Monday, July 10, 2023

‘ट्रेन द ट्रेनर’ द्वारे भारतातील तरुणांना आधुनिक तंत्रज्ञान प्रशिक्षण

 ‘ट्रेन द ट्रेनर’ द्वारे भारतातील तरुणांना आधुनिक तंत्रज्ञान प्रशिक्षण

तंत्रज्ञानामध्ये भारतातील युवकांना सुसज्ज करण्याच्या उद्दिष्टाने 'अपग्रॅड फाऊंडेशन-एमएसडीई' चा संयुक्त उपक्रम


 अपग्रॅड (upGrad) ची एक ना-नफा तत्वावर काम करणारी उपसंस्था अपग्रॅड फाऊंडेशनने नुकताच कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या (MSDE) सहभागीदारीने ‘आर्टिफिशिअल इंटलिजन्स (AI) आणि डेटा सायन्स’ या विषयांमध्ये आवश्यक कौशल्य विकसनासाठी तीन शहरांमध्ये प्रशिक्षण शिबिर घेण्याच्या उपक्रमाचा समारोप केला. भविष्यासाठी अत्यंत महत्वाच्या तंत्रज्ञानामधील आवश्यक कौशल्यांमध्ये भारतातील युवकांना सुसज्ज करण्याच्या उद्दिष्टाने प्रेरित असलेले हे आठ दिवसीय ‘ट्रेन द ट्रेनर’ (प्रशिक्षकांना प्रशिक्षित करु) प्रशिक्षण शिबिर आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI) आणि डेटा सायन्स या आधुनिक तंत्रज्ञानाला संपूर्णपणे आत्मसात करण्यासाठी सहाय्यक होते. बंगळूर, हैदराबाद आणि मुंबई येथील राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्था (NSTI) केंद्रांवर एकूण ११३ प्रशिक्षणार्थींनी यासाठी नोंदणी केली होती. या कार्यक्रमामध्ये डेटा सायन्स, मशीन लर्निंग, एआय अॅप्लिकेशन्स आणि डेटा व्हिज्युअलायझेशन या विषयातील महत्त्वाच्या संकल्पना समाविष्ट केल्या होत्या. याबरोबरच, प्रभावीपणे काम पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या कौशल्य प्रशिक्षणाचा (सॉफ्ट स्किल्स) देखील यामध्ये समावेश करण्यात आला होता.

           

उद्योग क्षेत्राशीसंबंधित असलेला हा उपक्रम पंतप्रधान माननीय श्री. नरेंद्र मोदी यांच्या व्यावहारिक आणि प्रायोगिक कौशल्यांवर भर देणाऱ्या ‘स्किल इंडिया मिशन’ शी पूरक आहे. जून महिन्यामध्येच या उपक्रमांतर्गत एक प्रशिक्षण शिबिर मुंबईच्या चुनाभट्टी भागातील राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्था (NSTI) येथे आयोजित केले गेले. हा उपक्रम म्हणजे शासन, उद्योग क्षेत्र आणि शिक्षण क्षेत्र यांच्यातील मजबूत सहकार्याचे एक उत्तम उदाहरण असून हे उपक्रम तरुण विद्यार्थ्यांना व विशेषतः कमी विशेषाधिकार असलेल्यांना भारताच्या झपाट्याने वाढणाऱ्या रोजगार व नोकरीधंद्याच्या बाजारपेठेमधील संधी मिळवता यावी म्हणून सक्षम करण्याची वाढती गरज संबोधित करते.


सी.एस.मूर्ती, संचालक, प्रादेशिक-महाराष्ट्र राज्य, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या (MSDE) म्हणाले, “हा अभ्यासक्रम वाढत्या बाजारपेठेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तयार करण्यात आला आहे. यामधील सहभागी प्रशिक्षणार्थीं या उदयोन्मुख क्षेत्रात त्यांची कौशल्ये सुधारण्यासाठी उत्सुक आहेत आणि अपग्रॅड फाऊंडेशन मधील अनुभवी प्राध्यापक देखील विद्यार्थ्यांना सक्रियपणे गुंतवून ठेवण्यासाठी संवादात्मक सत्र घेत आहेत.”


वन अपग्रॅडमध्ये सामील झालेले आणि अपग्रॅड फाऊंडेशनमध्ये अजेंडा तयार करणारे प्रमथ राज सिन्हा याबाबत बोलताना म्हणाले,“आपल्या समाजात उच्च गुणवत्तेचे शिक्षण मिळण्याच्या संधीमध्ये मोठ्या प्रमाणात सामाजिक व आर्थिक असमानता आहे. बहुतेकवेळा आपल्या देशातील महत्वाकांक्षी तरुणांना शिक्षण आणि रोजगाराच्या संधी मिळवण्यासाठी खूप आव्हानांना सामना करावा लागतो. अशावेळी आपल्या समाजातील ही उत्तम शिक्षण व ज्ञान मिळविण्यातील दरी भरून काढणे अत्यंत महत्वाचे ठरते. उद्याच्या जागतिक बाजारपेठेसाठी सुसज्ज, पूर्ण तयार आणि सक्षम भारत निर्माण करण्यासाठी या प्रशिक्षण कार्यक्रमाची काळजीपूर्वक रचना करण्यात आली आहे.”


उर्मिला, प्रशिक्षण शिबिरातील प्रशिक्षणार्थी म्हणाली,''बंगळूरमधील एनएसटीआय (NSTI) प्रशिक्षण शिबिरांनी खूप प्रभावी परिणाम दिले आणि प्रशिक्षणार्थींचा उत्साहवर्धक अभिप्राय देखील मिळवला आम्ही डेटा सायन्स, पायथन, मशीन लर्निंग आणि डीप लर्निंगचे ज्ञान मिळविले आहे, जे आमच्यासाठी खूप उपयुक्त आहे.आम्ही प्रशिक्षकांकडून आमच्या प्रत्येक शंका दूर करू शकू अशा पद्धतीने या शिबिराची रचना केली होती.”


संपूर्ण देशभरातील एनएसटीआय (NSTI) केंद्रांवर प्रशिक्षकांना असे प्रशिक्षण देण्यासाठी अपग्रॅड फाऊंडेशन (upGrad Foundation) आपला हा उपक्रम अजून वाढवण्यास सज्ज आहे. एआय (AI) आणि डेटा सायन्सच्या चा देशात अजून स्वीकार व्हावा व त्यास गती मिळावी यासाठी करत असलेल्या आपल्या अथक प्रयत्नांच्या माध्यमातून अपग्रॅड फाऊंडेशन (upGrad Foundation) भारताला आधुनिक काळातील कौशल्य क्षमतांमध्ये सक्षम बनवत राहील.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

हॉलिवूडची रहस्यमय ‘भुताटकी’ भेटायला येत आहे अल्ट्रा झकास ओटीटीवर!

 हॉलिवूडची रहस्यमय ‘भुताटकी’  भेटायला   येत आहे अल्ट्रा झकास ओटीटीवर!  रसिक प्रेक्षकांचं चित्त वेधून घेणारा हॉलीवूडचा सुपरहिट रहस्यमय चित्रप...