Wednesday, July 26, 2023

'महाराष्ट्र बेस्ट एम्प्लॉयर ब्रँड अवॉर्ड २०२३' टाटा ब्ल्यू-स्कोप स्टील सन्मानित

'महाराष्ट्र बेस्ट एम्प्लॉयर ब्रँड अवॉर्ड २०२३' टाटा ब्ल्यू-स्कोप स्टील सन्मानित

मनुष्यबळ क्षेत्रात उल्लेखनीय योगदानाप्रती कंपनीच्या बांधिलकीचे फलित


 कोटेड स्टील उत्पादने पुरवणारी आघाडीची कंपनी टाटा ब्ल्यू-स्कोप स्टीलला महाराष्ट्र बेस्ट एम्प्लॉयर ब्रँड अवॉर्ड २०२३ या अतिशय प्रतिष्ठित पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. हा पुरस्कार म्हणजे टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलने मनुष्यबळ क्षेत्रात दिलेले उल्लेखनीय योगदान तसेच कामासाठी अनुकूल व सर्वांच्या दृष्टीने लाभदायक वातावरण निर्माण करण्याप्रती कंपनीच्या बांधिलकीचे फलित आहे.

साहस, योग्यता, दर्जा, सहयोग आणि दयाभाव या पाच तत्त्वांवर भर देणारे प्रभावी व पोषक असे कामाचे वातावरण निर्माण करण्याप्रती टाटा ब्ल्यू-स्कोप स्टीलची निष्ठा त्यांना देण्यात आलेल्या महाराष्ट्र बेस्ट एम्प्लॉयर ब्रँड अवॉर्ड २०२३ मधून दिसून येते. स्टील उद्योगक्षेत्रात सातत्याने नवे मापदंड स्थापन करत असतानाच ही कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांचे कल्याण, प्रगती आणि एकंदरीत समाधान यासाठी देखील वचनबद्ध आहे.

श्रीमती नीना बहादूर, चीफ ह्युमन रिसोर्स ऑफिसर, टाटा ब्ल्यू-स्कोप स्टील यांनी सांगितले,"या पुरस्कारामुळे संपूर्ण टाटा ब्ल्यूस्कोप समुदायाला अजून जास्त उत्कृष्ट कामगिरी बजावण्याची, खासकरून स्टील उद्योगक्षेत्रात आपले स्थान अधिकाधिक उंचावण्यासाठी प्रयत्न करण्याची प्रेरणा मिळाली आहे. आम्हाला अतिशय अभिमान वाटतो की, उद्योगक्षेत्रातील सर्वोत्तम प्रोफेशनल्स आमच्याकडे आहेत, कंपनीचे आपल्या कर्मचाऱ्यां सोबतचे संबंध सामंजस्याचे, परस्परांना लाभदायक ठरतील असे आहेत व दीर्घकाळपर्यंत टिकून राहण्याची क्षमता त्यामध्ये आहे. टाटा ब्ल्यू-स्कोप स्टीलमधील जीवनामध्ये काम व आनंददायी क्षण यांचा उत्कृष्ट मिलाप आहे, त्याचबरोबरीने याठिकाणी व्यक्तिगत उद्दिष्ट्ये पूर्ण करण्यावर देखील भर दिला जातो."

टाटा ब्ल्यू-स्कोप स्टीलमध्ये कामाचे प्रोफेशनल वातावरण निर्माण व्हावे, टिकून राहावे यावर भर दिला जातो, त्यासाठी लोकांना उपयुक्त ठरतील अशी धोरणे, वैविध्यपूर्ण कार्य संस्कृती, टीम सदस्यांकडून विशेष माहिती यांचा अवलंब व स्वीकार केला जातो, ग्राहकांच्या वास्तविक समस्या तितक्याच उत्साहाने सोडवल्या जातात. मानवी पैलूवर ही कंपनी विशेष भर देते, त्यामुळे कर्मचाऱ्यांना त्यांना महत्त्व व पाठिंबा मिळत असल्याचा अनुभव घेता येतो.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...