अहिल्याबाई होळकरांच्या जयंतीला, अभिनेत्री एतशा संझगिरी म्हणते, “या कर्तृत्त्ववान साम्राज्ञीच्या विलक्षण कथेने मला सतत प्रेरणा मिळते”
सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई’ ही भव्य मालिका अहिल्याबाई होळकर यांचे जीवन प्रामाणिकपणे चित्रित करून, भारतातील एका प्रतिष्ठित ऐतिहासिक व्यक्तिमत्वाला श्रद्धांजली अर्पण करत आहे. देशभर अहिल्याबाई होळकरांची जयंती साजरी केली जात असताना, एक सक्षम शासक आणि संघटक म्हणून त्यांनी माळव्यातील रयतेवर केलेल्या खोल प्रभावाची आपल्याला आठवण होते. त्यांनी समाजातील अनिष्ट रूढी झुगारल्या, लिंग-विशिष्ट अपेक्षांना शह दिला, प्रजेची राणी म्हणून आपली ओळख प्रस्थापित केली आणि आपल्या रयतेचा आवाज बनल्या.
‘पुण्यश्लोक अहिल्याबाई’ मालिकेत या कर्तृत्त्ववान स्त्रीला मूर्त रूप देण्याची संधी मिळाल्याबद्दल अभिनेत्री एतशा संझगिरी मनापासून कृतज्ञता व्यक्त करते. राणी अहिल्याबाई होळकरांचे जीवन आणि कार्य तसेच या महान व्यक्तिमत्त्वाचे चित्रण याविषयी बोलताना एतशा संझगिरी सांगते, “या कर्तृत्त्ववान स्त्रीच्या विलक्षण कथेने मला सतत प्रेरणा मिळते आणि आमच्या ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई’ या मालिकेद्वारे त्यांची गाथा जिवंत करू शकलो याचा मला अतिशय आनंद वाटतो. महानता लिंग किंवा सामाजिक स्थितीवर अवलंबून नसते हे सिद्ध करणाऱ्या त्या महान समाज धुरीण होत्या. आपण आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करून जगावर सकारात्मक प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करत असताना त्यांची उल्लेखनीय कामगिरी ही केवळ माझ्यासाठीच नव्हे तर ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई’ मालिकेच्या सगळ्याच कलाकारांसाठी प्रोत्साहनाचा स्रोत ठरते.”
बघत राहा “पुण्यश्लोक अहिल्याबाई” दर सोमवार ते शुक्रवार सायंकाळी 7:30 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर!
No comments:
Post a Comment
GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST