Thursday, May 25, 2023

‘इंडियाज गॉट टॅलेंट’ मंच मुंबईच्या प्रतिभेची वाट बघत आहे

इंडियाज गॉट टॅलेंट मंच मुंबईच्या प्रतिभेची वाट बघत आहे

 

इंडियाज गॉट टॅलेंट’ या बहुप्रतिक्षित शो चा नवीन सीझन, सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर येण्यासाठी पूर्णतः सज्ज झाला आहे आणि कलाकारांना आपले असामान्य कलागुण सादर करण्यासाठी ऑडीशन्समध्ये पाचारण करण्यात येत आहे.

 

इंडियाज गॉट टॅलेंट या शो ने होतकरू कलाकारांना चमकण्यासाठी सातत्याने राष्ट्रीय मंच प्रदान केला आहेतुम्ही विस्मयकारक डान्सर असाल, श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारे गायक असाल, चक्रावून सोडणारे जादुगार असाल किंवा अनोख्या प्रतिभेचे धनी असाल - इंडियाज गॉट टॅलेंटच्या ऑडीशन्समध्ये तुमचे खुल्या दिलाने स्वागत आहे.

 


28 मे रोजी कोलकात्यात, त्यानंतर 4 जूनला दिल्लीमध्ये आणि 11 जूनला मुंबईमध्ये ऑडीशन्स आहेततुमच्याकडे जर लोकांचे लक्ष वेधणारी अद्वितीय प्रतिभा असेल तर तारखा लक्षात घेऊन तुमच्या शहरातील ऑडीशन्ससाठी जरूर जाऑनलाइन नावनोंदणी करण्यासाठी, तुम्ही सोनी लिव्ह अॅप डाउनलोड/अपडेट करू शकता.

 

मंच सज्ज आहे आणि सगळा देश पुढचा मोठा स्टार बघण्यासाठी आतुर आहेतुम्हीच तो स्टार असणार का? या सनसनाटी प्रवासाचा भाग बनण्याची संधी चुकवू नका!

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

India Sets the Global Jewellery Calendar with Grand Opening of IIJS Bharat – Signature 2026

  India Sets the Global Jewellery Calendar with Grand Opening of IIJS Bharat – Signature 2026 IIJS Bharat – Signature 2026 to expected to ge...