फोर्टिस हॉस्पिटल मुलुंडने मदर अँड चाइल्ड केअर फ्लोअर, 'द नेस्ट' लाँच केले–
जिथे गर्भवती महिलांना सर्वोत्तम काळजी मिळेल
फोर्टिस हॉस्पिटल मुलुंडने आज विशेषत: गर्भवती महिला व नवजात बालकांसाठी डिझाइन केलेले नवीन फ्लोअर ‘नेस्ट’चे उद्घाटन कले. फोर्टिस हेल्थकेअरचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आशुताष रघुवंशी, फोर्टिस हॉस्पिटल, महाराष्ट्रच्या व्यवसाय प्रमुख डॉ. एस. नारायणी, आणि लेखिका, फिटनेस उत्साही व आई श्रीमती मंदिरा बेदी यांच्या हस्ते या २९-खाटा असलेल्या फ्लोअरचे उद्घाटन करण्यात आले. या विशेषत: डिझाइन केलेल्या प्रसूती वातावरणामध्ये प्रसूतीच्या सर्व पैलूंचा समावेश असेल, जसे आरोग्य तपासणी, आधुनिक ऑब्स्टेट्रिक्स, अव्वल लेबर सूट्स, प्रसूतीपूर्व व प्रसूतीनंतरची केअर, उच्च जोखीम असलेल्या प्रसूतीचे व्यवस्थापन, प्रसूतीकाळ पूर्ण होण्यापूर्वी डिलिव्हरी, नवजात व पेडिएट्रिक केअर सेट-अप्स.
हॉस्पिटलमधील ‘नेस्ट’ फ्लोअरची डिझाइन ‘हिलिंग आर्किटेक्चर’च्या संकल्पनेवर निर्माण करण्यात आलेली सोपी व सुसंगत आहे. डिझाइन, नैसर्गिक प्रकाश (शरीराच्या उपचार प्रक्रियेला साह्य करण्यासाठी), रंग (सकारात्मकतेचा प्रसार करण्यासाठी) आणि नैसर्गिक दृश्य (उबदारपणा व शांततेला चालना देण्यासाठी) यावर लक्ष केंद्रित करत फ्लोअरची बायोफिलिक डिझाइन शांतमय भावना देते, तसेच उत्तम आरोग्याला चालना देते. या फ्लोअरची वैशिष्ट्ये रूग्ण, कुटुंबे, कर्मचारी व अभ्यागतांना आरामदायीपणा, सुरक्षितता व केअर देत आरोग्य व उपचाराला चालना देणारे वातावरण प्रदान करेल. अनुभवी ऑब्स्टेट्रिक्स व ग्यानेकोलॉजिस्ट्स, पेडिएट्रिशियन्स, निओनॅटोलॉजिस्ट्स, इंटेन्सिविस्ट्स, अॅनेस्थेसियोलॉजिस्ट्स, ऑब्स्टेट्रिकल नर्सेस व नर्स प्रॅक्टिशनर्स ‘नेस्ट’मधील रूग्णांची काळजी घेतील.
‘नेस्ट’च्या लाँचबाबत बोलताना फोर्टिस हॉस्पिटल्स, महाराष्ट्रच्या व्यवसाय प्रमुख डॉ. एस. नारायणी म्हणाल्या, ‘‘‘नेस्ट’ फ्लोअरच्या लाँचसह आम्ही गर्भवती माता, नवीन माता व त्यांच्या नवजात बालकांना संस्मरणीय केअर अनुभव देत आहोत. ‘नेस्ट’ हा अधिक वैयक्तिकृत व सर्वांगीण प्रसूती अनुभव देणारा उपक्रम आहे. फ्लोअरमध्ये प्रसूती अनुभव आरामदायी व सोयीस्कर करण्यासाठी डिझाइन केलेल्या अनेक सुविधा व सेवा आहेत. विशेषीकृत ओबीजीवायएन, पेडिएट्रिशियन्स, निओनॅटोलॉजिस्ट, नर्स प्रॅक्टिशनर्स दिवसातून चोवीस तास गर्भवती मातांची काळजी घेतील, माता व त्यांच्या नवजात बालकांना प्रगत केअर सुविधा देतील. आम्हाला असे क्षेत्र निर्माण केल्याचा अभिमान वाटतो, जेथे मातांना पाठिंबा, केअर मिळत असल्याचे आणि मातृत्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यास सक्षम असल्याचे वाटू शकते.’’
लेखिका, फिटनेस उत्साही व एक यंग मॉम असलेल्या मंदिरा बेदी यांना नवीन फ्लोअरचे उद्घाटन करण्याचा आनंद झाला. त्यांनी प्रसूतीकाळात व प्रसूतीनंतर मातांना सकारात्मक व आरोग्यदायी अनुभवासह आवश्यक असलेल्या पाठिंब्याच्या महत्त्वाबाबत सांगितले. त्यांनी मातांना वैयक्तिकृत व सर्वांगीण केअर अनुभव देण्याप्रती आपली कटिबद्धता कायम राखत ‘नेस्ट’ फ्लोअरची संकल्पना व निर्मिती केलेल्या टीमचे कौतुक देखील केले. प्रसूतीकाळ हा महिलेच्या जीवनातील सर्वात सुंदर प्रवास आहे. ‘नेस्ट’ सारख्या आरोग्यसेवा पायाभूत सुविधा गर्भवती मातांच्या मातृत्व अनुभवामध्ये अधिक वाढ करतील.
No comments:
Post a Comment
GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST