Monday, May 15, 2023

मातृदिनानिमित्त आपल्या आईच्या संस्मरणीय आठवणी सांगण्याच्या ‘झी’च्या आवाहनाला सखी गोखलेचा प्रतिसाद

 मातृदिनानिमित्त आपल्या आईच्या संस्मरणीय आठवणी सांगण्याच्या ‘झी’च्या आवाहनाला सखी गोखलेचा प्रतिसाद

मातृदिनानिमित्त आपल्या आईच्या संस्मरणीय आठवणी सांगण्याच्या ‘झी’च्या आवाहनाला प्रतिसाद देताना, वडिलांच्या मृत्यूची बातमी आपल्या आईने आपल्याला अगदी कोवळ्या वयात किती संवेदनशीलतेने उघड केली होती, त्याची आठवण सखी गोखलेने सांगितली!

मातृदिनी संवेदनशील संदेश साध्या पध्दतीने देणार्‍्या मोजक्या चित्रपट ठळकपणे उठून दिसले. ‘झी’ची निर्मिती असलेल्या अशाच एका चित्रपटानेही प्रेक्षकांच्या थेट आत्म्याला स्पर्श केला. प्रत्येक लहान मुलाला कथा सांगणारी पहिली व्यक्ती ही त्याची आईच असते, ही ‘झी’ची संकल्पना या चित्रपटात सुंदरतेने रेखाटली गेली आहे. आपण सांगितलेल्या गोष्टींमुळे आपल्या मुलांमध्ये कुतुहल निर्माण होऊन त्या मुलांना जीवनाच्या विविध अंगांचा शोध घेण्याचे  दर्शन घडविण्याच्या मार्गावर कशा नेतात, त्याचे चित्रण या चित्रपटात करण्यात आले आहे. कारण आपल्या आईने सांगितलेल्या गोष्टीच आपल्या जीवनातील पहिल्या मूल्यांचा पाया रचतात, ज्यामुळे आपण घडतो आणि अप्रत्यक्षपणे भावी समाजाचीही घडण होते.

या चित्रपटाला दिलेल्या प्रतिसादाद्वारे रंगभूमी आणि टीव्हीवरील प्रसिध्द अभिनेत्री सखी गोखले हिने जीवनातील आपली पहिली कथाकार असलेल्या आपल्या आईबद्दल, म्हणजे प्रसिध्द अभिनेत्री शुभांगी गोखले यांच्याबद्दल आपला एक वैयक्तिक अनुभव सांगितला. यातून आपल्या मूल्ये कशी बनली आणि हा अनुभव आजही आपल्या मनात कसा ताजा आहे, ते सखी गोखलेने सांगितले.

सखी गोखलेच्या पोस्टमध्ये लिहिले आहे : ‘झी’च्या टीमने जेव्हा माझ्याकडे त्यांनी बनविलेला हा सुंदर चित्रपट पाठविला, तेव्हा लहानपणापासून माझ्या अम्माने मला सांगितलेल्या अनेक गोष्टींनी माझ्या मनात गर्दी केली. माझी आई उत्कृष्ट कथाकार आणि नकलाकार आहे. ती तुम्हाला तासन् तास खुर्चीवर खिळवून ठेऊ शकते. तिच्या गोष्टी कधी संपतच नाहीत आणि त्या ऐकताना हसून हसून तुमच्या डोळ्यांतून पाणी वाहू लागते. माझ्या या मताशी सहमत होणारे अनेक लोक मला ठाऊक आहेत. पण या सर्वांतून माझ्या मनात एक अनुभव अगदी ताजा राहिला आहे. तो म्हणजे जेव्हा तिने मला प्रथमच मृत्यू या संकल्पनेची ओळख करून दिली. ही गोष्ट कदाचित इतरांच्या मनात भयानक भावना निर्माण करू शकते. पण लहानपणी आपण प्रथम केव्हा मृत्यू या संकल्पनेबद्दल ऐकलं, हे आपल्यापैकी अनेकांच्या लक्षात असेल. मृत्यूच्या संकल्पनेबरोबरच आपल्या मनात भीती या संकल्पनेचाही जन्म होत असतो. माझे बाब मला सोडून गेले, तो काळ मला स्पष्टपणे आठवतो. एक लहान मूल म्हणून त्यांचा मृत्यू हा मला गोंधळात टाकणारा होता. त्यावेळी त्यांच्या मृत्यूची बातमी सहा वर्षांच्या एका मुलीला सांगताना अम्मा म्हणाली, “आपल्यात वावरणारी काही माणसं ही परमेश्वराची मुलं असतात. ती खास आणि सुंदर असतात. त्यांना आपल्यासाठी एक भेट म्हणून देवाने पाठविलेलं असतं. पण देवालाच जेव्हा एकाकी वाटतं, तेव्हा तो या मुलांना आपल्याकडे बोलावून घेतो. कारण त्याला त्या मुलांचा सहवास हवा असतो. त्यामुळे अशा सुंदर मुलांचा जो काही थोडाफार सहवास आपल्याला लाभला, त्याबद्दल आपण देवाचे आभार मानायला हवेत. आपण त्यांचं स्मरण करून त्यांचा सहवास साजरा केला पाहिजे.” आता जेव्हा मी मागे वळून बघते, तेव्हा तिने मला मृत्यूबद्दल किती सहजतेने समजावलं, हे पाहून मला खूप आश्चर्य वाटतं. मला नेमकं काय ऐकायचं आहे, हे तिला कसं समजलं? तिने सांगितलेली ती केवळ एक कथा नव्हती, तर ती माझ्या मनाची घडण करीत होती. ही घडण कशी झाली, त्याचा मी आजही शोध घेत असते. आई ही एक जादुगार असते. मला असं जीवन दिल्याबद्दल आणि त्यात तुझी जादू जोडल्याबद्दल तुझे मी आभार मानते, अम्मा! आय लव्ह यू. मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

‘जर्नी’तील आत्मशोधावर आधारित शीर्षक गीत प्रदर्शित..

‘जर्नी’तील आत्मशोधावर आधारित शीर्षक गीत प्रदर्शित..  सचिन दाभाडे फिल्म्स प्रस्तुत ‘जर्नी’ या आगामी चित्रपटाचे शीर्षक गीत नुकतेच प्रदर्शित झा...