Wednesday, May 10, 2023

'कारण गुन्ह्याला माफी नाही' मालिकेत आस्ताद काळे नवीन भूमिकेत !

 'कारण गुन्ह्याला माफी नाहीमालिकेत आस्ताद काळे नवीन भूमिकेत !



 सोनी मराठी वाहिनी कायमच आशयघन विषय मांडत वेगवेगळ्या मालिका घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत असते. ‘कारण गुन्ह्याला माफी नाही ही नवी थरारक मालिका  प्रेक्षकांच्या भेटीला आली आहेत्याची झलक प्रेक्षकांना आवडली आहेया मालिकेत प्रेक्षकांचे आवडते इन्स्पेक्टर भोसले आणि जमदाडे आपल्याला निराळ्या अंदाजात पाहता येणार आहेतनिरनिराळ्या व्यतिरेखांमधून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली अभिनेत्री अश्विनी कासार ही या मालिकेतून पुनरागमन करताना दिसणार आहेअभिनेत्री अश्विनी कासार पहिल्यांदाच पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. ACP अनुजा हवालदार असे तिच्या व्यक्तिरेखेचे नाव आहेसोबतच  रूपल नंद हीसुद्धा या मालिकेत पुनरागमन करताना दिसते आहेमोहिनी दुभाषी असे तिच्या व्यक्तिरेखेचे नाव असणार आहे.

                    

आता या मालिकेत प्रवेश होणार आहे एका नवीन व्यक्तिरेखेचाआस्ताद काळे हा अभिनेता नेहमी निरनिराळ्या धाटणीच्या व्यक्तिरेखा साकारताना आपल्याला दिसतो.



 'कारण गुन्ह्याला माफी नाहीया मालिकेत आस्ताद एका नेत्याच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेसुहास साटम असे या नेत्याचे नाव असून आता मालिकेत त्याच्या येण्याने कथानक काय वेगळे वळण घेणारभोसले आणि जमदाडे यांच्या कामात काय भर पडणार का ? हे पाहण्याजोगे असणार आहे

'कारण गुन्ह्याला माफी नाहीमालिकेत कलाकारांची चांगली फळी प्रेक्षकांना पाहायला मिळते आहेत्यात आता आस्ताद काळेच्या येण्याने मालिकेत एक वेगळी रंगत पाहायला मिळेलएका पेक्षा एक वरचढ कलाकार एकाच वेळेला जेव्हा एकाच मालिकेत दिसतीलतेव्हा 'कारण गुन्ह्याला माफी नाहीया थरारक मालिकेत जे वेगळेपण येईल ते पाहणे प्रेक्षकांसाठी नक्कीच मजेशीर असेल.

                              लेखक चिन्मय मांडलेकरदिग्दर्शक भीमराव मुडे आणि निर्माती मनवा नाईक यांचादेखील सोनी मराठी वाहिनीसाठीमालिकेसाठी चांगलाच हातभार लागला आहेतर पाहायला विसरू नकानवी मालिका, 'कारण गुन्ह्याला माफी नाहीसोमते शनिरात्री १०.३० वासोनी मराठी वाहिनीवर.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

Moneyview Limited: Initial public offering to open on Thursday, September 24, 2026

  Moneyview Limited: Initial public offering to open on Thursday, September 24, 2026 Price Band fixed at ₹32 per equity share of face value ...