Tuesday, May 23, 2023

नवी मुंबईत चार वर्षांत झाले ४० बोन मॅरो प्रत्यारोपण

 नवी मुंबईत चार वर्षांत झाले ४० बोन मॅरो प्रत्यारोपण


कर्करोगजन्य, गैर-कर्करोग आजार असलेल्या प्रौढ आणि मुलांना मिळाले जीवनदान

नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्सने गेल्या चार वर्षांत प्रौढ आणि बाल रुग्णांमध्ये चांगले परिणाम देऊन ४० यशस्वी अस्थिमज्जा प्रत्यारोपण (बीएमटी) केल्याची घोषणा केली आहे. जेव्हा पुरेश्या निरोगी पेशी तयार केल्या जात नाहीत तेव्हा अस्थिमज्जा प्रत्यारोपणाद्वारे विद्यमान रोगग्रस्त किंवा अकार्यक्षम अस्थिमज्जा पुनर्स्थापित केली जाते. बीएमटी एक जीवन रक्षक प्रक्रिया आहे. ल्युकेमिया, लिम्फोमा, मल्टिपल मायलोमा आणि थॅलेसेमिया या सारख्या काही अनुवांशिक परिस्थिती असलेल्या रक्तविकारांनी ग्रस्त रुग्णांमध्ये ही प्रक्रिया केली जाते. या ४० बीएमटी च्या यशामध्ये १० हेप्लॉइडेंटिकल (अंशतःजुळलेल्या) बीएमटीचा देखील समावेश आहे. यातून रुग्णालयाच्या अस्थिमज्जा प्रत्यारोपण कार्यक्रमाची उच्च क्षमता दिसून येते. बीएमटी प्रक्रियेमध्ये रुग्णाची रोगग्रस्त किंवा अकार्यक्षम अस्थिमज्जा बदलून दात्याकडून निरोगी अस्थिमज्जा मूळ पेशी बसवली जाते. बीएमटीचे दोन प्रमुख प्रकार आहेत, ऑटोलॉगस-जिथे रुग्णाच्या स्वतःच्या मुळ पेशी वापरल्या जातात आणि ऍलोजेनिक-जिथे मूळ पेशी दात्याकडून प्राप्त केल्या जातात.

डॉ.अनिल डी’क्रूझ, संचालक-ऑन्कोलॉजी, अपोलो कर्करोग केंद्र, नवी मुंबई म्हणाले की,"अपोलो कर्करोग केंद्रामध्ये कर्करोगाच्या रुग्णांसाठी सर्वसमावेशक वैद्यकीय सेवा देण्याकरिता उत्कृष्टता प्रदान करण्याच्या दृष्टीने आम्ही सतत प्रयत्न करीत असतो. आमच्या आत्याधुनिक सुविधांमध्ये अतिशय आधुनिक तंत्रज्ञान आणि विविध प्रकारच्या कर्करोगांमध्ये तज्ञ असलेल्या अत्यंत कुशल विशेषज्ञांच्या टीमचा समावेश आहे. रक्त-विकार आणि कर्करोगाशी लढा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि ४० बीएमटी पूर्ण केल्याचा आम्हाला अभिमान आहे. आम्ही वेळेवर निदान आणि उपचारांचे महत्व समजून घेतल्यामुळेच आम्हाला आमच्या रुग्णांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणता आला आहे."

डॉ.पुतिन जैन, हेमॅटोलॉजिस्ट आणि हेमॅटो-ऑन्कोलॉजिस्टचे सल्लागार, कर्करोग केंद्राचे बीएमटी कार्यक्रम प्रमुख - सल्लागार, नवी मुंबईतील अपोलो म्हटले की,"बीएमटी प्रदान करणाऱ्या जागतिक स्तरावरील वैद्यकीय सेवांच्या तुलनेत ६५-७०% यश दर मिळवून ४० बीएमटीचा टप्पा गाठणे हा खरेतर नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्ससाठी अभिमानाचा क्षण आहे. आमच्या रुग्णांना सर्वोत्कृष्ट परिणाम देण्याच्या उद्देशाने आमच्या तज्ञांच्या समर्पित टीमने अथक परिश्रम घेतले आहेत. आम्हाला अभिमान आहे की संक्रमणासाठी कठोर नियंत्रण उपाय करुन रुग्ण आणि आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेची खात्री देऊन कोविड-१९ च्या महामारीच्या काळातही आमचा हा कार्यक्रम सुरु राहिला. अपोलो हॉस्पिटल्स बीएमटी टीमने या आव्हानांचा यशस्वीरित्या सामना केला."

डॉ. विपिन खंडेलवाल, बालरोग बीएमटी-चिकित्सक, हेमॅटो-ऑन्कोलॉजी सल्लागार कर्करोग केंद्र, अपोलो नवी मुंबईतील म्हणाले,"नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्स येथे बालरोग ऑन्कोलॉजिस्ट, कार्डिओलॉजिस्ट (हृदयरोग तज्ञ) आणि परिचारिकांच्या बहुकुशल टीमसह एक समर्पित बालरोग बीएमटी युनिट आणि आयसीयू आहे. लहान मुलांवर बीएमटी करण्यापूर्वी आम्ही कोणत्याही प्रकारच्या आरोग्याच्या समस्या समजून घेण्यासाठी मुलांचे हृदय, मूत्रपिंड, फुफ्फुसे, कान आणि दात तपासतो आणि मुलांचे आयुष्य शक्य तितके चांगले आहे याची खात्री करतो. रोगप्रतिकारकशक्ती कमी झाल्यामुळे रुग्णांना संक्रमण आणि इतर गंभीर समस्या होण्याची शक्यता असते. पण ब्लड कल्चर किंवा मल्टिप्लेक्स पीसीआर द्वारे संसर्ग रोगांचे लवकर निदान केले जाते तसेच प्रशिक्षित कर्मचारी आम्हाला शक्य तितके उत्कृष्ट परिणाम देण्यास मदत करतात."

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...