Thursday, July 13, 2023

राजवीर आणि मयूरी यांची नवी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला.

 राजवीर आणि मयूरी यांची नवी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला.

निरनिराळे विषय आणि रंजक मालिका घेऊन सोनी मराठी वाहिनी नेहमीच प्रेक्षकांच्या भेटीला येत असतेत्यांतील आगळेवेगळे विषय कायमच प्रेक्षकांच्या पसंतीस पडतातमालिकेतील काही व्यक्तिरेखा कायमच प्रेक्षकांच्या मनात घर करून राहताततशीच एक नवी मालिका सोनी मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी घेऊन येते आहे. 'अबोल प्रीतीची अजब कहाणीही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येते आहेत्याची पहिली झलक प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडते आहेप्रेक्षकांचा लाडका अजिंक्य राऊत या नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहेत्याच्या व्यक्तिरेखेचं नाव राजवीर आहेत्याच्याबरोबर गुणी अभिनेत्री जान्हवी तांबट हीसुद्धा या मालिकेतून विशिष्ट व्यक्तिरेखा साकारताना पाहायला मिळते आहे.  तिच्या व्यक्तिरेखेचं नाव मयूरी असून ती या मालिकेत बॉडीगार्डच्या वेशातसुद्धा  पाहता येणार आहेआता या दोघांची अजब प्रेमकहाणी कशी असेलहे लवकरच पाहायला मिळेलही 'अबोल प्रीतीची अजब कहाणीलपूनछापून कशी फुलतेयहे पाहायला मिळेल.

                         अभिनेता अजिंक्य राऊत पुन्हा एकदा एका नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहेत्याचे याआधीचे काम प्रेक्षकांना विशेष आवडलेत्याच्या नव्या भूमिकेची त्याचे चाहते मनापासून वाट पाहत होतेअजिंक्य पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर एका नव्या भूमिकेतून दिसणार आहेमालिकेचा फर्स्ट लूक प्रेक्षकांना विशेष आवडतो आहेकारण मालिकेची नायिका जान्हवी तांबट ही वेगळ्या रूपात दिसते आहेती चक्क एका बॉडीगार्डच्या वेशात आपल्याला दिसते आहेतेही पुरुष बॉडीगार्डच्या वेशातजान्हवी साठी मयुरी आणि भाऊसाहेब या दोन व्यक्तिरेखा साकारणं हे तारेवरची कसरत ठरणार आहेआता हा बॉडीगार्ड कशा प्रकारे प्रेक्षकांसमोर येईलहे पाहणे उत्सुकतेचे असेलया मालिकेतून दिग्गज कलाकारांची फळी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेअजिंक्य राऊतजान्हवी तांबटसुनील तावडे आणि दीप्ती केतकर हे कलाकार प्रमुख भूमिकांत या मालिकेतून पाहायला मिळतीलमालिकेचे शीर्षक गीत गुरू ठाकूर यांनी लिहले असून रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर यांनी ते गायले आहेप्रेक्षकांना ताल धरायला लावणारे हा शीर्षक गीत असून रोमँटिक असलेले हे शीर्षक गीत रसिकांच्या मनात घर करते आहेअजय मयेकर हे या मालिकेचे दिग्दर्शन करत आहेत आणि त्यांच्या अजय मयेकर फिल्म्स या निर्मिती संस्थेकडून या मालिकेची निर्मिती करण्यात येत आहेतर आता सोनी मराठीवर 'अबोल प्रीतीची अजब कहाणीही मालिका १७ जुलैपासून संद्याकाळी .३० वाजता  प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...