार आहेपुढे ही जिओ स्टुडिओजचे आगामी प्रोजेक्ट्स ज्यात नव्या पिढीचं प्रतिनिधित्व करणारे चित्रपटनव्या धाटणीचे वेब शोजआणि मनाला भिडणाऱ्या अप्रतिम कथा यांचा समावेश असणार आहे.

 

राहूल देशपांडे -

मी वसंतराव’ हा चित्रपट एक वेगळाच प्रयोग होतायामध्ये माझे आजोबा डॉवसंतराव देशपांडे यांचीच कथा मी त्यांचा नातूएक नट म्हणून रसिकांसमोर घेऊन आलोत्यातील गाणी आणि संगीतदिग्दर्शन हे देखील मी स्वत: केले असल्याने हा चित्रपट अनेकार्थाने माझ्यासाठी महत्त्वाचा आहेआम्ही केलेल्या कामाची दखल जागतिक पातळीवर घेतली गेली याच्यासाठी मी आभारी आहेआणि आता आमच्या चित्रपटाचे JioCinemaवर डिजिटल वर्ल्ड प्रीमियर होणार आहे त्यामुळे आमची ही कलाकृती जगभरातील सगळे प्रेक्षक बघू शकतील याचा मला खूप आनंद होतोय आणि त्यांच्या प्रतिक्रिया जाणण्यासाठी मी खूप उत्सुक आहे.


You tube link-

https://www.youtube.com/watch?v=0UL1A4ngjEg

 

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

Meesho Limited’s Initial Public Offering to open on Wednesday, December 3, 2025

  Meesho Limited’s Initial Public Offering to open on Wednesday, December 3, 2025 Price Band fixed at ₹105 per equity share of face value ₹1...