Monday, July 24, 2023

'क्षेत्रपाल श्री देव वेतोबा' चा सावंतवाडीत प्रीमियर शो पार पडला

 'क्षेत्रपाल श्री देव वेतोबाचा  सावंतवाडीत प्रीमियर शो पार पडला


सन मराठी’ ह्या  वाहिनीने प्रेक्षकांची मने जिंकायचीच असा जणू निश्चयच केलेला आहे. सोहळा नात्यांचा’ हे ब्रीदवाक्य जपतप्रेक्षकांच्या आनंदासाठी नेहमी एक पाऊल पुढे असणा-या सन मराठी’ वाहिनीने प्रेक्षकांना आयुष्यभर पुरेल  असा एक अविस्मरणीय अनुभव सावंतवाडीला दिला.  निमित्त होते 'क्षेत्रपाल श्री देव वेतोबाही मालिका जी आजपासून / कालपासून  म्हणजेच १७ जुलै पासून संध्याकाळी ७ वाजता, ‘सन मराठी’ वाहिनीवर सुरु झाली.

 


प्रेक्षकांना गेल्या कित्येक दिवसांपासून 'क्षेत्रपाल श्रीदेव वेतोबाह्या मालिकेबाबत उत्सुकता लागून राहिली होती. अखेर आजपासून /कालपासून, 'क्षेत्रपाल श्रीदेव वेतोबामालिकेचा प्रवास सुरु झाला. कोकणचा रक्षणकर्ता या नात्यानेश्री देव वेतोबा कोकणात अजूनही वास करतो असा अनेकांचा विश्वास आहे. वेतोबा वर लोकांची मनापासून श्रध्दा आहे. 


'
क्षेत्रपाल श्रीदेव वेतोबाया मालिकेच्या लाँच प्रित्यर्थ आपल्या सावंतवाडीतील मोती तलाव येथे पहिल्यांदाच श्रीदेव वेतोबाची एक भव्य प्रतिकृती उभारण्यात आली होती. वेतोबाचे वर्णन अनेकांनी त्यांच्या भावनेतूनअनुभवातून केले आहे. पण आपल्या डोळ्यांसमोर वेतोबाची भव्य दिव्य प्रतिकृती पाहणे हा प्रेक्षकांसाठी विलक्षणीय अनुभव होता. प्रतिकृतीसमोर श्री देव वेतोबा यांच्या महाआरतीचा क्षणही प्रेक्षकांना अनुभवता आला. इतकेच नव्हे तरवैश्य भवन हॉल,गवळीवाडासावंतवाडी येथे  'क्षेत्रपाल श्रीदेव वेतोबामालिकेतील कलाकार उमाकांत पाटील (वेतोबा)राजेश भोसले (बाबी रेडकर)प्राजक्ता वाडये (बायो रेडकर)दिपक कदम (धाकल्या सोनार)विवेकानंद गोरे (खोत)पूजा महेंद्र (मंजू) आणि अनिल गावडे (दादा परब) या ठिकाणी उपस्थित होते आणि या सर्व कलाकारांसोबत पहिला भाग बघण्याचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता. आपल्या लाडक्या आणि मानाच्या वेतोबाला पहिल्यांदाच छोट्या पडद्यावर पाहून भावुक झालेल्या सावंतवाडीकरांनी "आमच्या डोळ्याचे पारणे फिटले"या शब्दांत  आपल्या भावना व्यक्त केल्या आणि मालिकेच्या संपूर्ण टीमला त्यांचे प्रेमशुभेच्छा आणि आशिर्वाद दिला.


 सन मराठी वाहिनीने कोकणचे आराध्य दैवत श्रीदेव वेतोबा यांची महती जगासमोर आणण्याचा मानस केला आहेत्यासाठी तुमची मोलाची साथ देण्यासाठी नक्की पाहा क्षेत्रपाल श्री देव वेतोबा” मालिका  सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७ वाजता फक्त सन मराठीवर.

 

सन मराठी ही फ्री वाहिनी आहे. वाहिनी तुमच्याकडे दिसत नसल्यास त्वरित आपल्या केबल ऑपेरेटरशी संपर्क साधावा.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...