नवी मुंबईत झाले आठवे यशस्वी हृदय प्रत्यारोपण
दुर्मिळ हृदयग्रस्त ४० वर्षीय रुग्णाचे हृदय प्रत्यारोपण यशस्वी २ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर प्राप्त झाले नवे हृदय
नवी
मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्स हे मुंबई महानगर क्षेत्रातील सर्वात प्रगत बहु-वैशिष्ट्ये
असलेले चतुरस्त्र वैद्यकीय सेवा प्रदान करणारे रुग्णालय असून त्यांनी आठवी यशस्वी हृदय
प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया पार पाडल्याची घोषणा केली आहे. हे हृदय प्रत्यारोपण म्हणजे
४० वर्षीय रुग्णाची जिद्द आणि जीवनाचा प्रेरणादायी प्रवासाचा जणू दाखलाच आहे, हा रुग्ण
'ऍमिलॉइडोसिस' नावाच्या दुर्मिळ आणि जीवघेण्या आजाराशी झुंजत होता, त्याने अडचणींविरुद्ध
लढा देऊन प्रेरणादायी विजय प्राप्त केला. कुशल टीमच्या मदतीने जागतिक स्तराची आरोग्य
सेवा देण्याबाबत अपोलोच्या समर्पणाचे हे उत्कृष्ट उदाहरण आहे. अपोलो त्यांच्या आर्थिकदृष्ट्या
मागास असलेल्या रुग्णांना ट्रस्ट आणि क्राऊड फंडिंगच्या माध्यमातून आपली प्रगत वैद्यकीय
सुविधा गरजू रुग्णांपर्यंत पोहोचवते.
रुग्ण अपोलोमध्ये महाराष्ट्रातील बुलढाणा जिह्यातून आला होता, त्याला छातीत तीव्र वेदना होत होत्या, तसेच वारंवर श्वास घेण्यास त्रास आणि थकवा जाणवत होता. विस्तृत तपासणी केल्यानंतर रुग्णाला ऍमिलॉइडोसिसमुळे अपरिवर्तनीयरित्या हृदय निकामी झाल्याचे दिसून आले. ऍमिलॉइडोसिसमध्ये असामान्य, फायबरच्या स्वरुपात प्रथिने विकसित होतात, हे संपूर्ण शरीरातील ऊतींमध्ये आणि अवयवांमध्ये जमा होतात, ज्यामुळे अवयवांचे सामान्य कार्य बिघडते. या रुग्णाच्या बाबतीत ऍमिलॉइडोसिसमुळे त्याच्या हृदयावर परिणाम झाला होता, ज्यामुळे ऍमिलॉइड कार्डिओमायोपॅथी (हृदयाच्या स्नायूंचा बिघाड) आणि हृदय निकामी झाले होते. जिवीत राहण्यासाठी हृदय प्रत्यारोपण हा एकमेव पर्याय असल्याने हृदयाचे कार्य गंभीरपणे बिघडले होते.
डॉ. संजीव जाधव, सीव्हीटीएस,सल्लागार- हृदय आणि फुफ्फुस प्रत्यारोपण शस्त्रक्रिया, अपोलो हॉस्पिटल्स, नवी मुंबईचे म्हणाले की,"रुग्णाच्या प्रकृतीची तीव्रता लक्षात घेऊन आम्ही लगेच लक्षणात्मक व्यवस्थापन सुरु केले आणि समुपदेशन केल्यानंतर रुग्णाला प्रत्यारोपण प्रतीक्षा यादीत ठेवले. रुग्णाची जिद्द आणि त्याच्या कुटुंबाकडून मिळालेल्या अतुलनीय पाठिंब्यामुळे त्याला दोन वर्षे हृदय-दात्याची प्रतीक्षा करत असताना या आजाराचे व्यवस्थापन करण्यास मदत झाली. हे प्रकरण म्हणजे वैद्यकीय शास्त्राच्या सामर्थ्याचे व अवयवदानाचे महत्व पटवून देण्यासाठी उत्तम उदाहरण आहे.
"दात्याचे हृदय पुनर्प्राप्त करण्यापासून प्राप्तकर्त्यामध्ये हृदयाचे यशस्वी रोपण करण्यापर्यंत अपोलो प्रत्यारोपण टीमने एकमेकांच्या सहाय्याने ताळमेळ ठेवून काम केले, हृदय सुरक्षितपणे आणण्यात आले, काळजीपूर्वक जतन करण्यात आले आणि कौशल्याने प्रत्यारोपण केले गेले आणि हे सगळं एका विशिष्ट कालावधीत घडलं. चार तासांहून अधिक कालावधीची हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया म्हणजे आमच्या टीमच्या अचूकपणाचा आणि कौशल्याचा हा पुरावाच आहे. हे हृदय प्रत्यारोपण म्हणजे नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्स येथील अवयव प्रत्यारोपणाचे यश आणि प्राविण्याचे एक उदाहरण आहे."असे मत डॉ.जाधव यांनी व्यक्त केले,"रुग्ण आता हृदय प्रत्यारोपण आयसीयू मध्ये रोगमुक्त होण्याच्या अवस्थेत आहे, तसेच त्याच्यात दररोज उल्लेखनीय प्रगती दिसून येत आहे.
रुग्णाने पुढीलप्रमाणे आपली कृतज्ञता व्यक्त केली,"मला आयुष्य जगण्याची दुसरी संधी दिल्याबद्दल मी अपोलो हॉस्पिटल्सच्या संपूर्ण टीमचा आभारी आहे. २०२१ मध्ये प्रत्यारोपण प्रतीक्षा यादीत स्थान मिळाल्यापासून एप्रिल 2023 मध्ये नवीन हृदय प्राप्त करेपर्यंत अपोलोचे सतत वैद्यकीय आणि आर्थिक पाठबळ मिळाले तसेच माझ्या आरोग्याची त्यांनी काळजी घेल्यामुळे मला दोन वर्षे बळ मिळाले. मी पुन्हा जगायला सुरुवात केली आहे आणि आयुष्याची ही अनमोल भेट मी जपून ठेवणार आहे आणि दररोज याविषयी आभार व्यक्त करणार आहे."
No comments:
Post a Comment
GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST