Thursday, July 13, 2023

'अबोल प्रीतीची अजब कहाणी' या मालिकेत दीप्ती केतकर नकारात्मक भूमिकेत!

 'अबोल प्रीतीची अजब कहाणीया मालिकेत दीप्ती केतकर नकारात्मक भूमिकेत!


निरनिराळे विषय आणि रंजक मालिका घेऊन सोनी मराठी वाहिनी नेहमीच प्रेक्षकांच्या भेटीला येत असतेत्यांतील आगळेवेगळे विषय कायमच प्रेक्षकांच्या पसंतीस पडतातमालिकेतील काही व्यक्तिरेखा कायमच प्रेक्षकांच्या मनात घर करून राहताततशीच एक नवी मालिका सोनी मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी घेऊन येते आहे. 'अबोल प्रीतीची अजब कहाणीही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येते आहेयाआधी विविध व्यक्तिरेखांतून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री दीप्ती केतकरदेखील या मालिकेतून एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येते आहेप्रेक्षकांचा लाडका अजिंक्य राऊत या नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहेत्याच्या व्यक्तिरेखेचं नाव राजवीर आहेत्याच्याबरोबर गुणी अभिनेत्री जान्हवी तांबट हीसुद्धा या मालिकेतून विशिष्ट व्यक्तिरेखा साकारताना पाहायला मिळते आहे.  तिच्या व्यक्तिरेखेचं नाव मयूरी असून ती या मालिकेत बॉडीगार्डच्या वेशातसुद्धा  पाहता येणार आहेआता या दोघांची अजब प्रेमकहाणी कशी असेलहे लवकरच पाहायला मिळेलही 'अबोल प्रीतीची अजब कहाणी'  कशी लपूनछापून फुलतेयहे पाहायला मिळेल.

 

दीप्ती कायमच निरनिराळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करतेविविध मालिका आणि चित्रपट यांतून ती नेहमीच आपल्या  प्रेक्षकांसमोर येतेआता 'अबोल प्रीतीची अजब कहाणीया नव्या मालिकेतून ती एका विशिष्ट  व्यक्तिरेखेद्वारे आपल्या भेटीस येते आहेयामिनी सराफ असे त्यांच्या व्यक्तिरेखेचं नाव असून राजवीरच्या आईच्या भूमिकेत ती असणार आहेयामिनी या मालिकेतून नकारात्मक भूमिकेत दिसणार आहेआता ही व्यक्तिरेखा ती कशी फुलवते आणि राजवीर आणि मयूरी यांच्या आयुष्यात ती किती ढवळाढवळ करतेहे आपल्याला पाहायला मिळेलअजिंक्य राऊतजान्हवी तांबटसुनील तावडे हे कलाकार या मालिकेतून प्रमुख भूमिकांत पाहायला मिळतीलया मालिकेचे दिग्दर्शन अजय मयेकर करताहेत आणि त्यांच्याच अजय मयेकर फिल्म्स या निर्मिती संस्थेकडून या मालिकेची निर्मिती करण्यात येते आहे.

आता सोनी मराठीवर 'अबोल प्रीतीची अजब कहाणीही मालिका १७ जुलैपासून संध्याकाळी .३० वाजता  प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


 पाहायला विसरू नकानवी मालिका - 'अबोल प्रीतीची अजब कहाणी'.१७ जुलैपासूनसोमते शनि., संध्या.३० वासोनी मराठी वाहिनीवर.


No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...