Monday, July 17, 2023

“क्षेत्रपाल श्री देव वेतोबा” मालिकेच्या निमित्ताने ठाण्यात उभारली वेतोबाची भव्य दिव्य पन्नास फूट उंचीची प्रतिकृती

“क्षेत्रपाल श्री देव वेतोबा” मालिकेच्या निमित्ताने ठाण्यात उभारली वेतोबाची भव्य दिव्य पन्नास फूट उंचीची प्रतिकृती


‘सन नेटवर्क’ची ‘सन मराठी’ वाहिनी मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतेच, पण मालिकेची प्रसिध्दी देखील अशा पध्दतीने करते जेणेकरुन मालिका आणि प्रेक्षकवर्ग हे एकत्र बांधले जातील, त्यांच्यातील नातं जणू एक सोहळाच असल्यासारखे साजरे केले जाईल. म्हणूनच तर ‘सन मराठी’ वाहिनीचे ब्रीदवाक्य आहे ‘सोहळा नात्यांचा’. या ब्रीदवाक्याला साजेशी अशी गोड घटना नुकतीच ठाणे येथे घडली. 'क्षेत्रपाल श्री देव वेतोबा' ही मालिका १७ जुलै रोजी संध्याकाळी ७ वाजता, ‘सन मराठी’ वाहिनीवर प्रसारित होणार आहे. या मालिकेच्या प्रसिध्दीच्या निमित्ताने मालिकेतील कलाकार आणि प्रेक्षक यांची भेट झाली आणि प्रेक्षकांनी मालिकेच्या यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या.

'क्षेत्रपाल श्री देव वेतोबा' या मालिकेच्या लाँच प्रित्यर्थ ठाणे तलाव पाळी येथे पहिल्यांदाच श्री देव वेतोबाची एक भव्य प्रतिकृती उभारण्यात आली. लोकांच्या रक्षणासाठी कायम धाऊन येणारे अदृश्य रुपी वेतोबा यांची महती प्रेक्षकांना या मालिकेतून कळणार आहेच पण वेतोबाचे नयनरम्य दर्शन ठाणेकरांना नुकतेच अनुभवयास मिळाले. श्री देव वेतोबाची भव्य दिव्य अशी पन्नास फूट उंचीची प्रतिकृती ठाण्यातील तलाव पाळी येथे उभारण्यात आली होती. वेतोबाच्या भव्य प्रतिकृतीचे दर्शन घेण्यासाठी ठाणेकरांची प्रचंड प्रमाणात गर्दी झाली होती. यावेळी ‘सन मराठी’चे कलाकार संग्राम साळवी, साईंकित कामत, समीरा गुजर, जानकी पाठक, रूपा मांगले, संजीव तांडेल, अनिषा सबनिस उपस्थित होते. तसेच या मालिकेचे संकल्पक, लेखक- निर्माते श्री. निलेश मयेकर, निर्माते श्री सुनील भोसले हे देखील या ठिकाणी उपस्थित होते. उपस्थित मान्यवर आणि ठाणेकर यांच्या उपस्थितीत प्रतिकृतीसमोर श्री देव वेतोबा यांची महाआरती देखील अतिशय सुंदर पध्दतीने, श्रध्देने पार पडली.

कोकणातील बरेच चाकरमानी ठाण्यात राहतात आणि या निमित्ताने त्यांना आपल्या देव वेतोबाचे दर्शन ठाण्यात घेता आल्याचा आनंद त्यांनी या ठिकाणी व्यक्त केला. तसेच अनेक ठाणेकर ज्यांना कोकणा विषयी प्रेम आहे त्यांनी देखील याठिकाणी गर्दी केली होती. ‘सोमिल क्रिएशन’ प्रॉडक्शन हाऊसची प्रस्तुती असलेली, सुनील भोसले यांनी निर्मिती केलेली आणि अभिनेता उमाकांत पाटीलची प्रमुख भूमिका असलेली  “क्षेत्रपाल श्री देव वेतोबा” मालिका पाहा येत्या १७ जुलैपासून सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७ वाजता फक्त सन मराठीवर.


No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

India Sets the Global Jewellery Calendar with Grand Opening of IIJS Bharat – Signature 2026

  India Sets the Global Jewellery Calendar with Grand Opening of IIJS Bharat – Signature 2026 IIJS Bharat – Signature 2026 to expected to ge...