प्राजक्ता आणि वीरू दोन्ही पैलवानांच्या आयुष्याची नवी सुरूवात.'तुजं माजं सपान' लग्न सोहळा २९ जुलै, संध्या. ७ वाजता, सोनी मराठी वाहिनीवर.
सोनी मराठी वाहिनीवर नुकतीच सुरू झालेली आणि अल्पावधीत लोकप्रिय झालेली मालिका म्हणजे 'तुजं माजं सपान'. वीरेंद्र आणि प्राजक्ता या दोन पैलवानांच्या आयुष्यावर आधारित असलेली ही मालिका लोकांच्या मनात घर करते आहे. प्राजक्ता ही खऱ्या आयुष्यातली पैलवान असून मालिकेतही ती पैलवानाच्या व्यक्तिरेखेत पाहायला मिळते आहे. मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडते आहे. प्राजक्ता आणि वीरू यांच्या प्रेमाची निराळी गोष्ट प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. मालिकेत प्राजक्ताचा कुस्ती खेळण्याचा प्रवास दाखवला जातो आहे. पण आता मालिका वेगळे वळण घेणार आहे. मालिकेत आता वीरू आणि प्राजक्ता यांचं लग्न होणार आहे. ते कसं, ते आपल्याला मालिकेत पाहायला मिळेल.
वीरूची आई त्याचं लग्न व्हावं यासाठी प्रयत्न करत होती. बरेच प्रयत्न करूनही तो काही लग्नाला तयार होत नव्हता. पण आईनी त्याला समजावून लग्नासाठी तयार केलं आहे. आता मालिकेत लग्न पाहायला मिळणार आहे.
प्राजक्ता आणि वीरू यांच्या लग्ननंतर त्यांच्या आयुष्यात काय फेरबदल होतील हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
या लग्नाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. आता या दोन पैलवानांचं लग्न कसं होणार, ह्याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. कुस्तीच्या या तांबड्या मातीत हळदीचा पिवळा रंग उधळणार आहे. याच तांबड्या मातीतून आता प्रेमाचं तुफान येणार का, हे आता मालिकेत पाहायला मिळेल. एखाद्या मालिकेत कुस्तीपटूंचं लग्न पहिल्यांदाच दाखवलं जाणार आहे. या लग्नामुळे वीरूच्या आयुष्यात काय फेरबदल होतील?
तो कुस्तीच्या आणि लग्नाच्या विरोधात आहे आणि प्राजक्ताच्या येण्यानं कुस्ती त्याच्या आयुष्यात पुन्हा येणार आहे. त्यामुळे तो या परिस्थितीवर कशी प्रतिक्रिया देतो, हे पाहणं महत्त्वाचं असेल. या लग्नामुळे प्राजक्ताच्या आयुष्यात फार मोठे फेरबदल होणार आहेत. लग्नानंतर कुस्ती खेळता येईल का? तांबड्या मातीत कुस्ती खेळून पुढे प्रगती करायचं तिचं स्वप्न अपुरं राहील का? प्राजक्ता आणि वीरू यांच्या लग्नानंतर वीरेंद्रच्या घरातलं वातावरणही बदलेल. वीरूच्या आईला नक्कीच याचा आनंद आहे. वीरेंद्रने मार्गी लागून संसार करावा, अशी त्यांची इच्छा आहे. वीरूच्या डोळ्यांतलं त्याचं स्वप्न प्राजक्ता पूर्ण करेल का आणि त्यांचा हा प्रवास कसा असेल, हे आपल्याला मालिकेत दिसणार आहे.
मालि
वीरू आणि प्राजक्ता यांच्या या अनोख्या कहाणीची सुरुवात कशी आहे, हे आपल्याला आपल्या आवडत्या सोनी मराठी वाहिनीवरील मालिकेतून पाहता येणार आहे, 'तुजं माजं सपान' लग्न सोहळा २९ जुलै, संध्या. ७ वाजता, सोनी मराठी वाहिनीवर.