अपोलोने 500+ सॉलिड अवयव प्रत्यारोपणाचा टप्पा पार केला
नवी मुंबईतील अपोलो येथील अपोलो हॉस्पिटल्स ऑफ ट्रान्सप्लांटने प्रत्यारोपण वैद्यकशास्त्रात एक नवे मापदंड निर्माण केलेन नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्सने 533 सॉलिड अवयव प्रत्यारोपण पूर्ण करुन एक इतिहास घडवला आहे, याबद्दल घोषणा करताना आम्हाला आभिमान वाटत आहे. नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्स येथील अपोलो इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सप्लांटमधील सर्वात मोठ्या आणि सर्वसमावेशक अशा अत्याधुनिक बहु-अवयव प्रत्यारोपण कार्यक्रमामुळे हे यश प्राप्त झाले आहे.2017 पासून नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्सने 327 मूत्रपिंड प्रत्यारोपण, 200 यकृत प्रत्यारोपण आणि 8 हृदय प्रत्यारोपण केले आहेत.
अपोलोचे वेगळेपण जपणारा एक महत्वाचा पैलू म्हणजे प्रत्यारोपणाच्या रुग्णांना वैयक्तिक उपचार प्रदान करणारी एक विशेष प्रत्यारोपण टीम. एकत्र आलेल्या टीमध्ये प्रत्यारोपण शल्यविशारद, नेफ्रॉलॉजिस्ट, गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट, पेडियाट्रिक (लहान मुलांचे) गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट, बालरोग शल्यचिकित्सक, भूलतज्ञ, अतिदक्षता तज्ञ, चिकित्सक, पल्मोनोलॉजिस्ट, संसर्गजन्य रोगाचे सल्लागार, इम्यूनोलॉजिस्ट, पॅथॉलॉजिस्ट, प्रत्यारोपण समन्वयक आणि प्रशिक्षित आयसीयू वॉर्ड परिचारिका आणि संपर्क अधिकारी यांचा समावेश आहे. या सर्व व्यावसायिकांना जीवन-संरक्षक अतिदक्षता तंत्रज्ञानाद्वारे सहकार्य प्राप्त होते.
अपोलो हॉस्पिटल्सच्या पश्चिमी क्षेत्राचे यकृत आणि एचपीबी प्रोग्रामचे मुख्य सल्लागार डॉ. प्रा. डॅरियस मिर्झा या यशाबद्दल अभिमान आणि समाधान व्यक्त करताना म्हणाले, "शेवटच्या टप्प्यातील अवयव निकामी झालेल्या रुग्णांसाठी अवयव प्रत्यारोपण ही जीवन वाचवणारी प्रक्रिया असून यामुळे जीवनाची गुणवत्ता लक्षणीयरित्या सुधारते. अपोलोच्या यकृत प्रत्यारोपण विभागाने नेहमी उत्कृष्ट परिणाम देण्यासाठी प्रयत्न केले आहेत. आमच्या पट्ट्याखाली 200 यकृत प्रत्यारोपण करून, त्यापैकी 65 मुलांमध्ये करण्यात आल्या आहेत, आम्ही यकृताच्या आजाराशी लढा देण्यासाठी आणि आमच्या रुग्णांना निरोगी आणि अधिक परिपूर्ण जीवनाची संधी देत आहोत. आमच्या बहु-कुशल दृष्टीकोनातून हे सिद्ध होते की आम्ही आमच्या यकृत प्रत्यारोपणाच्या रुग्णांना सर्वोत्कृष्ट वैद्यकीय सेवा प्रदान करण्यात आणि खात्रीशीर यशस्वी परिणाम देण्यात कोणतीही कसर सोडत नाही."
नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्सचे यूरोलॉजी, यूरो-ऑन्कोलॉजी, मूत्रपिंड प्रत्यारोपण आणि रोबोटिक शस्त्रक्रियेचे वरिष्ठ सल्लागार डॉ. अमोल कुमार पाटील म्हणाले, "अपोलो येथील आमचा मूत्रपिंड प्रत्यारोपण कार्यक्रम मूत्रपिंड निकामी झालेल्या रुग्णांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणणारा एक आधारस्तंभ ठरला आहे. कल्पकता, समर्पण आणि रुग्णाची अतुलनीय काळजी याद्वारे आम्ही 300 हून अधिक मूत्रपिंड प्रत्यारोपण यशस्वीपणे पूर्ण केले आहेत. प्रत्येक प्रक्रिया ही नव्या जीवनाचे प्रतीक आहे आणि आमच्या रूग्णांना सकारात्मकपणे जीवन जगण्याची संधी देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत."
नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्सचे सीव्हीटीएस, हृदय आणि फुफ्फुस प्रत्यारोपण शस्त्रक्रियेचे सल्लागार डॉ. संजीव जाधव म्हणाले की, "हृदय प्रत्यारोपण ही एक नाजूक वैद्यकीय प्रक्रिया आहे, ज्यामध्ये अचूकता, कौशल्य आणि कारुण्य भाव आवश्यक आहे. अपोलो येथे आम्ही हृदयविकाराच्या रुग्णांना आशा प्रदान करतो आणि नवी सुरुवात करण्यासाठी प्रोत्साहन देतो. आम्ही करत असलेले प्रत्येक हृदय प्रत्यारोपण हे समर्पित भावनेचा आणि वैद्यकीय उत्कृष्टतेच्या अथक प्रयत्नांचा जणू दाखला आहे, हीच आमच्या टीमची खरी ओळख आहे."
अपोलोच्या सॉलिड अवयव प्रत्यारोपणाच्या कार्यक्रमात हृदय, फुफ्फुस, मूत्रपिंड आणि यकृत प्रत्यारोपणाचा समावेश आहे, यामध्ये विशेष अवयव प्रत्यारोपण टीमचा देखील समावेश आहे, जे मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी 99.9% आणि यकृत प्रत्यारोपणासाठी 94% यशाचा दर प्रदान करण्याच्या दृष्टीने आमच्या रुग्णांना वैयक्तिकृत, सर्वसमावेशक वैद्यकीय सेवा प्रदान करण्यासाठी अथक परिश्रम करतात. यशाचा उच्च दर म्हणजे टीमच्या समर्पणाचा आणि प्रगत वैद्यकीय तंत्रज्ञानाचा दाखला आहे. वेदनेवर नियंत्रण आणि व्रण लवकर बरे होणे अशा प्रकारची जलद रोगमुक्तता होऊ शकते आणि शस्त्रक्रियेनंतर चांगले परिणाम दिसून येऊ शकतात. कोविड-19 च्या महामारीच्या काळातही संक्रमणाच्या नियंत्रणाच्या कठोर शिष्टाचाराचे पालन करत प्रत्यारोपणामुळे अनेक प्राण वाचवले आहेत.
अपोलो हॉस्पिटल्सचे पश्चिमी विभागाचे प्रादेशिक सीईओ श्री. संतोष मराठे म्हणाले, "अपोलो हे आरोग्यसेवेमध्ये नेहमीच अग्रगण्य राहिले आहे आणि हे यश म्हणजे जीवनदान देण्याच्या आमच्या वचनबद्धतेचा जणू पुरावा आहे. आमचे 535 प्रत्यारोपण (आंतरराष्ट्रीय स्तरावरील 18 मूत्रपिंड प्रत्यारोपण आणि 12 यकृत प्रत्यारोपण) म्हणजे ही केवळ एक संख्या नाही; तर हे जीवनदान, कुटुंबांना पुन्हा एकत्र येण्याचा आनंद आणि रुग्णांना आयुष्य जगण्याची दुसरी संधी मिळाल्याचे द्योतक आहे. ज्यांचे जीवन प्रत्यारोपणाद्वारे वाचवले गेले किंवा ज्यांच्या जीवनात सुधारणा घडवून आली अशा प्रत्येक रुग्णासाठी अपोलोचा प्रत्यारोपण कार्यक्रम जणू आशेचा किरण आहे आणि संपूर्ण अपोलो परिवारासाठी ही खूप अभिमानाची बाब आहे. अपोलो निवडक भागीदारी असलेल्या रुग्णालयांसह यकृत आणि किडनीसाठी आउटबाउंड ट्रान्सप्लांट प्रोग्राम देखील चालवते. प्रत्यारोपण कार्यक्रमासाठी आम्ही प्रादेशिक प्रत्यारोपण समित्यांचे आभार मानतो आणि ग्रीन कॉरिडोअरमधून मृत दात्यांचे अवयव घेऊन जाण्यास मदत करणार्याम वाहतूक पोलिसांचे देखील आम्ही खूप आभारी आहोत. अवयवांच्या अनुपलब्द्धतेमुळे कोणालाची जीव गमवावा लागू नये म्हणून आम्ही अवयव प्रत्यारोपणाची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी अथक प्रयत्न करत राहणार आहोत."
1984 मध्ये अपोलोने पहिले यशस्वी प्रत्यारोपण केले, तेव्हापासून अपोलो अवयव प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेत अग्रणी स्थान राखून आहे आणि त्यांनी कधी मागे वळून पाहिलेले नाही. भारतातील पहिल्या अवयव प्रत्यारोपणाची नोंद करण्यापासून ते अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियेत इतिहास घडवण्यापर्यंत, दर्जेदार परिणाम प्रदान करण्यात अपोलो आघाडीवर आहे. प्रख्यात शल्यचिकित्सकांच्या नेतृत्वाखाली या टीममध्ये नेफ्रॉलॉजिस्ट, यूरोलॉजिस्ट, प्रत्यारोपण समन्वयक, सामाजिक कार्यकर्ते, मनोचिकित्सक आणि भूलतज्ज्ञांसह विविध क्षेत्रातील तज्ञांचा समावेश आहे.
भारतासारख्या देशात अवयव दानाची मागणी मोठ्या प्रमाणात आहे म्हणून अवयव प्रत्यारोपण तसेच विशेषतः मृत दात्यांच्या अवयव प्रत्यारोपणाची खूप आवश्यकता आहे. अपोलोने 500 प्रत्यारोपणाचा मोठा पल्ला गाठल्यामुळे भारतात दरवर्षी 500,000 हून अधिक लोकांना अवयव प्रत्यारोपणाची आवश्यकता असते तसेच 200,000 लोकांना यकृत प्रत्यारोपणाची आवश्यकता असते आणि सुमारे 150,000 लोकांना मूत्रपिंड प्रत्यारोपणाची आवश्यकता असते यावर शिक्कामोर्तब झाले आहे व ही वस्तुथिती देखील समोर आली आहे. परंतु अवयवांच्या कमतरतेमुळे आणि मर्यादित प्रत्यारोपण सेवांमुळे केवळ 5% लोकांपर्यंत पोहोचता येते आणि हजारो लोक जीवनरक्षक प्रत्यारोपणाची प्रतीक्षा करत आपला जीव गमावतात.
No comments:
Post a Comment
GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST