Monday, July 31, 2023

'द ऍड्रेस बाय जीएस' रेमंड रियल्टीचा ठाण्यामध्ये चौथ्या प्रोजेक्टचा शुभारंभ

 'द ऍड्रेस बाय जीएस' रेमंड रियल्टीचा ठाण्यामध्ये चौथ्या प्रोजेक्टचा शुभारंभ

नव्या प्रोजेक्ट लॉन्चमुळे ठाण्यामध्ये एकूण रेरा कार्पेट क्षेत्रफळ ४ मिलियन चौरस फीट असेल

ठाणे, ३१ जुलै २०२३: रेमंड उद्योगसमूहातील स्थावर मालमत्ता कंपनी रेमंड रियल्टीने ऍड्रेस बाय जीएस २.० या चौथ्या प्रोजेक्टचा शुभारंभ करून ठाण्यातील स्थावर मालमत्ता बाजारपेठेत आपल्या विस्ताराची आगेकूच कायम राखली आहे. पहिल्या तीन प्रकल्पांना मिळालेल्या प्रचंड यशानंतर लॉन्च केलेला द ऍड्रेस बाय जीएस २.० प्रकल्प बृहन्मुंबई महानगर क्षेत्रातील आघाडीचे स्थावर मालमत्ता विकासक म्हणून रेमंड रियल्टीची वेगाने वाढत असलेली लोकप्रियता दर्शवतो. द ऍड्रेस बाय जीएस या पहिल्या टप्प्याच्या लॉन्चला मिळालेले यश आणि टेनएक्स हॅबिटॅटच्या पहिल्या टप्प्याचे नुकतेच करण्यात आलेले हॅन्डओव्हर यामुळे रेमंड रियल्टी स्थावर मालमत्ता क्षेत्रातील एक प्रभावी कंपनी म्हणून ओळखली जाऊ लागली आहे.

श्री.हरमोहन साहनी, सीईओ, रेमंड रियल्टी यांनी सांगितले,"द ऍड्रेस बाय जीएस २.० ठाणे क्षेत्रात रेमंड रियल्टीची वाढती लोकप्रियता दर्शवतो. आमच्या पहिल्या प्रोजेक्टची डिलिव्हरी आम्ही रेराने आखून दिलेल्या वेळेच्या २ वर्षे आधीच दिली आणि आता आम्ही अजून एक सर्वोत्तम प्रकल्प सादर करत आहोत जो बांधकाम क्षेत्रात नवे मापदंड रचण्यासाठी सज्ज आहे. द ऍड्रेस बाय जीएस या पहिल्या टप्प्याला मिळालेल्या प्रचंड यशामुळे नव्या युगातील भारताच्या महत्त्वाकांक्षांना अनुरूप घरे तयार करण्याच्या आमच्या उद्दिष्टाला बळ मिळाले आहे."

रेमंड रियल्टीचा पहिला प्रोजेक्ट टेनएक्स हॅबिटॅट हे 'ऍस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट' १४ एकरांवर उभारण्यात आले असून यामध्ये ३१०० घरे आहेत. त्यापाठोपाठ त्यांनी द ऍड्रेस बाय जीएस हा प्रकल्प लॉन्च केला. टेनएक्स हॅबिटॅट प्रकल्पातील पहिल्या तीन टॉवर्सची डिलिव्हरी रेराने आखून दिलेल्या वेळेच्या दोन वर्षे आधी देऊन रेमंड रियल्टीने भारतात स्थावर मालमत्ता क्षेत्रात एक नवा मापदंड स्थापित केला आहे. फेब्रुवारी २०२३ मध्ये रेमंड रियल्टीने टेनएक्स एरा या आपला तिसरा प्रकल्प लॉन्च केला ज्याला ग्राहकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. लॉन्चपासून अवघ्या सात दिवसात जवळपास १०० बुकिंग्स करण्यात आली आणि दोन महिन्यांच्या आत लॉन्च करण्यात आलेल्या इन्व्हेंटरीपैकी २५% भाग विकला गेला होता. ही कामगिरी रेमंड रियल्टीच्या उच्च दर्जाच्या उत्पादनांवर ग्राहकांचा विश्वास आणि सुरु असलेल्या प्रकल्पांच्या बांधकामांचा प्रचंड वेग दर्शवते. आर्थिक वर्ष २०२३ मध्ये तीन प्रकल्पांमधील बुकिंग्सचे एकूण मूल्य १६०० कोटी रुपयांपेक्षा जास्त होते.

नव्याने लॉन्च करण्यात आलेला द ऍड्रेस बाय जीएस २.० हा प्रकल्प देखील स्थावर मालमत्ता क्षेत्रातील सर्व रूढींच्या पलीकडे जाण्याचा रेमंड रियल्टीचा निर्धार कायम राखणार आहे. अतिशय मोक्याच्या ठिकाणी असलेल्या या प्रकल्पामध्ये एक्सक्लुसिव्ह टॉवर-लेवल अमेनिटीज आहेत ज्या लक्झरी व सुविधा मिळवून देतात. शानदार अंतर्गत सजावट, आधुनिक सोयीसुविधा यांच्या बरोबरीनेच तीन एकरांचे रोमन शैलीने प्रेरित होऊन तयार करण्यात येणार असलेले लँडस्केप पोडियम यामध्ये आहे. शहरामधील गर्दी आणि धकाधकीतून घरी आल्यावर शांत, निवांत अनुभव मिळावा यासाठी अतिशय कलात्मक पद्धतीने हे डिझाईन करण्यात आले आहे. २५००० चौरस फीट जागेत वेलनेस सेंटर्स, क्लबहाउसेस अशा सुविधा आणि ७०००० चौरस फीट जागेत हाय-स्ट्रीट रिटेल यांचा समावेश असल्याने याठिकाणी राहणाऱ्यांना सर्वसमावेशक जीवनाचा पुरेपूर आनंद घेता येईल.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ च्या मंचावर महेश मांजरेकर यांची विठुरायाला साद

  ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ च्या मंचावर महेश मांजरेकर यांची विठुरायाला साद महाराष्ट्रातल्या सर्वोत्तम कीर्तनकारांचा शोध घेणा...