Friday, May 19, 2023

स्वर्ण पटकथा लघुपट डोब्या कान्स फिल्म फेस्टिव्हल – मार्चे डू फिल्म 2023’मध्ये प्रदर्शित

 स्वर्ण पटकथा लघुपट डोब्या कान्स फिल्म फेस्टिव्हल – मार्चे डू फिल्म 2023’मध्ये प्रदर्शित

टीझर लिंक: https://youtu.be/rVPTqxZtyYc

सेजल दीपक पेंटर यांचे प्रॉडक्शन हाऊस, स्वर्ण पटकथा अंतर्गत निर्मित डोब्या लघुपटाचा टीझर आज निर्मात्यांनी लॉन्च केला. या सिनेमाची निवड कान्स फिल्म फेस्टिव्हल – मार्चे डू फिल्म 2023’मध्ये प्रदर्शनाकरिता झाली आहे.    

हा सिनेमा वृद्ध तात्या आणि त्याचा थकलेला बैल राजा यांच्या हृदयद्रावक कथेवर बेतला आहे. डोब्याची कथा सत्य आणि निसर्गापेक्षा विकासाला प्राधान्य देणाऱ्या मानवी स्वभावाभोवती फिरते. अलीकडच्या काळात नातेसंबंधापेक्षा प्रत्येकजण भौतिक घटकांना अधिक महत्त्व देत असल्याचं सिनेमातून अधोरेखित होते.

या सिनेमात शशांक शेंडे, सिद्धेश झाडबुके, अभिमान उनवणे आणि नचिकेत देवस्थळी हे कलाकार आहेत. सिनेमाचं दिग्दर्शन आशुतोष पोपट जारे याने केलं आहे. कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये अनोखी आणि फिरती कथा असलेला डोब्या हा नेकेड वर्ड नावाच्या 3 लघुपट संकलनाचा भाग असेल.  

सेजल दीपक पेंटर यांचे प्रॉडक्शन हाऊस स्वर्ण पटकथा अंतर्गत निर्मित आणि आशुतोष पोपट जारे दिग्दर्शित, डोब्या हा लघुपट 2023 कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...